Current Affairs of 6 June 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (6 जून 2017)
‘जीएसएलव्ही एमके-3’ चे यशस्वी प्रक्षेपण :
- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) तयार केलेल्या जीएसएलव्ही एमके-3 या आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या प्रक्षेपकाचे (रॉकेट) श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झाले.
- जीएसएलव्ही एमके-3 हा पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा उपग्रह प्रक्षेपक असून, त्यात भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक या शक्तिशाली इंजिनाचा वापर करण्यात आला आहे.
- सतीश धवन केंद्राच्या दुसऱ्या तळावरून सायंकाळी 5 वाजून 28 मिनिटांनी हा प्रक्षेपक अवकाशात झेपावला. या प्रक्षेपकाद्वारे 3.13 टन वजनाचा ‘जी सॅट-19’ हा दळणवळण उपग्रह अवकाशात पाठविण्यात आला असून, प्रक्षेपनानंतर 16 मिनिटांनी तो अवकाशात सोडण्यात आला.
- तसेच आगामी काळात या प्रक्षेपकाद्वारे अंतराळवीरांना अवकाशात पाठविणेही शक्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
- या यशस्वी प्रक्षेपणामुळे चार टन वजनाचे उपग्रह स्वबळावर अवकाशात पाठविण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली असून, यापूर्वी 2.3 टनापेक्षा अधिक वजनाचे उपग्रह अवकाशात पाठविण्यासाठी भारताला इतर देशांची मदत घ्यावी लागत होती, मात्र, हे अवलंबित्व आता संपुष्टात आले आहे.
Must Read (नक्की वाचा):
रायगडावर महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा :
- छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा मंगळवार, 6 जून रोजी किल्ले रायगडावर साजरा करण्यात येणार आहे. सोहळ्याला राज्यभरातून हजारो शिवभक्त उपस्थित राहणार आहेत.
- अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिन महोत्सव समितीच्या वतीने गडावर 5 व 6 जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
- युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात गडपूजनाने होणार आहे.
- 6 जूनला पहाटे गडावरील नगारखान्यासमोर ध्वजारोहण, त्यानंतर संभाजीराजे यांच्या उपस्थितीत मुख्य राज्याभिषेक सोहळा होणार आहे.
- तसेच या वेळी शिवरायांच्या उत्सवमूर्तीवर छत्रपती घराण्याच्या राजपुरोहितांच्या मंत्रोच्चारात युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात येणार आहे.
राज्यात एस.टी.चा नांदेड विभाग उत्पन्नात प्रथम :
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एस.टी.च्या मे 2017 या महिन्याच्या उत्पन्नात नांदेड विभाग राज्यात प्रथम आला आहे.
- यानिमित्ताने नांदेड विभागाचे विभाग नियंत्रक नंदकुमार कोलारकर यांचा नुकताच एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या हस्ते मुंबईत सत्कार करण्यात आला.
- एस.टी. महामंडळाच्या बसेस सध्या अवैध प्रवासी वाहतुकीला तोंड देत प्रवाशांची अखंडपणे गेल्या 68 वर्षापासून सेवा देत आहेत.
- अवैध प्रवासी वाहतुकीच्या संकटावर मात करीत प्रवाशांसाठी विविध सोयी- सवलती देत आहेत.
- मे 2017 या महिन्याच्या उत्पन्नात नांदेड विभागाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला असून सरासरीच्या तीन करोड एवढे उत्पन्न नांदेड विभागाने गाठले आहे.
- नांदेड विभागाचे कर्तव्यदक्ष अशी ओळख असलेले विभाग नियत्रंक नंदकुमार कोलारकर यांनी नांदेड विभागाचे विभाग नियत्रंक म्हणून मे 2016 मध्ये सुत्रे स्वीकारली.
चार आखाती देशांनी कतारशी संबंध तोडले :
- मुस्लिम ब्रदरहूड, अल कायदा, इस्लामिक स्टेटला (आयएस) पाठिंबा देणे आणि इराणशी संबंध असल्याबद्दल चार अरब देशांनी कतारशी राजनैतिक संबंध तोडले. या निर्णयामुळे आखातातील अरब देशांतील संबंध आणखी ताणले गेले आहेत.
- बहारिन, इजिप्त, सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरातने कतारशी संबंध तोडल्याची घोषणा करताना आम्ही आमचे राजनैतिक कर्मचारी माघारी बोलावत आहोत, असे सांगितले.
- एमिरेट्स या विमान कंपनीने कतारमधील विमान सेवा बंद करण्याचे ठरविले असून, त्याची अंमलबजावणी होणार आहे.
- कतार हा नैसर्गिक वायूने समृद्ध असून 2022 मध्ये जागतिक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद त्याच्याकडे आहे. शिवाय अमेरिकेचा कातारमध्ये 10 हजार सैनिकांचा महत्त्वाचा लष्करी तळही आहे.
- सौदी अरेबियाने सध्या येमेनमध्ये सुरू असलेल्या युद्धातून कतारी सैनिकांच्या तुकड्यांना काढून घेण्यात येईल, असे म्हटले.
दिनविशेष :
- 6 जून 1674 रोजी शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला.
- 6 जून हा जागतिक वन दिन म्हणून पाळला जातो.
- प्रसिद्ध मराठी विश्वकोशकार ‘गणेश रंगो भिडे’ यांचा जन्म 6 जून 1909 मध्ये झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा