Current Affairs of 3 June 2015 For MPSC Exams

current affaire on 3 june 2015

फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष सेप ब्लॅटर यांचा राजीनामा :

  • फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष सेप ब्लॅटर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

    sep blatter

  • विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या (2018 आणि 2022) यजमानपदाचे हक्क देताना लाचखोरी केल्याचा आरोप असल्यामुळे ब्लॅटर यांना अमेरिका, इंग्लंड यांच्यासह युरोपियन फुटबॉल संघटनेने घेरले होते.
  • प्रचंड विरोध असतानाही त्यांनी अध्यक्षपदाची बहुचर्चित निवडणूक जिंकली होती.
  • ब्लॅटर सलग चौथ्यांदा निवडून आले होते.

 

Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 2 June 2015

रवी शास्त्री यांची बांगलादेश दौऱ्यासाठी संघ संचालक म्हणून निवड कायम :

  • डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाचा शोध संपलेला नसल्यामुळे रवी शास्त्री यांची आगामी बांगलादेश दौऱ्यासाठी संघ संचालक म्हणून निवड कायम ठेवण्यात आली आहे.

    ravi shastri

  • कसोटी सामना फतुल्ला येथे 10 जूनपासून सुरू होईल, तर तीन एकदिवसीय सामने मीरपूर (18, 21 आणि 24 जून) येथे होणार आहे.
  • ऑस्ट्रेलिया दौरा आणि त्यानंतरच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत शास्त्री टीम इंडियाचे संघ संचालक होते.
  • विश्‍वकरंडक स्पर्धेबरोबर फ्लेचर यांच्याशी असलेला करार संपुष्टात आल्यानंतर अजून नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू असल्यामुळे बांगलादेशच्या दौऱ्यासाठी शास्त्री यांच्याकडेच टीम इंडियाची सूत्रे देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

अभिनेते अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि प्रीती झिंटा यांच्यावर गुन्हा दाखल :

  • शरीराला अपायकारक घटक आढळलेल्या मॅगीची जाहिरात केल्याप्रकरणी madhuri dhikshitअभिनेते अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि प्रीती झिंटा यांच्यासह नेस्ले कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
  • मॅगीची प्रसिद्धी करण्यासाठी या सर्व सेलिब्रेटींवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

अमेरिकेचे संरक्षणमंत्री डॉ. ऍस्टन कार्टर तीन दिवसांच्या भारतभेटीवर :

  • अमेरिकेचे संरक्षणमंत्री डॉ. ऍस्टन कार्टर तीन दिवसांच्या भारतभेटीवर आले आहेत.
  • भारत-अमेरिका संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार पुढाकार (इंडो-यूएस डिफेन्स टेक्‍नॉलॉजी अँड ट्रेड इनिशिएटिव्ह) या कराराचे शिल्पकार म्हणून मानल्या जाणाऱ्या कार्टर यांची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जाते.
  • संरक्षणमंत्री या नात्याने कार्टर यांची ही पहिलीच भारतभेट आहे.
  • यापूर्वी जुलै 2012 व त्यानंतर सप्टेंबर 2013 मध्ये संरक्षण उपमंत्री या नात्याने त्यांनी भारताला भेट दिली होती.

बीएसएनएलतर्फे 15 जूनपासून “फ्री रोमिंग” मोबाईल सेवा :

  • सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलतर्फे 15 जूनपासून “फ्री रोमिंग” मोबाईल सेवा दिली जाणार आहे.

    bsnl

  • त्याचप्रमाणे एक जुलैपासून पूर्णपणे मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी लागू होणार आहे.
  • केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज ही घोषणा केली.
  • जुलैपासून संपूर्ण मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सेवा सुरू होणार आहे.
  • तसेच दोन प्रमुख पर्यटन स्थळांवर बीएसएनएलची वाय-फाय सेवा सुरू होणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली.

“स्टेट बॅंक ऑफ इंडिया”ची महिलांसाठीच्या “हर घर हर कार‘ नावाची योजना :

  • “स्टेट बॅंक ऑफ इंडिया”ने महिलांसाठीच्या खास योजनेमध्ये वाहनकर्जावर सूट देणारी नवी “हर घर हर कार” नावाची योजना सादर केली आहे.
  • महिलांना बळ देऊन त्यांना सक्षम करण्याच्या हेतूने एसबीआयने अलिकडेच महिलांसाठी “हर घर” नावाची योजना आणली होती.
  • या योजनेत गृहकर्जदरात 0.25 टक्के सूट देण्यात आली होती. त्यामुळे महिलांना केवळ 10 टक्के व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध झाले होते.
  • “हर घर हर कार” या योजनेमध्ये महिलांना 10 टक्के कर्जदराने वाहनकर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • तसेच या योजनेशिवाय वाहनकर्ज घेणाऱ्या महिलांना 10.25 टक्के व्याजदराने वाहनकर्ज उपलब्ध आहे.

