Current Affairs of 7 March 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (7 मार्च 2018)

चालू घडामोडी (7 मार्च 2018)

एअर इंडियाच्या विमानांना सौदीत जाण्यास मुभा :

 • भारतातून इस्त्रायलला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानांना सौदी अरेबियावरून उड्डाण करण्यास मंजुरी मिळाली आहे.
 • इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 5 मार्च रोजी एअर इंडियाने इस्त्रायलशी करार केला असून सौदी अरेबियावरून ही विमाने प्रवास करतील असे नेतान्याहू म्हणाले.
 • एअर इंडियाच्या विमानांना सौदी अरेबियावरून जाण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती, आणि ती लवकरच मिळण्याची अपेक्षा असल्याचे एअर इंडियानंही आधी म्हटले होते. अर्थात, सौदी अरेबियाचे तसेच एअर इंडियाचे अधिकारी यांच्यापैकी अद्याप कुणी अंतिम मंजुरी मिळाल्याचे अधिकृतरीत्या म्हटलेले नाही. जर का भारतातून इस्त्रायलला जाणारी विमाने सौदी अरेबियावरून गेली तर प्रवासाचा वेळ तब्बल अडीच तासांनी वाचणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ तसेच तिकिटाची किंमत दोन्ही कमी होईल अशी अपेक्षा आहे.
 • सौदी अरेबियाची इस्त्रायल या देशाला मान्यता नसून गेली 70 वर्षे इस्त्रायलला जाणाऱ्या विमानांना सौदी अरेबियावरून जाण्यास बंदी आहे. जर, का बंदी उठवण्यात आली असेल तर याचा अर्थ इस्त्रायलचे व सौदीचे संबंध सुधारत असल्याचेही द्योतक आहे. इराणचा या प्रदेशात वरचश्मा वाढत असून सौदी व इस्त्रायल या मुद्यावर अमेरिकेच्या मित्रपक्षांमध्ये आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 मार्च 2018)

म्युरल्सव्दारे साकारणार बाबासाहेबांचा जीवनप्रवास :

 • पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या आवारात मार्चअखेर बाबासाहेबांचे जीवनप्रवास म्युरल्सद्वारे साकारण्यात येणार आहे. ब्रॉंझ धातूतील एकूण 19 म्युरल्समध्ये बाबासाहेबांचा जन्म ते महापरिनिर्वाण असे प्रसंग चितारले आहेत. त्यामुळे स्मारक नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
 • म्युरल्सची वैशिष्ट्ये –
  मूळ छायाचित्रांवरून प्रसंग चित्रण
  ब्रॉंझ धातूचे शहरात पहिलेच म्युरल्स
  मार्बलवर सुवर्ण अक्षरात प्रसंगांची माहिती
  ब्रॉंझ धातूंमुळे म्युरल्स अनेक वर्षे टिकणार
  मध्यवर्ती ठिकाणामुळे पर्यटन स्थळ होणार
 • असे असतील म्युरल्स –
  बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ (प्रत्येकी लांबी 16.5 फूट, रुंदी 11.5 फूट)
  बाबासाहेबांकडून राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे राज्यघटना सुपूर्त
  नागपूर येथे दीक्षा समारंभात भाषण करताना जमलेला जनसमुदाय
  महाडमधील चवदार तळ्याचा सत्याग्रह
  नाशिकमधील काळामंदिर सत्याग्रह

भारतात होणार्‍या बालविवाहांत घट :

 • जगभरात बालविवाहांच्या संख्येत झपाट्याने घट झाली असून मागच्या दशकात ही संख्या वेगाने कमी झाल्याचे युनिसेफने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. 2.5 कोटी बालविवाहांवर प्रतिबंध घालण्यात यश आल्याचे युनिसेफचे म्हणणे आहे. हे प्रमाण कमी होण्यामध्ये दक्षिण आशियातील देशांमध्ये भारत आघाडीवर असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे भारताच्यादृष्टीने ही अतिशय आनंदाची बाब आहे.
 • भारतात किशोरवयीन लोकसंख्येपैकी 20 टक्क्यांहून अधिक किशोरवयीन भारतात आहेत. त्यातही दक्षिण आशियामध्ये बालविवाह होण्याचे प्रमाण जास्त आहे. असे युनिसेफच्या बालसंरक्षण विभागाचे प्रमुख जावियर एग्लिवार यांनी सांगितले आहे.
 • मागील दशकात 18 वर्षाच्या आधी लग्न होणाऱ्या मुलींचे प्रमाण भारतात जवळपास 47 टक्के होते. हे प्रमाण आता कमी झाले असून 27 टक्क्यांपर्यंत आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
 • बालविवाहामुळे महिलांचे शिक्षण, आरोग्य, सामाजिक स्थान या सगळ्यांवर गदा येत असल्याचेही अनेक अभ्यासातून समोर आले आहे.
 • भारतात लग्नासाठी मुलीचे वय 18 तर मुलाचे वय 21 आहे. बालविवाहाच्या संदर्भात कडक कायदेही आहेत. भारतात बालविवाह लावल्यास त्या मुलाच्या किंवा मुलीच्या पालकांना 1 लाख रुपये दंड आणि 2 वर्षांचा कारावास भोगावा लागू शकतो.

मेघालयाचे नवे मुख्यमंत्री कॉन्राड संगमा :

 • भाजप व इतर प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्यावर नॅशनल पीपल्स पक्षाचे (एनपीपी) प्रमुख कॉन्राड संगमा यांनी 6 मार्च रोजी मेघालयाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या वेळी इतर 11 मंत्र्यांनीही शपथ घेतली. त्यामुळे राज्यातील दहा वर्षांची काँग्रेसची राजवट संपुष्टात आली आहे.
 • लोकसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत पी.ए.संगमा यांचे पुत्र असलेल्या कॉन्राड यांना राज्यपाल गंगाप्रसाद यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. 40 वर्षीय कॉन्राड हे मेघालयचे 12वे मुख्यमंत्री आहेत.
 • मंत्रिमंडळात एनपीपीचे चार, यूडीपीचे तीन, पीडीएफचे दोन, एचएसपीडीपी व भाजपच्या प्रत्येकी एका मंत्र्याचा पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. शपथविधीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष अमित शहा, मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह उपस्थित होते.

‘मोस्ट डिझायरेबल मॅन ऑफ 2018’ पुरस्कार :

 • मराठी आणि बॉलिवडू चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याची छाप पाडणाऱ्या वैभव तत्वावादीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाराष्ट्राचा ‘मोस्ट डिझायरेबल मॅन ऑफ 2018’ हा पुरस्कार त्याला मिळाला असून नुकतीच या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
 • आपल्या स्टाइल स्टेटमेन्टमुळे तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या वैभव तत्ववादीसोबत या स्पर्धेत 50 मॉडेल्स आणि अभिनेते सामिल झाले होते. या साऱ्या मॉडेल्स आणि अभिनेत्यांना मागे टाकून वैभवने महाराष्ट्राचा मोस्ट डिझायरेबल मॅन ऑफ 2018 चा पुरस्कार मिळवला.
 • वैभव तत्वावादीचा एक बॉलिवडू चित्रपट सध्या येऊ घातलाय. ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी‘ या चित्रपटात तो झळकणार आहे.

दिनविशेष :

 • सन 1508 मध्ये दुसरा मुघल सम्राटहुमायून‘ यांचा जन्म झाला.
 • ‘फोटोग्राफी’चे शोधक ‘निसेफोरे नाऐप्से’ यांचा जन्म 7 मार्च 1765 रोजी झाला.
 • 7 मार्च 1849 रोजी महान वनस्पतीतज्ञ ‘ल्यूथर बरबँक’ यांचा जन्म झाला.
 • केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना 7 मार्च 2009 मध्ये झाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 मार्च 2018)

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.