Current Affairs of 4 June 2015 For MPSC Exams
देशभरात झाडे लावण्याची “हरित मोहीम” सुरू करण्यात येणार :
- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशभरात झाडे लावण्याची “हरित मोहीम” सुरू करण्यात येणार आहे.
- त्याचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या 7 रेसकोर्स मार्ग या निवासस्थानी रोपटे लावून करणार असल्याची माहिती पर्यावरण व वन राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
- या निमित्तानेच पुण्यात संपादन करण्यात आलेल्या 70 एकर जमिनीत चार हजार झाडे लावण्याचा कार्यक्रमही अमलात आणला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- पाच जून रोजी होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू करण्यात आल्यावर पर्यावरण भवनातही झाडे लावण्याचा कार्यक्रम होणार आहे.
- तसेच शहरांमध्ये हरित कवच म्हणजेच वनीकरण व वृक्षारोपण वाढविण्यासाठी “नगर वन उद्यान योजना” किंवा “नागरी वनीकरणाची योजना” आखण्यात आली आहे.
Must Read (नक्की वाचा):
भारत आणि अमेरिका दहा वर्षांच्या संरक्षण आराखडा करारावर स्वाक्षरी :
- भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकणाऱ्या दहा वर्षांच्या संरक्षण आराखडा करारावर आज स्वाक्षरी करण्यात आली.
- संरक्षण सामग्री आणि तंत्रज्ञानाचा संयुक्तपणे विकास आणि उत्पादन करण्याचा मुद्दा यामध्ये अंतर्भूत करण्यात आला आहे.
- या करारामुळे जेट इंजिनाचे तंत्रज्ञान आणि बांधणी संयुक्तपणे विकसित केली जाणार आहे.
- याशिवाय, उच्च तंत्रज्ञान असलेल्या मोबाईल पॉवर स्रोत आणि रासायनिक तसेच जैविक युद्धापासून बचाव करणाऱ्या अत्याधुनिक संरक्षण पोशाखाबाबत करण्यात येणाऱ्या करारांचाही अंतिम मसुदा निश्चित करण्यात आला.
- संरक्षण आराखडा करारामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संरक्षण संबंध आणि व्यूहात्मक भागीदारी पुढील दहा वर्षांसाठी मार्गदर्शक ठरेल असे म्हटले आहे.
- कार्टर यांनी यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
- करारातील मुद्दे
- 1. सुरक्षा आणि प्रशिक्षणावर भर
- 2. संरक्षण तंत्रज्ञानाचा संयुक्तपणे विकास
- 3. संरक्षण क्षमता वाढविणे
- 4. उच्च पातळीवर संरक्षण चर्चा
- 5. “मेक इन इंडिया”अंतर्गत उत्पादन
क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्यावर भारतीय ‘अ’ संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी :
- माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्यावर भारतीय ‘अ’ संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
- द्रविडवर बीसीसीआय प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
- बीसीसीआयने नुकतेच सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्हिव्हिएस लक्ष्मण यांची सल्लागार समितीत निवड करण्यात आली आहे.
- तसेच बांगलादेश दौऱ्यासाठी संघ व्यवस्थापनात कोणताही बदल न करता रवी शास्त्री यांनाच संचालक ठेवण्यात आले आहे.
- त्यामुळे द्रविडकडे मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगातील पहिल्या दहा गुन्हेगारांच्या यादीत :
- सर्च इंजिन असलेल्या गुगलने पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगातील पहिल्या दहा ‘टॉप 10 क्रिमिनल्स’ म्हणून शोध घेतला असता कुख्यात दहशतवादी लादेन, दाउद सोबत मोदींचे छायाचित्र झळकत आहे.
- तसेच गुगलवर चुकीची माहिती येण्याची ही पहिलीच वेळ नसून 2009 मध्येही अमेरिकेची प्रथम महिला मिशेल ओबामा यांच्याबाबतही चुकीची माहिती दाखविण्यात आली होती.
अमेरिका फ्रीडम लॉ वर अध्यक्ष बराक ओबामा यांची स्वाक्षरी :
- अमेरिका स्वातंत्र्य कायद्यावर (अमेरिका फ्रीडम लॉ) अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वाक्षरी केली आहे.
- हा अतिशय महत्त्वाचा कायदा असून त्यात लोकांच्या फोनची माहिती चोरणे बंद केले जाणार आहे.
- यात लोकांच्या फोनबाबत गोळा केलेला मेटाडाटा दूरसंचार कंपन्यांना परत दिला जाणार आहे. तो सरकारकडे ठेवला जाणार नाही.
जीवनगौरव पुरस्कारासाठी सावरकर आणि देशपांडे यांची निवड :
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने यंदाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे.
- हा सोहळा 14 जून रोजी गो.ब.देवल यांच्या स्मृतिदिनी यशवंत नाट्यमंदिर येथे सायंकाळी 7 वाजता संमेलनाध्यक्षा फैय्याज यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
- जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी रोख पंचवीस हजार रुपये, शाल,श्रीफळ, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे आहे.