29 जुलैपासून “विंडोज टेन” विनामूल्य उपलब्ध :

  • विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम वापरत असलेल्या जगभरातील युजर्ससाठी 29 जुलैपासून “विंडोज टेन” विनामूल्य उपलब्ध होणार आहे.
  • अलिकडेच मायक्रोसॉफ्टच्यावतीने त्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे.windows 10
  • यापूर्वीच्या “विंडोज”च्या व्हर्जनमधून वगळण्यात आलेल्या स्टार्ट मेन्युचा “विंडोज टेन”मध्ये पुन्हा समावेश करण्यात आला आहे.
  • स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी तसेच अधिकाधिक युजर्सपर्यंत पोचण्यासाठी मायक्रोसॉफ्टने जानेवारीमध्ये विंडोज 7 आणि विंडोज 8.1 वापरकर्त्यांसाठी विनामूल्य अपग्रेडेशनची सुविधा देण्याची जानेवारीमध्ये घोषणा केली होती.
  • “विंडोज टेन‘ हे होम, मोबाईल, प्रो, एंटरप्राईज आणि एज्युकेशन एडिशनमध्ये उपलब्ध आहे.
  • त्यापैकी होम एडिशनम अधिकाधिक ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आली आहे.
  • त्यामुळे ती डेस्कटॉप पीसीज्‌, लॅपटॉप्स आणि अन्य डिव्हाईसेसमध्ये वापरता येणार आहे.
  • “विंडोज टेन‘मध्ये नव्या सुविधांसह विंडोज एज ब्राऊजर, चेहरा ओळखण्याची सुविधा, बोटाच्या ठशांद्वारे लॉगीनची सुविधा यासह फोटो, नकाशे, मेल, कॅलेंडर आदींसाठी विविध विंडोज ऍप्सही असणार आहेत. तर “विंडोज प्रो‘ एडिशनही व्यावसायिक वापरासाठी उपयोगी ठरणार असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.

जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी जास्तीचा एक सेकंद वाढविण्यात येणार :

  • लीप वर्षाचे गणित पूर्ण करण्यासाठी यंदाच्या जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी जास्तीचा एक सेकंद वाढविण्यात येणार असल्याचे जगभरातील घड्याळी वेळेचे अचूक नियंत्रण करणाऱ्या पॅरिस येथील वेधशाळेने जाहीर केले आहे.
  • आण्विक कालगणनेची गती निरंतर स्थिर असते. पण पृथ्वीची स्वत:भोवती फिरण्याची परिवलन गती मात्र दररोज एका सेकंदाच्या दोन हजाराव्या भागाइतक्या गतीने मंदावत चालली आहे.
  • तसेच या दोन्हींमध्ये मेळ साधण्यासाठी यंदाच्या घड्याळी वेळेत हे एक जास्त सेकंद धरण्यात येणार आहे.watch
  • फ्रान्समधील ‘इंटरनॅशनल अर्थ रोटेशन सर्व्हिस’ या वेधशाळेतील वैज्ञानिक पृथ्वीच्या परिवलन गतीवर सतत लक्ष ठेवून असतात व त्यात होणाऱ्या बदलानुसार घड्याळी वेळेची जुळणी करीत असतात.
  • अशाच प्रकारे याआधी सन 2012 मध्ये घड्याळी वेळेत एक सेकंद वाढविले गेले होता.
  • अशा प्रकारे घड्याळी वेळेमध्ये एक जास्तीचे सेकंद सर्वप्रथम 1972 मध्ये वाढविले गेले होते.
  • त्यानंतर अशा प्रकारे सेकंद वाढविले जाण्याची ही 26 वी वेळ आहे.
  • यामुळे 30 जून रोजी घड्याळांमध्ये 11:59:59 वाजल्यानंतर दुपारचे 12  न वाजता घड्याळे 11:59:59 अशी वेळ दाखवतील.

दिनविशेष :

  • 1947भारत-पाकिस्तान फाळणीची घोषणा.
  • 1890 – प्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार आणि चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांचा जन्म, कालमहर्षी म्हणून ते गौरविले जात.

Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 4 June 2015

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.