Current Affairs of 6 April 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (6 एप्रिल 2018)

चालू घडामोडी (6 एप्रिल 2018)

सिगारेटच्या पाकिटावर आता टोल फ्री क्रमांक आणि प्रबोधनात्मक चित्र :

  • सिगारेट आणि तंबाखूचे व्यसन आहे त्यांच्यासाठी आता या उत्पादनांवर एक टोल फ्री क्रमांक दिला जाणार आहे.
  • आपले व्यसन सोडण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी 1800-11-2356 हा टोल फ्री क्रमांक अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास व्यक्तीचे मोफत समुपदेशन केले जाणार आहे.
  • याबरोबरच सिगारेट आणि तंबाखूच्या पाकीटावरील 85 टक्के भागात हे व्यसन वाईट आहे हे दाखविणारे एक प्रतिकात्मक छायाचित्रही देण्यात येणार आहे.
  • हे सगळे बदल येत्या सप्टेंबर महिन्यापासून लागू होणार असून संबंधित कंपन्यांना त्याप्रमाणे सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 एप्रिल 2018)

रियाध मध्ये तब्बल 35 वर्षांनंतर चित्रपटगृह पुन्हा होणार सुरू

  • सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे तब्बल 35 वर्षांनंतर चित्रपटगृह पुन्हा सुरू होणार आहेत. 18 एप्रिल रोजी सिनेमागृह सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
  • तसेच सिनेमागृह सुरू करण्याचं पहिलं लायसन्स एएमसी एंटरटेन्मेंटला देण्यात आलं आहे.
  • तर ही अमेरिकी कंपनी पुढील 5 वर्षांमध्ये सौदी अरेबियाच्या 15 शहरांमध्ये 40 पेक्षा जास्त सिनेमागृह सुरू करणार असल्याची माहिती आहे.
  • 35 वर्षांनी सुरू होणा-या चित्रपटगृहांमध्ये सर्वप्रथम ब्लॅक पॅंथर हा सिनेमा दाखवला जाईल असं सांगितलं जात आहे.
  • 1970 मध्ये सौदीत काही चित्रपटगृह होते, पण त्यावेळी इस्लामी कट्टरपंथींच्या दबावामुळे देशभरात चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती.

रेपो रेट ‘जैसे थे’ :

  • चालू वर्षातील पहिल्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा दिलेला नाही. रेपो रेट सहा टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्के असा कायम ठेवण्यात आला आहे.
  • यापूर्वी देखील सलग तीन पतधोरणात रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणतेही बदल केले नव्हते. रेपो दरात शेवटची पाव टक्क्यांची कपात ऑगस्ट 2017 मध्ये झाली होती.
  • देशभरातील बँका जेव्हा रिझर्व्ह बँकेकडून अल्पमुदतीचं कर्ज घेतं त्यावेळी जो दर रिझर्व्ह बँक आकारते त्याला रेपो रेट म्हणतात. तर ज्यावेळी बँका आपल्याकडचा अधिक असलेला निधी रिझर्व्ह बँकेकडे अल्पमुदतीसाठी जमा करते, त्यावेळी जो व्याजदर आरबीआय देते त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

भारताला आणखी एका सुवर्णपदकाची कमाई :

  • पहिल्या दिवशी मीराबाई चानू आणि गुरुराजा यांनी भारताला अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवून दिलं आहे.
  • यानंतर दुसऱ्या दिवशी भारताच्यात संजिता चानूने 56 किलो वजनी गटात भारताला आणखी एका सुवर्णपदकाची कमाई करुन दिली आहे.
  • स्नॅच प्रकारात संजिता चानूने 84 किलो वजन उचलत नवीन विक्रमाची नोंद केली.
  • यानंतर क्लीन अँड जर्क प्रकारात संजिता चानूने 108 किलो वजन उचलत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना ‘टेक्निकल ऑडिट’ अनिवार्य :

  • राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना तांत्रिक लेखापरीक्षण अनिवार्य करण्यात आले आहे.
  • या संस्थांकडून करण्यात येणारी विकासकामे गुणवत्तापूर्ण व्हावीत व त्यामधून टिकाऊ मत्ता निर्माण व्हाव्यात, यासाठी या कामांच्या दर्जाचे त्रयस्थ यंत्रणेकडून अधिक प्रभावी व परिणामकारक तांत्रिक लेखापरीक्षण करण्यासाठी सरकारने सुधारित कार्यपद्धती अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत.
  • रस्ते अनुदान, विशेष रस्ता अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण योजना, नवीन नगरपंचायती/नगर परिषदांना अनुदान, नगर परिषद व महापालिका हद्दवाढ, महापालिका पायाभूत सुविधा अनुदान, याशिवाय नगरविकास विभागाकडून निधी वितरित करण्यात येणाऱ्या योजनांचा समावेश आहे.

दिनविशेष :

  • शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा 1656 मध्ये पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.
  • 1930 मध्ये प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.
  • भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी 1966 मध्ये भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली.
  • 1880 मध्ये भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 एप्रिल 2018)

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.