दूरदर्शनच्या महासंचालकपदी वीणा जैन यांची निवड :
- माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 29 मे 2015 रोजी वीणा जैन यांची दूरदर्शनच्या महासंचालकपदी नियुक्ती केली.
- तसेच त्यांनी प्रत्येक गोष्टीचा अहवाल थेट माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला द्यावा, असे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.
- त्या वरिष्ठ भारतीय माहिती सेवा (आयआयएस) अधिकारी अक्षय राउत यांची जागा घेणार आहेत.
- वीणा जैन या महासंचालक (वृत्त) या पदाबरोबरच माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणूनही काम करणार आहेत.
- हा अतिरिक्त कार्यभार त्यांना माध्यमे आणि सोशल मीडिया यांच्यावर विशेष नजर ठेवण्याकरिता देण्यात आलेला आहे.
- कायद्यानुसार भारतीय माहिती सेवेतील (आयआयएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या करण्याचा अधिकार माहिती व प्रसारण मंत्रालयाला असला तरी त्या अधिकाऱ्यांनी प्रसार भारतीलाच उत्तरदायी असले पाहिजे.
- सध्या वीणा जैन आकाशवाणीच्या समाचार सेवा विभागाच्या अतिरिक्त महासंचालक पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी आकाशवाणीच्या प्रकाशन विभागाचे संचालक म्हणून कार्य केलेले आहे.
‘सुपर 30’चे संस्थापक आनंद कुमार यांचा कॅनडामध्ये सन्मान :
- ‘सुपर 30’चे संस्थापक आणि गणितज्ञ आनंद कुमार यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल 28 मे 2015 रोजी कॅनडामध्ये सन्मानित करण्यात आले.
- हा सन्मान त्यांना ब्रिटिश कोलंबियाच्या कायदेमंडळाद्वारे भारतातील प्रतिभावान गरीब मुलांना उच्च संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी दिला जाणाऱ्या गुणवत्ता प्रशिक्षणासाठी देण्यात आला आहे.
- ब्रिटिश कोलंबिया विधीमंडळाच्या मॅपल रिजचे प्रतिनिधी मार्क डाल्टन यांनी आनंद कुमार यांच्या सन्मानार्थ प्रशस्ती पत्र वाचले.
- सुपर-30 मागील 14 वर्षांपासून दरवर्षी मागास वर्गातील 30 विद्यार्थ्यांना ‘आयआयटी’मध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी मोफत परीक्षेची तयारी करवून घेत आहे.
आंतरराष्ट्रीय योगदिनी अमेरिकेच्या 100 शहरात योगशिबीराचे आयोजन :
- आगामी 21 जून रोजी साजरा करण्यात येणारा पहिला आंतरराष्ट्रीय योगासन दिवसाच्या निमित्ताने 100 पेक्षा अधिक अमेरिकेच्या शहरांमध्ये योगासनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
- प्रमुख आयोजक ‘ओवरसीज वॉलंटियर फॉर ए बेटर इंडिया’ने (ओव्हिबीआय) म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय योगासन दिवसानिमित्त 100 पेक्षा अधिक शहरांमध्ये योगासनाच्या आयोजनात सहभागी न्यू जर्सी-न्यूयॉर्क भागातील 15 शहरे, कॅलिफोर्नियातील सात शहरे, टेक्सासतील सहा शहरे आणि ओहायोतील तीन शहरांमध्ये योगशिबीर घेण्याचे निश्चीत झाले आहे.
- या मोहिमेमध्ये आर्ट ऑफ लिविंग सारख्या सर्व मोठ्या आध्यात्मिक आणि योगासन संघटना सहभागी झाल्या आहेत.
पन्नासपेक्षा अधिक संघटना योगसनासंबंधीत जागरूकता पसरवण्याच्या देशव्यापी मोहिमेमध्ये सहभागी झाल्या आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावानंतर तीन महिन्यांपेक्षा कमी वेळात संयुक्त राष्ट्राने मागील वर्षी 11 डिसेंबर रोजी घोषणा केली होती की, 21 जून रोजी जागतिक योगासन दिवसांच्या स्वरूपात साजरा केला जावा.
एस. चंद्र दास श्रीलंकेत सिंगापुरचे राजदूत म्हणून नियुक्ती :
- सिंगापूरने 27 मे 2015 रोजी भारतीय वंशाच्या एस. चंद्र दास यांची श्रीलंकेत राजदूत म्हणून नियुक्ती केली. सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ही घोषणा केली.
- एस. चंद्र दास यापूर्वी तुर्कीमध्ये सिंगापूरचे राजदूत होते. तसेच त्यांनी सोव्हिएत युनियनमध्ये सिंगापुरचे व्यापार प्रतिनिधी म्हणून 1970 पासून 1972 पर्यंत काम केले आहे.
