Current Affairs of 7 April 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (7 एप्रिल 2018)

चालू घडामोडी (7 एप्रिल 2018)

जगातील सर्वांत मोठ्या ‘डिफेन्स डील’साठी भारत सज्ज :

  • भारत सरकारने 110 लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी अब्जावधी डॉलरच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्या दिशेने पहिले पाऊल ठेवले आहे.
  • वायूदलाने सुरूवातीची निविदा म्हणजे आरएफआय (रिक्वेस्ट फॉर इन्फर्मेशन) जारी केले आहे.
  • तसेच सर्व 110 लढाऊ विमाने ही एक किंवा दोन इंजिनची असतील. त्याची निर्मिती विदेशी कंपन्यांच्या सहकार्याने होईल.
  • तर जगातील प्रमुख विमान उत्पादक कंपन्यांसाठी आरएफआय जारी करण्यात आला आहे.
  • या प्रकल्पावर सुमारे 1.15 लाख कोटी रूपये खर्च होण्याची शक्यता आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 एप्रिल 2018)

भारताच्या संरक्षण खात्याची वेबसाईट झाली हॅक :

  • सरकारी वेबसाईट डाऊन होण्यामागे सायबर हल्ल्याचे वृत्त भारताच्या सायबर सिक्युरिटी प्रमुखांनी फेटाळले आहे. हार्डवेअरमधील बिघाडमुळे वेबसाईट डाऊन झाली होती, असे त्यांनी सांगितले आहे.
  • राष्ट्रीय सायबर सिक्युरिटी समन्वयक गुलशन राय म्हणाले की ही हार्डवेअरची समस्या होती. त्यामुळे सुमारे 10 सरकारी वेबसाईट प्रभावित झाल्या आहेत.
  • तसेच सरकारी वेबसाईटची देखभाल करणाऱ्या राष्ट्रीय सूचना केंद्राच्या (एनआयसी) अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले की संरक्षण मंत्रालय आणि इतर मंत्रालयाच्या वेबसाईट हॅक झाल्या नव्हत्या आणि कोणत्याही प्रकारचा सायबर हल्ला झालेला नाही.
  • दरम्यान, संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर चिनी शब्द दिसत असल्यामुळे ही साईट  हॅक झाल्याची चर्चा होती. तांत्रिक गडबडीमुळे संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, निवडणूक आयोग, इपीएफओ, श्रम मंत्रालयसह सुमारे 10 सरकारी वेबसाईट डाऊन झाल्या होत्या.तसेच अचानक संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटच्या होमपेजवर चिनी शब्द दिसत होते.

भारताच्या खात्यात तिसर्या सुवर्णपदकाची कमाई :

  • भारताच्या खात्यात सध्या 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांयपस्दक जमा आहे. विशेष म्हणजे चारही पदक भारताला वेटलिफ्टींग प्रकारात मिळालेली आहेत.
  • गुरुराजा, मीराबाई चानू, संजिता चानू आणि दिपक लाथेर यांनी पदकांची कमाई केली आहे.
  • राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली आहे. सतीश शिवलिंगमने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. पुरूषांच्या 77 किलो वजनी गटात सतीश शिवलिंगमनेही सुवर्ण कामगिरी केली आहे. 317 किलो वजन उचलत सतीशने सुवर्णपदक आपल्या नावे केलं.
  • सतीश क्लिन अॅण्ड जर्कमध्ये 173 किलो वजन उचलण्याच यशस्वी ठरला. त्यानंतर त्याने 317 किलो वजन उचलण्याची कामगिरी करत पहिला क्रमांक मिळविला आहे.
  • दरम्यान, याआधी दुसऱ्या दिवशी झालेल्या खेळात वेटलिफ्टिंगमध्ये भारताला दोन पदकं मिळाली. संजिता चानूने सुवर्ण पटकावलं. तर पुरूष गटात वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या दीपक लाथरने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

कोरियाच्या माजी राष्ट्राध्यक्ष पार्क यांना 24 वर्षांची कैद :

  • सेऊल-दक्षिण कोरियाचे पहिल्या महिला माजी राष्ट्राध्यक्ष पार्क ग्यून हे यांना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले असून जिल्हा न्यायालयाने त्यांना 24 वर्षांची कैद ठोठावली आहे. पार्क यांच्यावर लाच घेणे, सत्तेचा दुरुपयोग करण्यासह भ्रष्टाचाराच्या 16 प्रकरणांचा ठपका होता.
  • राष्ट्राध्यक्ष पदावर असताना अधिकाराचा गैरवापर केल्याचा व फौजदारी गुन्ह्याखाली दोषी आढळून येणाऱ्या पार्क दक्षिण कोरियाच्या तिसऱ्या राष्ट्रप्रमुख ठरल्या आहेत.
  • यापूर्वी चून डू वॉन, रोन टे-वू यांनाही भ्रष्टाचार व देशविरोधी कारवायांमुळे १९९० च्या दशकात दोषी ठरवण्यात आले होते.

दिनविशेष :

  • 7 एप्रिल – जागतिक आरोग्य दिन

  • जागतिक आरोग्य संघटना (WHO) 19 47 मध्ये स्थापना करण्यात आली.

  • 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना झाली आहे.

  • पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे 1940 मध्ये पहिले कृष्ण्वर्णीय अमेरिकन ठरले आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 एप्रिल 2018)

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.