Current Affairs of 4 November 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (4 नोव्हेंबर 2015)

लिओनेल मेस्सीची टाटा मोटर्सचा जागतिक ब्रॅंड ऍम्बेसिडर :

  • चार वेळा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा मान मिळवणारा अर्जेटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची टाटा मोटर्सचा जागतिक ब्रॅंड ऍम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
  • टाटा मोटर्सने कंपनीच्या प्रवासी वाहनांच्या प्रसिद्धीसाठी मेस्सीची निवड केली आहे.
  • जागतिक कीर्तीचा फुटबॉलपटू असलेला मेस्सी प्रथमच एका भारतीय ब्रॅंडची जाहिरात करणार आहे.
  • टाटा मोटर्सने मेस्सीसोबत दोन वर्षे मुदतीचा करार केला असून त्याच्या कालावधीत वाढ होण्याची शक्‍यता आहे.

46व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला 20 नोव्हेंबर रोजी प्रारंभ :

  • अनिल कपूर, देव पटेल आदींसारख्या दिग्गज अभिनेत्यांच्या उपस्थितीमध्ये 46व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला 20 नोव्हेंबर रोजी येथे प्रारंभ होणार आहे.
  • आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणितज्ज्ञ रामानुजन यांच्या जीवनावर आधारित “द मॅन हू न्यू इन्फिनिटी” हा चित्रपट या महोत्सवाच्या प्रारंभी दाखविण्यात येईल.
  • यंदा या महोत्सवामध्ये 89 देशांमधील 187 चित्रपट दाखविले जाणार असल्याचे माहिती आणि प्रसारणमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सोन्याच्या बाँड्‌सची बहुचर्चित योजना प्रत्यक्षात सुरू :

  • सोन्याच्या प्रत्यक्ष खरेदीला पर्याय म्हणून सोन्याच्या बाँड्‌सची बहुचर्चित योजना प्रत्यक्षात सुरू होत असून, सोन्याचे बाँड्‌स येत्या 5 ते 20नोव्हेंबरदरम्यान  विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत.
  • रिझर्व्ह बँकेकडून सुवर्ण रोख्यांची किंमत प्रति ग्रॅम 2,684 रुपये एवढी ठरविण्यात आली आहे.
  • सरकारतर्फे हे बाँड्‌स आणले जाणार असून, यावर ग्राहकांना 2.75 टक्के व्याज मिळणार आहे.
  • सरकारने सुवर्ण रोख्याची किंमत जाहीर केली आहे.
  • मागील आठवड्यातील शुद्ध सोन्याचा (99.9%) दर सरासरी किंमतीवरून (ऑक्टोबर 26-30) ठरविण्यात आला आहे.
  • इंडिया बुल्यन आणि ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडने प्रसिद्ध केलेल्या सोन्याचा दरावरून सुवर्ण बॉड्सचा दर निश्चित केला आहे.
  • ग्राहकांना या योजनेअंतर्गत किमान 2 ग्रॅमपासून कमाल 500 ग्रॅमपर्यंतच्या मूल्याचे सोन्याचे बॉंड खरेदी करता येणार आहेत.
  • या बाँड्‌ससाठी 5 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
  • हे बॉंड 26 नोव्हेंबरला ग्राहकांना देण्यात येतील.
  • बॅंका आणि टपाल खात्याच्या ठराविक कार्यालयात हे बॉंड विक्रीसाठी ठेवले जाणार आहेत.
  • सोन्याच्या बाँड्‌स योजनेतील हा पहिला टप्पा असून, पुढील टप्प्याची घोषणा नंतर करण्यात येणार आहे.
  • या बॉंडची मुदत आठ वर्षांची असून, पाच वर्षांनंतर यातून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
  • आधीच्या आठवड्यातील सोन्याच्या सरासरी बाजारभावानुसार या बॉंडची किंमत ठरविली जाणार आहे.
  • तसेच, या बॉंडमधून बाहेर पडतानाही याचप्रकारे किंमत निश्‍चित केली जाणार आहे.
  • सोन्याच्या बॉंडवरील व्याज करपात्र असणार आहे.

सुंदर रामन यांचा पदाचा राजीनामा :

  • इंडियन प्रिमियर लीगचे (आयपीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) सुंदर रामन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांचा राजीनामा मंजूर केला असून, याबाबतची अधिकृत घोषणा 5 नोव्हेंबरला होणार आहे.

