Current Affairs of 5 November 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (5 नोव्हेंबर 2015)

चालू घडामोडी (5 नोव्हेंबर 2015)

“पवनहंस” कंपनीचे हेलिकॉप्टर अरबी समुद्रात कोसळले :

 • अंधारात उतरण्याचा सराव सुरू असताना “पवनहंस” कंपनीचे हेलिकॉप्टर अरबी समुद्रात कोसळले.
 • हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आहेत.
 • जुहू येथील एअरोड्रमहून हेलिकॉप्टरने उड्डाण केले.
 • खवळलेल्या समुद्रात अंधारात लॅन्डिंगचा सराव करण्याचा प्रयत्न सुरू असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आणि हेलिकॉप्टर कोसळले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवव्या स्थानावर :

 • फोर्ब्ज मासिकाने जाहीर केलेल्या जगातील सर्वाधिक शक्तीशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी नवव्या स्थानावर आहेत.

  Narendra Modi

 • गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या यादीत त्यांचा क्रमांक 15वा होता.
 • मासिकाने 2015 सालासाठी जाहीर केलेल्या यादीत रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर असून, जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल यांनी तीन स्थानांनी प्रगती करत दुसरे स्थान मिळवले आहे.
 • अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची एका स्थानाने घसरण होऊन तिसऱ्या स्थानी पोचले आहेत, तर मोदींनी आघाडीच्या दहा नेत्यांमध्ये स्थान मिळविले.
 • अन्य राजकीय व्यक्तींमध्ये चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग पाचव्या आणि ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन आठव्या स्थानी आहेत.
 • अन्य व्यक्तींमध्ये पोप फ्रान्सिस चौथ्या आणि मायक्रोसॉफ्टस्‌चे बिल गेट्‌स सहाव्या स्थानावर आहेत.

संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या 23 नोव्हेंबरपासून सुरू :

 • संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या 23 नोव्हेंबरपासून सुरू होऊन ते 23 डिसेंबरपर्यंत चालेल, असे संकेत एका वरिष्ठ भाजप नेत्याने आज दिल्लीत दिले.
 • संसद अधिवेशनाच्या तारखा ठरविण्याबाबत मंत्रिमंडळाच्या संसदीय समितीची (सीसीपीए) बैठक मागच्या महिन्यात झाली व तीत अधिवेशनाच्या तारखाही निश्‍चित झाल्या.

मालदीवचे अध्यक्ष यांची आणीबाणी लागू करण्याची घोषणा :

 • देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे कारण देत मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी 30 दिवसांसाठी आणीबाणी लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली.
 • मालेतील अध्यक्षांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर स्फोटके आणि शस्त्रसाठा आढळून आला होता. त्यानंतर लष्कराला सर्वाधिकार देत आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
 • देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याचे कारण पुढे करत मालदीवमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली असल्याचेही प्रवक्‍त्याने सांगितले.

याच महिन्यात मॅगीची किरकोळ विक्री सुरू होणार :

 • मॅगी नूडल्स आरोग्यासाठी सुरक्षित असल्याचा कौल सरकारी प्रयोगशाळांनी दिला असून याच महिन्यात मॅगीची किरकोळ विक्री सुरू होणार असल्याची Maggiमाहिती नेस्ले कंपनीकडून देण्यात आली आहे.
 • कंपनीच्या नांजनगुड (कर्नाटक), मोगा (पंजाब) व बिचोलिम (गोवा) येथील प्रकल्पातून तयार करण्यात आलेल्या मॅगी नूडल्स मसालाची मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारी प्रयोगशाळांमध्ये चाचणी झाली आहे.
 • या प्रयोगशाळांनी मॅगी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे, असे कंपनीने सांगितले आहे.
 • आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन पुर्ण झाल्याने आम्ही या महिन्यात पुन्हा एकदा मॅगीची विक्री सुरू करणार आहोत.
 • तसेच ज्या राज्यांमध्ये परवानगीची गरज लागेल तेथेही त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असे नेस्लेने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 • त्याशिवाय नेस्ले ताहलीवाल व पंतनगर येथील प्रकल्पांमधून मॅगी नूडल्सचे उत्पादन सुरू करणार आहे.
 • नेस्ले इंडियाने मॅगी नूडल्सच्या 20 कोटी पॅकेट्सच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळांमध्ये तब्बल 3,5000 चाचण्या केल्या असून सर्व चाचण्यांमध्ये मॅगी सुरक्षित आढळून आल्याचे कंपनीने सांगितले आहे.

भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्या. टी. एस. ठाकूर यांची निवड :

 • भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्या. टी. एस. ठाकूर यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
 • न्या. ठाकूर हे सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश असून ते विद्यमान सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्याकडून 2 डिसेंबर रोजी पदभार स्वीकारणार आहेत.
 • सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांनी न्या. ठाकूर यांच्या नावाची शिफारस केली.
 • विधी मंत्रालयाने न्या. ठाकूर यांच्या नियुक्तीला हिरवा कंदील दाखविल्यानंतर त्याबाबतची फाइल पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
 • त्यानंतर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी त्याला मान्यता दिल्यानंतर त्याबाबतचा आदेश जारी केला जाणार आहे.
 • न्या. ठाकूर हे भारताचे 43 वे सरन्यायाधीश असतील.
 • न्या. ठाकूर यांचा जन्म 4 जानेवारी 1952 रोजी झाला.
 • त्यांनी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात आपली कारकीर्द सुरू केली आणि दिवाणी, फौजदारी, करविषयक आदी सर्व प्रकारचे खटले लढविले.
 • न्या. ठाकूर यांची 17 नोव्हेंबर 2009 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

फ्लोरिडा विद्यापीठाचे संशोधन :

 • वैज्ञानिकांनी नासातील दुर्बिणींच्या मदतीने मोठा दीर्घिकासमूह शोधून काढला असून तो 8.5 अब्ज प्रकाशवर्षे दूर आहे.
 • एवढय़ा लांब अंतरावर इतक्या जास्त वस्तुमानाचा असा समूह सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 • दीर्घिकासमूह हे हजारो दीर्घिका गुरुत्वीय बलाने बांधल्या गेल्याने तयार होत असतात.
 • त्यात अब्जावधी तारे असतात व दीर्घिका समूह कालांतराने मोठे होत जातात व कारण त्यात आणखी दीर्घिकांची भर पडत जाते.
 • बऱ्याच काळात तयार झालेले हे दीर्घिकासमूह अब्जावधी वर्षांपूर्वी होते तसे दिसत आहेत.
 • आपले विश्व तरुण असतानाचा तो काळ होता.
 • प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचण्यास वेळ लागत असल्याने या दीर्घिकासमूहांकडून फार वर्षांपूर्वी निघालेला प्रकाश आता आपल्याला दिसतो. म्हणजे तेव्हाची स्थिती आता आपल्याला दिसत आहे.
 • नवीन दीर्घिकासमूह मासिव्ह ओव्हरडेन्स ऑब्जेक्ट जे 1942 प्लस 1527 या नावाने ओळखला जातो व तो 8.5 अब्ज वर्षांपूर्वीचा आहे म्हणजे पृथ्वीच्या जन्माच्या खूप आधीचा आहे.
 • दूरस्थ दीर्घिकांचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत असतो व येताना त्याची तरंगलांबी अवरक्त किरणांसारखी वाढते.नासाच्या स्पिटझर व वाइड फिल्ड इन्फ्रारेड सव्‍‌र्हे एक्सप्लोरर (वाइज) या दुर्बिणींनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे संशोधन करण्यात आले आहे.
 • वैज्ञानिकांनी प्रथम वाइजच्या नोंदणीतील दीर्घिकांची छाननी केली.
 • वाइजच्या नोंदणीत 2010 ते 2011 या काळात घेतलेल्या प्रतिमांच्या स्वरूपात लाखो अवकाशीय पदार्थाची नोंद आहे.
 • नंतर त्यांनी स्पिटझर दुर्बिणीच्या माध्यमातून 200 पदार्थावर लक्ष केंद्रित केले.
 • त्या प्रकल्पाचे नाव ‘मॅसिव्ह अँड डिस्टंट क्लस्टर्स ऑफ वाइज सव्‍‌र्हे’ असे होते.
 • स्पिटझर व वाइज यांच्या संयुक्त वापराने अवकाशातील अनेक दीर्घिकासमूह शोधण्यात आले, असे फ्लोरिडा विद्यापीठाचे अँथनी गोन्झालेझ यांनी सांगितले.
 • हवाई बेटांवरील मौना किया येथील डब्लूएम केक व जेमिनी वेधशाळेने या दीर्घिकासमूहाचे अंतर 8.5 अब्ज प्रकाशवर्षे असल्याचे सांगितले.
 • आताचा दीíघकासमूह हा त्या काळातील पाच मोठय़ा समूहांपैकी एक आहे.
 • येत्या वर्षांत 1700 दीर्घिकासमूहांचे अभ्यास स्पिटझर दुर्बिणीच्या मदतीने करणार आहे.
 • ‘अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

दिनविशेष :

 • जागतिक रंगभूमी दिनDinvishesh
 • 1945 : कोलंबीया संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील
 • 2007 : चायनाचा प्रथम चंद्र उपग्रह चंद्राभोवतीच्या कक्षेत स्थापीत
 • 2013 : मार्स ऑर्बिटर मिशन उर्फ मंगळयानचे श्रीहरीकोटा येथून यशस्वी उड्डाण

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.