- दास 1980 ते 1996 पर्यंत सिंगापूरमध्ये खासदार होते. सध्या ते सिंगापूरच्या एनयूआर गुंतवणूक आणि व्यापार प्रा.लि. आणि इतर अनेक कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
पंतप्रधानांना भेटल्या 3.11 लाखांच्या भेटवस्तू :
- दहा महिन्यांतील परदेश दौऱ्यांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 3.11 लाख रुपये किमतीच्या भेटवस्तू मिळाल्या आहेत, असे माहिती अधिकार कायद्यातून उघड झाले आहे.
- गेल्या 19 फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी यांना सोने व हिऱ्यांनी जडलेला ‘कफलिंक’ भेट म्हणून मिळाला होता.
त्याची किंमत 75 हजार रुपये इतकी आहे. पंतप्रधानांनीही आपल्या दोन दौऱ्यात तेथील राष्ट्रप्रमुखांना चहाचा संच आणि पुस्तके भेट दिली आहे.
- पंतप्रधानांना मिळालेल्या अन्य भेटवस्तूंमध्ये गौतम बुद्धाची प्रतिमा, चिनी मातीची भांडी, मंदिराची प्रतिकृती, दुर्मिळ चित्रे, गालिचा, छायाचित्रे आणि अन्य दागिन्यांचा समावेश आहे.
राष्ट्रपती दोन स्वीडन आणि बेलारूस देशांच्या दौऱ्यावर :
- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी रविवारी स्वीडन आणि बेलारूस या दोन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. त्यांचा हा दौरा पाच दिवसांचा राहणार आहे. या देशांना भेट देणारे प्रणव मुखर्जी हे भारताचे पहिलेच राष्ट्रपती ठरणार आहेत.
- त्यांच्या या दौऱ्याच्या काळात अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात येणार आहेत.
- स्वीडनच्या दौऱ्यात राजधानी स्टॉकहोम येथे आगमन झाल्यानंतर या देशाचे नरेश आणि महाराणी हे स्वत: आपल्या राजमहालात राष्ट्रपतींचे शाही स्वागत करणार आहेत.
- घोड्यांच्या बग्गीतून त्यांना राजमहालापर्यंत आणण्यात येणार आहे. तीन दिवस स्वीडनमध्ये मुक्काम केल्यानंतर ते बेलारूसला रवाना होतील.
- पासून लागू होईल. यातून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभामुळे 2014-15 या वर्षासाठी सरकारी खजिन्यावर 128 कोटी रुपयांचा बोजा पडेल. 2011च्या जनगणनेनुसार शहरांचे वर्गीकरण केले जावे, असा प्रस्ताव अर्थखात्याचा होता.
रेल्वेतील सुधारणांसाठी ‘आयटी व्हिजन’ योजना :
- रेल्वेसाठी ‘इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी व्हिजन’ तयार करण्याची योजना रेल्वे मंत्रालयाने आखली असून, त्यासाठी एका सल्लागार मंडळाची स्थापनाही मंत्रालयातर्फे करण्यात आली आहे.
- रेल्वेच्या एकंदर कारभारातील वर्तमान माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग, त्याची व्याप्ती वाढविणे आणि रेल्वेशी निगडित मुद्द्यांच्या सोडवणुकीसाठी एक कायमस्वरूपी यंत्रणेची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
- नॅसकॉम’चे माजी अध्यक्ष सोम मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली हे सल्लागार मंडळ काम करणार असून, यामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अग्रगण्य तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. एकंदर बारा जणांचे हे मंडळ असेल व दिल्लीतच त्यांचे मुख्य कार्यालय राहणार आहे.
- सल्लागार मंडळाच्या कार्यकक्षेत पुढील मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे
- 1. रेल्वेच्या एकंदर उद्दिष्टांशी सुसंगत अशा सर्वसमावेशक माहिती तंत्रज्ञान भविष्यदर्शी योजना तयार करणे.
- 2. यामध्ये माहिती तंत्रज्ञान, संज्ञापन (कम्युनिकेशन), दूरसंचार यांचा समावेश. वर्तमान माहिती तंत्रज्ञानाच्या वापराचा आढावा घेऊन त्याचा नव्या भविष्यदर्शी (व्हिजन) योजनेत समावेश.
- 3. प्रामुख्याने प्रवासी सेवा, मालवाहतूक, रेल्वे मालमत्ता व्यवस्थापन, रेल्वेगाड्यांची वाहतूक, सुरक्षा व प्रवाशांची सुरक्षा व एकंदर रेल्वे व्यवस्थापन यावर विशेष भर.
- 4. या भविष्यदर्शी योजनेची अंमलबजावणी आणि त्याचे पूर्णत्व याचे वेळापत्रक आणि त्याबद्दलची रणनीती सुचविणे.
- 5. रेल्वेच्या क्षमतेत वाढ करण्याबरोबरच व्यवस्थापन बदल आणि आयटी कारभार यांची परिणामकारक योजना सुचविणे.
- 6. रेल्वेच्या मुद्द्यांबाबत माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तोडगे सुचविणारे कायमस्वरूपी पोर्टलची निर्मिती करणे. या माध्यमातून नवनव्या संकल्पनाही सुचविल्या जाणे अपेक्षित राहील.