Current Affairs of 7 June 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (7 जून 2017)

चालू घडामोडी (7 जून 2017)

शहरांच्या परिवर्तनात महाराष्ट्र अग्रेसर :

 • शहरी भागाच्या विकासपरिवर्तनात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. केंद्र शासनाच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी होत असल्याने महाराष्ट्र रोल मॉडेल म्हणून ओळखले जाते.
 • राज्यात पायाभूत सुविधांचे प्रकल्प तसेच मेट्रो प्रकल्पांसाठी 67 हजार 523 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
 • हागणदारीमुक्त मोहिमेत राज्य आघाडीवर आहे, असे केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.
 • सह्याद्री अतिथीगृह येथे केंद्रीय नगरविकासमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी नायडू बोलत होते.
 • नायडू म्हणाले, की राज्यात सुरू असलेल्या शहर विकासाच्या, गृहनिर्माणाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय नगरविकास विभागाच्या योजना यशस्वी राबविण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 जून 2017)

80 वर्षांनी सापडले कोब्रा लिलीचे फूल :

 • निसर्गवाद्यांनी केलेल्या संशोधनात तब्बल 80 वर्षांनी अत्यंत दुर्मिळ असे अरिसामा ट्रान्सलुसन्स नावाचे फूल सापडले आहे.
 • कोब्रा लिली या नावाने हे फूल ओळखले जाते. वनस्पतिशास्त्रज्ञ एडवर्ड बर्न्स यांनी प्रथम 1932 मध्ये भारताच्या दक्षिणेकडील निलगिरी पर्वतांमध्ये या फुलाचा शोध लावला होता.
 • कोब्रा लिली ह्या फुलाच्या वरील पाने अर्धपारदर्शक असल्याने आतील फुलांना सूर्यप्रकाश मिळतो. शास्त्रज्ञांनी 1933 मध्ये प्रथम या फुलाबाबतची माहिती प्रसिद्ध केली. त्यानंतर मात्र हे फूल पुन्हा सापडले नाही.
 • तसेच या फुलाबद्दल प्रचंड उत्सुकता असणारे दंतचिकित्सक व निसर्गतज्ञ तरुण छाब्रा यांनी निलगिरी पर्वतांमध्ये अनेक वर्षे कोब्रा लिलीचा शोध घेतला.
 • 2009 मध्ये निलगिरी पर्वतांमध्ये असलेल्या शोला जंगलात एका छोट्या भागात त्यांना या फुलाचा शोध लागला. या फुलाला परत पाहू शकलो हे अत्यंत अविश्‍वसनीय आहे.

समित कक्कड इक्यूमिनिकल ज्यूरी पुरस्काराने सन्मानित :

 • अनेक आंतराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ठसा उमटविणाऱ्या ‘हाफ तिकीट’ सिनेमाने 57व्या ‘झिलन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ (Zlin International Film Festival) मध्ये ही आपली मोहोर उमटवली आहे.
 • प्रयोगशील तरूण दिग्दर्शक म्हणून अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण करणार्‍या समित कक्कड यांना प्रतिष्ठेच्या इक्यूमिनिकल ज्यूरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 • आतापर्यंत फार थोड्या भारतीय दिग्दर्शकांना हा सन्मान मिळाला आहे. जगातील सर्वात मोठा चिल्ड्रन फिल्म फेस्टिव्हल अशी ‘झिलन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ची ख्याती आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अमेय ठरला रजतपदाचा मानकरी :

 • ठाण्याचा सुपुत्र अमेय वायंगणकरने दुबईच्या बुडोकान कप 2017 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तगड्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून भारताला रजतपद मिळवून दिले.
 • अमेयची निवड या वर्षाअखेरीस मलेशिया आणि इंग्लंडमध्ये होऊ घातलेल्या कराटेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत झाली असून तो भारताचे प्रतिनिधीत्त्व करणार आहे.
 • बुडोकान कप 2017 च्या माध्यमातून विविध देशांतील मार्शल आर्टसच्या खेळाडूंना आपली प्रतिभा दाखविण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
 • तसेच या वर्षी या स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, दुबई आणि नेपाळ या देसातले खेळाडू सहभागी झाले होते. त्यांचा मुकाबला करून रजतपदक जिंकून अमेयने विजयश्री खेचून आणली.

शेर बहादूर देऊबा नेपाळचे नवे पंतप्रधान :

 • नेपाळ मधील ज्येष्ठ नेते आणि नेपाळी काँग्रेसचे प्रमुख शेर बहादूर देऊबा यांची देशाच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे.
 • नेपाळच्या संसदेत झालेल्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत देऊबा यांना 388 मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला केवळ 170 मतांवर समाधान मानावे लागले.
 • गेल्या महिन्यात माओवादी नेते पुष्प कमल दहल ऊर्फ प्रचंड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने नेपाळचे पंतप्रधानपद रिक्त झाले होते.
 • देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. त्यानंतर देऊबा यांची पंतप्रधान पदावर निवड झाल्याने ही अस्थिरता संपुष्टात आली आहे.
 • तसेच नेपाळचे पंतप्रधानपद भूषणवण्याची देऊबा यांची ही चौथी वेळ आहे. 

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 जून 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.