Current Affairs of 7 November 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (7 नोव्हेंबर 2017)
आनंद बोरा यांना सेंच्युरी आशियातर्फे पारितोषिक :
- वन्यजीवविषयक “सेंच्युरी आशिया” मासिकातर्फे नाशिकमधील वन्यजीव छायाचित्रकार आनंद बोरा यांना आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्र गटातील प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
- मुंबईमध्ये झालेल्या सोहळ्यात छत्तीसगड पर्यटन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय सिंग यांच्या हस्ते त्यांनी हे पारितोषिक स्वीकारले. रोख पंचवीस हजार रुपये, सन्मानचिन्ह, कॅमेरा बॅग, एक जंगल सफारी असे पारितोषिकाचे स्वरूप आहे.
- “सेंच्युरी आशिया”चे प्रमुख बिट्टू सहगल, प्रसिद्ध छायाचित्रकार स्टीव विंटर, कल्याण वर्मा, गणेश शंकर, डॉ. आशिष अंधेरिया, नयन खानोलकर, डॉ. प्रवीष पांड्या, सुमीत सेन, शेखर दत्तात्रीय यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
- बोरा यांचे पारितोषिक विजेते छायाचित्र मासिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. तसेच या श्रेणीत पारितोषिक मिळवणारे बोरा हे राज्यातील पहिले छायाचित्रकार ठरले आहेत.
Must Read (नक्की वाचा):
बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवसैनिकांना सुविधा :
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त महापालिकेतर्फे दादर येथील शिवाजी पार्कवर येणार्या लोकांना सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- पुढच्या वर्षापासून ही तरतूद दरवर्षी अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
- बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी 17 नोव्हेंबर रोजी त्यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी, राज्यातून शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवाजी पार्क येथे येत असतात. या शिवसैनिकांना आतापर्यंत शिवसेना सोईसुविधा पुरवित होती. मात्र, यापुढे हा खर्च पालिका करणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार आहे.
- तसेच याबाबत माहिती देताना सभागृह नेते यशवंत जाधव यांनी सांगितले की, शिवसेना सुविधा पुरवित आहेच, पण दरवर्षी अभिवादन करण्यासाठी येणार्यांची संख्या वाढत आहे. त्यांच्यासाठी पालिकेमार्फत सुविधा पुरविल्या जाव्यात, म्हणून ही मागणी करण्यात आली होती. त्या मागणीला प्रशासनाने मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले.
सेंद्रिय शेती तंत्रज्ञानासाठी स्वित्झर्लंडशी सामजस्य करार :
- सेंद्रिय शेतीचे वाढते महत्त्व व काळाची गरज लक्षात घेता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तसे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. त्या दृष्टीने, सेंद्रिय शेती शिक्षण, संशोधन, विस्तार कार्यासंदर्भात ‘स्वित्झर्लंड’ येथील ‘सेंद्रिय शेती संशोधन संस्था (एफआयबीएल)‘ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्यामध्ये 5 नोव्हेंबर रोजी सामंजस्य करार झाला.
- कुलगुरु डॉ. विलास भाले आणि ‘एफआयबीएल’ चे संचालक डॉ. उर्स निग्गली यांनी करारावर स्वाक्षरी केली.
- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे कुलगुरूंच्या कार्यालयात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी ‘एफआयबीएल’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ तसेच ‘स्वित्झर्लंड’ येथील प्रकल्प प्रमुख डॉ. गुरबीर भुल्लर, दुसरे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अम्रितबीर रेअर यांचे सह विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांची उपस्थिती होती.
- या सामंजस्य कराराचे माध्यमातून उभय देशातील सेंद्रिय शेती तंत्रज्ञानाची आदान प्रदान होणार असून, कृषी शिक्षण घेणारे विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि सामान्य ग्राहकांना या उपक्रमाचा प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष लाभ होईल असा विश्वास कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी यावेळी व्यक्त केला.
क्रायोजेनिक्स तंत्रज्ञानामुळे दुग्ध उत्पादनात वाढ :
- देशात पहिल्यांदा नाशिक येथे क्रायोजेनिक्स तंत्रज्ञानाद्वारे राबविण्यात आलेल्या उपक्रमातून दुग्ध उत्पादनांत वाढ झाल्याचा दावा संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे.
- नुकतेच नाशिक येथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, क्रायोजेनिक्स ग्रुप यांच्या वतीने ‘क्रायोजेनिक्स – की फॉर सक्सेस आर्टिफिशियल इन्सिमेशन’ या संकल्पनेवर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.
- मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रोफेसर डॉ. मिलिंद अत्रे यांच्यासह लाइव्हस्टॉक डेव्हलपमेंट बोर्डाचे देशभरातील मुख्य कार्यकारी अधिकारी, दूध संघटना, स्वयंसेवी संस्था, पशुवैद्यकीय क्षेत्रात काम करणार्या व्यक्ती या वेळी उपस्थित होत्या.
- इंडियन ऑइलचे मुख्य महाव्यवस्थापक श्रीकृष्ण चेरवू या वेळी म्हणाले, क्रायोजेनिक्स तंत्रज्ञानाशी संबंधित आवश्यक उच्च दर्जाची उत्पादने आम्ही देशभरात पुरवीत आहोत.
- बीएआयएफ फाउंडेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. ए.बी. पांडे म्हणाले, पशुवैद्यकीय संस्थांनी त्यांच्या अत्याधुनिक टिकाऊ उपकरणांच्या वापरासह सर्वोत्कृष्ट परिणामांसाठी इंडियन ऑइलची सेवा वापरायला हवी.
- दरम्यान, इंडियन ऑइलने नाशिकमध्ये मेसर्स ग्लोबल गुडने दान केलेल्या तंत्रज्ञानासह गेल्या वर्षी ‘एक्स्ट्रा कोल्ड कनिस्टेर्स’ निर्माण करण्यास सुरुवात केली. यामुळे देशातील दूध उत्पादनात वाढ झाली आहे.
दिनविशेष :
- लाल-बाल-पाल या त्रयीतील एक ‘बिपिनचंद्र पाल’ यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1858 मध्ये झाला.
- केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) (7 मार्च 1866 (जन्मदिन) 7 नोव्हेंबर 1905 (स्मृतीदिन) हे मराठी कवी होते. मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा होती. ती मोडून अन्य विषयांवर कविता करणारे केशवसुत हे आद्य मराठी कवी समजले जातात.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा