Current Affairs of 7 April 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (7 एप्रिल 2016)

चालू घडामोडी (7 एप्रिल 2016)

सुलतान अझलान शाह ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी :

  • इपोह (मलेशिया) येथे सुरू झालेल्या 25 व्या सुलतान अझलान शाह ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताने (दि.6) जपानला 2-1 असे पराभूत केले.
  • कर्णधार सरदार सिंगने निर्णायक वेळी गोल करीत पिछाडीवर पडलेल्या भारताला विजय मिळवून दिला.
  • जपानच्या अनुभवी संघाने भारताला विजयासाठी झुंझवले, या सामन्याद्वारे जपानच्या नऊ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले.
  • भारताचा तरुण खेळाडू हरमनप्रीत सिंग व कर्णधार सरदार सिंग यांनी गोल केले; तर जपानकडून एकमेव गोल केंजी किताजातो याने केला.
  • सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीयांनी आक्रमणाचे धोरण अवलंबले होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 एप्रिल 2016)

क्रिकेट स्टेडियमला डॅरेन सॅमीचे नाव :

  • वेस्ट इंडीजला टी-20 वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार डॅरेन सॅमी याचे नाव सेंट ल्युसिया येथील एका क्रिकेट स्टेडियमला दिले जाणार आहे.
  • ब्युसेजोर क्रिकेट मैदान आता ‘डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट ग्राऊंड’ नावाने ओळखले जाईल.
  • एका भागाला सेंट ल्युसियाचाच अन्य एक खेळाडू जॉन्सन चार्ल्स याचेही नाव असेल.
  • जॉन्सन चार्ल्सदेखील टी-20 वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाचा सदस्य आहे.
  • वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळानुसार, सेंट ल्युसियाचे पंतप्रधान कॅनी डी अँथोनी यांनी याबाबतची घोषणा केली.
  • वेस्ट इंडीजने 2012 मध्ये जेव्हा टी-20 वर्ल्डकप जिंकला होता, तेव्हाही सॅमी हाच कर्णधार होता.

स्मार्ट फोनवर विना इंटरनेट पहा दूरदर्शन सेवा :

  • सध्याच्या टेक्नोसॅव्ही युगाच मोबाईल युझर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
  • तसेच ही बाब लक्षात घेऊन ‘दूरदर्शन’ चॅनेलने एक पाऊल पुढे टाकत नवी सुविधा आणली असून त्याद्वारे आता मोबाईलवरही ‘दूरदर्शन’ चॅनेल पाहता येणार आहे.
  • देशांतील 16 शहरांमध्ये दूरदर्शनतर्फे ही सुविधा विनाइंटरनेट उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • 25 फेब्रुवारीपासून दिल्ली, मुंबई, औरंगाबाद, कोलकाता, चेन्नी, गुवाहाटी, पाटणा, रांची, लखनऊ, जालंधर, रायपूर, इंदौर, भोपाळ, बंगळुरू आणि अहमदाबाद या शहरांमध्ये दूरदर्शनची डिजीटल टेलिव्हिजन सेवा सुरू झाली असून आता ग्राहकांना मोबाईलवरही दूरदर्शनचे कार्यक्रम पाहता येणार आहेत.
  • असे पाहता येईल मोबाईलवर दूरदर्शन चॅनेल –
  • दूरदर्शनच्या या फ्री टीव्ही सुविधेचा लाभ उठवण्यासाठी तुम्हाला डीव्हीबी-टी 2 हे डोंगल घ्यावे लागेल, त्यानंतर डोंगलच्याच माध्यमातून एक सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे लागेल.
  • तसेच त्यानंतर तुम्ही स्मार्ट फोन वा टॅबलेटमध्ये दूरदर्शन मोफत पाहू शकता.  
  • प्रवासादरम्यान जर तुम्हाला ही सुविधा असेल तर त्याकरिता त्या वाहनांवर लावण्यात आलेल्या वायफाय डोंगलद्वारे ही सुविधा उपलब्ध होईल.

