Current Affairs of 8 March 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (8 मार्च 2018)

चालू घडामोडी (8 मार्च 2018)

देशभरातील तीस महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार जाहीर’ :

 • सिंधुताई सपकाळ यांच्यासह देशभरातील तीस महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार जाहीर’ झाला आहे. आज जागतिक महिला दिनी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
 • देशातील महिलांसाठीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जाणारा ‘नारी शक्ती पुरस्कार’ केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आला आहे.
 • जागतिक माहिलादिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्कारांमध्ये राज्यातील डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्यासह देशभरातील 30 महिला आणि संघटनांचा समावेश आहे.
 • महिला सक्षमीकरणात महत्वाचे योगदान देणाऱ्या देशभरातील महिलांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येतो. ज्या महिलांना या पुरस्काराने गौरविण्यात येते त्या महिला इतर सर्वसामान्य महिलांसह सर्वांसाठी प्रेरणादायी राहिल्या आहेत.
 • नारी शक्ती पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या महिलांमध्ये अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ, जयम्मा भंडारी, के. श्यामलकुमारी, वनश्री, गार्गी गुप्ता, साबरमती टिकी, मित्तल पटेल, एस. सिवा सथ्य, डॉ. लिझीमोल, फिलिपोझ पमाद्यकंदाथिल, शिरोम इंदिरा, उर्मिला बळवंत आपटे, दीपिका कुंदाजी, पुर्णिमा बर्मन, अनिता भरद्वाज, भारती कश्यप, अंबिका बेरी, गौरी मौलेखी, पुष्पा गिरीमजी, श्रुजन, सी. के. दुर्गा, रेखा मिश्रा, थिनलाल कोरोल, मेहविश मुश्ताक, नविका सागर परिक्रमा, मधू जैन, जेट्सन पेमा, एम. एस. सुनिल, शीला बालाजी, मालविका अय्यर, रेवाना उमादेवी नागराज, अनुराधा कृष्णमुर्ती आणि नम्रता सुदर्शन, न्या. गिता मित्तल यांचा समावेश आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 मार्च 2018)

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या नेत्याचे सर्वाधिक फॉलोअर्स :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. मोदी हे सोशल मीडियावर अजूनही सर्वाधिक लोकप्रिय भारतीय नेते आहेत. आता मोदींच्या मागोमाग म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर भाजपाच्याच नेत्याची वर्णी लागली आहे.
 • भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना फेसबुक आणि ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे दुसरे नेते आहेत.
 • सोशल मीडियावर अमित शहा यांचे दोन कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर मोदींचे ट्विटरवरच पाच कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत.
 • तसेच शहा यांचे फॉलोअर तिन्ही साईट- ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर आहेत.

भारत आणि चीनमधील व्यापार ऐतिहासिक उंचीवर :

 • भारत आणि चीनमध्ये डोकलामसह इतर मुद्दय़ांवर दोन्ही बाजूंकडून तणावाचे वातावरण असतानाही दोन्ही देशांच्या द्विपक्षीय व्यापारामध्ये गेल्या वर्षी 84.44 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा ऐतिहासिक व्यापार झाल्याचे समोर आले आहे. तर चीनच्या सीमा शुल्क सामान्य प्रशासन विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
 • 2017 मध्ये भारताकडून चीनला होणाऱ्या निर्यातीत वाढ झाली असून, ही निर्यात तब्बल 40 टक्क्यांनी वाढून 16.34 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 2 टक्के वाढ :

 • केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 2 टक्के वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजूरी देण्यात आली आहे.
 • तर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) 2 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे.
 • केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 50 लाख कर्मचाऱ्यांना आणि 61 लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. 1 जानेवारी 2018 पासून हा महागाई भत्ता लागू होणार आहे.

मुंबई विमानतळ जगातील एक नंबर :

 • छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील अव्वल क्रमांकाचे विमानतळ ठरले आहे.
 • एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनलने विमानतळाच्या सोई-सुविधेनुसार सर्वेक्षण केले. यात चेकइन, विमानतळावरील प्रवेश, सुरक्षा, प्रवाशांचे विश्रामगृह, प्रवाशांची खानपान व्यवस्था, प्रवासी सामान कक्ष या बाबींचा समावेश होता. या सर्व बाबींत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने अव्वल ठरत सर्वेक्षणामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
 • मुंबई आणि दिल्ली विमानतळाला विभागून हा क्रमांक देण्यात आला आहे.

संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशात भारत चौथ्या क्रमांकावर :

 • अत्याधुनिक शस्त्रास्त्र विकसित करणारा चीन सातत्याने आपल्या संरक्षण खर्चात वाढ करत आहे.
 • तसेच याही वर्षी चीनने आपल्या संरक्षणासाठी 11.4 लाख कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. तर यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ही 8.1 टक्क्यांची वाढ आहे.
 • अमेरिकेनंतर संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांच्या यादीत चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 • अमेरिका आणि चीनच्या तुलनेत भारत मागे असला तरीही सर्वाधिक संरक्षण बजेट सादर करणाऱ्यांच्या बाबतीत भारताचा चौथा क्रमांक आहे.
 • भारताने संरक्षण खर्चाच्या बाबतीत रशिया आणि ब्रिटनसारख्या बलाढ्य देशांना सुद्धा पिछाडीवर टाकले आहे.
 • इंटरनॅशनल इंस्टीटूयट फॉर स्ट्रॅटजिक स्टडीजने 2018 ची ही आकडेवारी जारी केली आहे.

दिनविशेष :

 • 8 मार्च : जागतिक महिला दिन.
 • 1817 : न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) ची स्थापना.
 • 1911 : पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.
 • 1948 : भारतीय विमानसेवा एअर इंडिया इंटरनॅशनल ने परदेशात आपली सेवा सुरु केली.
 • 1948 : फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.
 • 1957 : घाना देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
 • 1974 : चार्ल्स डी गॉल विमानतळ पॅरिस, फ्रान्स मध्ये सुरु झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 मार्च 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.