Current Affairs of 5 April 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (5 एप्रिल 2018)

चालू घडामोडी (5 एप्रिल 2018)

सर्वात दूर असणाऱ्या ताऱ्याचा ‘नासा’कडून शोध

  • नासाच्या अंतराळ दुर्बिणीने आतापर्यंतचा सर्वात लांबचा तारा शोधून काढला आहे.
  • विश्वाच्या मध्यावर निळया रंगात असणाऱ्या या विशाल ताऱ्याचे नाव ‘इकारस’ असे ठेवण्यात आले आहे.
  • तसेच हा तारा इतका दूर आहे की, या ताऱ्याचा सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी नऊ अब्ज वर्षे लागतील. तर जगातील सर्वात मोठय़ा दुर्बिणीनेही हा तारा धूसर दिसू शकतो.
  • गुरुत्वाकर्षण लेन्सिंग नावाच्या प्रक्रियेमुळे धूसर तारा चमकू शकतो. यामुळे खगोलशात्रज्ञ दूरवरील ताऱ्यांनाही पाहू शकतात.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 एप्रिल 2018)

भारताच्या गुरुराजाची वेटलिफ्टींग प्रकारात रौप्यपदकाची कमाई :

  • ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा प्रकारात भारताने पहिल्या दिवशी धडाकेबाज सुरुवात केली आहे.
  • 56 किलो वजनी गटात भारताच्या गुरुराजाने वेटलिफ्टींग प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली आहे.
  • तीन प्रयत्नांमध्ये 249 किलो वजन उचलत गुरुराजाने भारताला पहिलं यश मिळवून दिलं आहे.
  • या प्रकारात मलेशियाच्या अझर अहमदने सुवर्ण तर श्रीलंकेच्या चतुरंगा लकमलने कांस्यपदकाची कमाई केली आहे.

नासा मंगळावर पाठविणार यांत्रिक माश्या :

  • नासा मंगळावर यांत्रिक माश्या पाठविणार आहे, तर मंगळासंदर्भात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संशोधन करण्यासाठी नासाकडे 230 प्रस्ताव आले होते. त्यातील एक प्रस्ताव यांत्रिक माश्या पाठविण्याबाबतचा होता.
  • या यांत्रिक माश्यांना ‘रोबोटिक बीज’ असे नाव देण्यात आले आहे.
  • मंगळावरील वातावरण पृथ्वीपेक्षा विरळ आहे. त्यामुळे या ग्रहावर उड्डाणासाठी या माश्यांचे पंख मोठ्या आकाराचे असतील. अमेरिकी व जपानी शास्त्रज्ञांनी संयुक्त संशोधनातून यांत्रिक माश्या बनविल्या आहेत. त्यांच्या शरीरात सेन्सर, वायरलेस संपर्क आदी उपकरणे बसविण्यात आली आहेत. मंगळावर भूप्रदेशाची मापे घेणे, खडक, माती आदींचे नमुने गोळा करणे, जीवसृष्टीचे अस्तित्व आढळल्यास त्याचे पुरावे गोळा करणे ही कामे या यांत्रिक माश्या करणार आहेत. तर या यांत्रिक माश्यांचे मोबाइल बेसद्वारे रिचार्जिंग होणार आहे.

युआयडीकडून ‘व्हर्च्युअल आयडी’ सुविधेला सुरुवात :

  • युआयडीकडून ‘व्हर्च्युअल आयडी’ सुविधेला सुरुवात झाली असून आता आधार क्रमांकाऐवजी संग्रहित छायाचित्र वापरता येणार आहेत.
  • आजवर ज्या कामांसाठी आपला आधार क्रमांक द्यावा लागत होता. त्यासाठी आता तो देण्याची गरज भासणार नाही. तर केवळ हा व्हिआयडी सांगितला तरी चालणार आहे.
  • याचा सर्वांत मोठा फायदा हा असेल की लोकांना वारंवार आपला आधार क्रमांक दुसऱ्यांना सांगावा लागणार नाही. एकूणच हा व्हिआयडी आधार क्रमांकासाठी प्राथमिक स्वरुपातील पर्याय म्हणून वापरता येणार आहे.

दिनविशेष :

  • अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते 5 एप्रिल 2000 मध्ये डी. डी. – 10 या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.
  • 1908 मध्ये स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांचा जन्म झाला.
  • स्वातंत्र्यशाहीर शंकरराव निकम यांचे 1917 मध्ये निधन झाले.
  • 1922 मध्ये आर्य महिला समाज च्या संस्थापिका पंडिता रमाबाई यांचे निधन झाले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 एप्रिल 2018)

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.