चीनकडून ‘विज्ञान उपग्रहा’चे प्रक्षेपण :

  • गुरुत्वाकर्षण (मायक्रोग्रॅव्हिटी) आणि अवकाशामधील विविध घटकांचा अभ्यास करण्याच्या उद्देशार्थ चीनने (दि.6) एका उपग्रहाचे (SJ-10) प्रक्षेपण केले.
  • चीनमधील गोबीच्या वाळवंटातील जिउकान उपग्रहण उड्डाण केंद्रामधून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.
  • तसेच हा उपग्रह विशिष्ट काळानंतर पुन्हा पृथ्वीवर परतणार असून या काळात अवकाशात मिळविलेल्या माहितीचे पृथ:करण करणे वैज्ञानिकांना शक्‍य होणार आहे.
  • अवकाशात असताना या उपग्रहाच्या माध्यमामधून अवकाशातील विविध घटकांची माहिती मिळविण्यासाठी एकूण 19 वैज्ञानिक प्रयोग केले जाणार आहेत.
  • तसेच या प्रयोगांमध्ये अवकाशात मानवी प्रजननाच्या शक्‍यतेविषयीची माहिती मिळविण्यासंदर्भातील प्रयोगाचाही समावेश आहे, याचबरोबर, या वैज्ञानिक मोहिमेमध्ये अवकाशामधील किरणोत्साराचाही अभ्यास केला जाणार आहे.
  • चीनच्या महत्त्वाकांक्षी वैज्ञानिक उपग्रह कार्यक्रमाच्या माध्यमामधून अवकाशात प्रक्षेपित केला जाणारा हा दुसरा उपग्रह आहे.

भारताला संरक्षण क्षेत्रात अमेरिकेकडून सहकार्य :

  • संरक्षण क्षेत्रामध्ये भारताबरोबर अतिशय जवळचे आणि मजबूत संबंध निर्माण करण्याची अमेरिकेची इच्छा असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऍश्‍टन कार्टर यांनी (दि.6) दिली.
  • कार्टर हे लवकरच भारताचा दौरा करणार असून, या दौऱ्यावेळी भारत-अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी मोठी घोषणा करण्यात येणार असल्याचेही अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले.
  • भारताबरोबर अतिशय जवळचे संबंध निर्माण करण्याचा अमेरिकेचा मानस आहे, संरक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही.
  • तसेच व्दिपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
  • आधुनिक तंत्रज्ञान भारताला देण्यात येईल, संरक्षण क्षेत्राला लागणाऱ्या साहित्याची निर्मिती भारतातच संयुक्तपणे करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा होणार आहे.
  • वॉशिंग्टनमधील सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज (सीएसआयएस) मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी कार्टर यांनी ही माहिती दिली.

बिहारमध्ये दारूबंदी लागू :

  • बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या सरकारने राज्यात संपूर्ण दारूबंदी जाहीर केली आहे.
  • देशी बनावटीच्या परदेशी दारूसह सर्व प्रकारची दारू आता राज्यात विकता येणार नाही.
  • मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दारूबंदीची घोषणा केली.
  • बिहारमध्ये आता बार, रेस्टॉरंटस व अन्य कुठेही दारू मिळणार नाही.
  • तसेच त्यांच्या सरकारने 1 एप्रिलला ग्रामीण भागात देशी व इतर दारूवर बंदी घातली होती, पण गावे व शहरात परदेशी दारूच्या विक्रीला परवानगी कायम ठेवली होती.
  • परंतु लोकांनी विशेष करून महिलांनी दारूबंदीला चार दिवसात पाटणा व इतर शहरात प्रचंड मोठा प्रतिसाद दिल्याने दारूवर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • आता 1991 चा नियम लागू केला असून केवळ नीरा पिण्यास परवानगी असून ताडीला बंदी घालण्यात आली आहे. नीरा व ताडी पामच्या झाडापासून काढली जाते.

दिनविशेष :

  • 1920 : पंडित रविशंकर, भारताचे प्रसिध्द सतारवादक यांचा जन्म.
  • 1964 : आय.बी.एम. तर्फे सिस्टम/360 (System/360) ची घोषणा.
  • 1982 : सोंजय दत्त, भारतीय वंशाचा अमेरिकन व्यावसायिक कुस्तीगीर यांचा जन्म.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 एप्रिल 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.