‘भारतरत्न ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत योजना’ सुरू करण्यात येणार :

  • आदिवासी गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी सहा महिने एक वेळचा चौरस आहार देण्यासाठी ‘भारतरत्न ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत योजना’ सुरू करण्यात येणार आहे.
  • मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.
  • या योजनेचा लाभ दरवर्षी 1 लाख 90 हजार महिलांना मिळेल.
  • मुलांमध्ये चेतना निर्माण करण्याच्या डॉ. कलाम यांच्या कार्याचा गौरव म्हणून या योजनेला ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत योजना’ असे नाव देण्यात आले आहे.
  • ही योजना राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यांतील 85 एकात्मिक बाल विकास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे.
  • आहारामध्ये चपाती अथवा भाकरी, भात, कडधान्ये-डाळ, सोया दूध, शेंगदाणा लाडू, अंडी किंवा केळी अथवा नाचणी हलवा, फळे, पालेभाज्या, खाद्यतेल, गूळ अथवा साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला इत्यादींचा समावेश असेल.
  • तसेच हा आहार खरेदी करण्यासाठी एका अंगणवाडीसाठी एक चार सदस्यीय आहार समिती नियुक्त करण्यात येईल.
  • या समितीला आहार घटक खरेदी करण्याचे अधिकार राहतील.

पुन्हा मुलींसाठी बेटी बचाओ- बेटी पढाओ कार्यक्रम :

  • मुलींचा जन्मदर घटल्याने केंद्र तसेच राज्य शासनाकडून गेल्या काही वर्षांपासून ह्य बेटी बचाओ- बेटी पढाओ कार्यक्रम राबविला जात आहे.
  • मात्र 2011 च्या जनगणनेनुसार काही जिल्ह्यांमध्ये अपेक्षित उद्दिष्टपूर्ती दिसून येत नसल्याने हा कार्यक्रम पुन्हा 2017 पर्यंत राबविण्यात येणार आहे.
  • सदर कार्यक्रम राबविण्यासाठी राज्यातील 10 पश्‍चिम विदर्भातील बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांसोबतच राज्यातील बीड, जालना, औरंगाबाद, जळगाव, अहमदनगर, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर या 10 जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येवून मुलींचा घसरलेला जन्मदर वाढविण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जाणार आहे.
  • यामध्ये लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री देणे, मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे ही उद्दिष्ट्ये राहणार आहेत.
  • तसेच महिला व बालविकास विभागाने जिल्हा कृती आराखडा तयार केला आहे.
  • प्रत्येक जिल्ह्यात पीसीपीएनडीटी संबंधी टास्क फोर्स जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात येणार आहे.
  • या टास्क फोर्सची महिन्यातून एकदा तर कार्यकारी समितीची तीन महिन्यातून एकदा बैठक घेतली जाणार असून मार्गदर्शन व आढावा घेतल्या जाईल.
  • दर कार्यक्रम केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असून प्रत्येक जिल्हानिहाय यावर 119.96 लाख रुपये खर्च केल्या जाणार आहे.

 

शोएब मलिक निवृत्तीची घोषणा :

  • तब्बल पाच वर्षांच्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन करणारा पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज शोएब मलिक याने निवृत्तीची घोषणा केली.

    ट्वीटरद्वारे आपल्या निवृत्तीची माहिती देताना मलिकने इंग्लंड विरुध्द सुरु असलेल्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना आपला अखेरचा सामना असेल असे स्पष्ट केले.

  • 33 वर्षीय मलिकने या मालिकेद्वारे तब्बल 5 वर्षांच्या काळानंतर यशस्वी पुनरागमन केले होते.

शिव थापा जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी :

  • गेल्या महिन्यात झालेल्या विश्व अजिंक्यपद मुष्टियुद्ध स्पर्र्धेतील कांस्य पदकविजेत्या भारताच्या शिव थापा याने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
  • अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय मुष्टियोद्धा ठरला आहे.
  • थापा याने 56 किलो वजनीगटात 1550 गुणांसह दुसरे स्थान पटकाविले आहे.
  • याच गटात विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदकविजेता आयर्लंडचा मायकल कोनलान 2150 अंकांसह अव्वलस्थानी आहे.
  • भारताचा हा बावीस वर्षीय मुष्टियोद्धा विजेंदर सिंह (2009, कांस्य), विकास कृष्ण (2011, कांस्य) यांच्या नंतर अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय आहे
  • दोहा स्पर्धेच्या उपांत्यफेरीत पराभूत झालेला विकास 75 किलो मिडलवेट गटात सहाव्या स्थानी, तर 91 किलो वजनीगटाच्या सुपर हेवीवेट गटातील सतीश कुमार सातव्या स्थानी आहे.
  • आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्य पदकविजेता देवेंद्रो सिंह 49 किलो वजनीगटात 13 व्या स्थानी आहे.

दिनविशेष :

  • 1951राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी, अमेरिका, एन.एस.ए. ची स्थापना.
  • 1845 : वासुदेव बळवंत फडके, भारतीय क्रांतिकारक यांचा जन्मदिन

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.