Current Affairs of 31 May 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (31 मे 2017)
मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना :
- राज्यातील शेतकऱ्यांना माफक दरात पुरेसा व शेतकऱ्यांच्या सोयीने वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, म्हणून सौर कृषी फीडरची योजना सरकारच्या विचाराधीन होती. ज्या ग्रामीण भागात गावठाण व कृषी फीडरचे विलगीकरण झाले, अशा ठिकाणी कृषी फीडरचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून, या योजनेला मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना संबोधण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
- राज्याच्या एकूण वीज वापराच्या 30 टक्के ऊर्जा कृषी क्षेत्रासाठी वापरली जाते. त्यातून महाविरतण कंपनीला तोटा सहन करावा लागतो. अशा स्थितीत शेतकऱ्यांना माफक दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाला दरवर्षी महावितरणला मोठ्या प्रमाणात अनुदान द्यावे लागते.
- कृषी फीडरचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण केल्यास पारंपरिक विजेची बचत होऊ शकते. त्यामुळे महावितरण कंपनीचा वीज खरेदीवर होणारा खर्च कमी होईल व औष्णिक विजेची बचत होईल.
- तसेच या योजनेची अंमलबजावणी महानिर्मिती कंपनीमार्फत करण्यात येईल. महावितरण व महाऊर्जा यांचाही सहभाग असेल.
Must Read (नक्की वाचा):
राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदी सुलेखा कुंभारे :
- राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झालेल्या माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी आयोगाचे अध्यक्ष गैरुल हसन रिझवी यांच्या उपस्थितीत लोकनायक भवनात पदभार स्वीकारला.
- यावेळी कुंभारे म्हणाल्या की, अल्पसंख्य समाजाच्या न्याय्य हक्कांबरोबरच त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व शैक्षणिक पुनरुत्थानासाठी मी मनापासून काम करेन.
- राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग मुस्लिम, बौद्ध, शीख, पारशी, जैन, ख्रिश्चन आदी समाजांना विविध क्षेत्रांत न्याय मिळवून देण्याचे काम करतो. अध्यक्ष रिझवी यांच्याव्यतिरिक्त आयोगाचे चार सदस्य आहेत.
आता शिक्षकांची भरती केंद्रीय पद्धतीने होणार :
- अनुदानित, अनुदानपात्र शाळांमधील शिक्षकांची भरती आता केंद्रीय पद्धतीने अभियोग्यता चाचणीव्दारे होईल. त्यामुळे शिक्षक भरतीबाबत शाळा व्यवस्थापनांच्या अधिकारावर गदा आली आहे. या निर्णयाने खासगी व सरकारी अनुदानित शाळांमधील भरतीतील गैरप्रकारांना आळा बसेल व भरती गुणवत्तेच्या आधारावर होईल, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.
- भरतीतील गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. उच्च न्यायालयानेही गुणवत्तेच्या आधारे भरतीचे आदेश दिले होते. त्यामुळे शासनाकडून ज्यांना वेतन मिळते, अशा शाळांतील भरती केंद्रीय पद्धतीने होईल.
- तसेच या परीक्षेत उत्तीर्ण शिक्षकांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. पारदर्शी पद्धतीने हे करण्यासाठी वेब पोर्टलद्वारे व वृत्तपत्रांतून शिक्षकांच्या रिक्त जागा नमूद करण्यात येतील. पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतील.
‘द स्क्वेअर’ ठरला कान्स महोत्सवात सर्वोकृष्ट चित्रपट :
- सत्तराव्या कांन्स महोत्सवात सर्वोकृष्ट चित्रपटाचा पाम डि ओर पुरस्कार रूबेन ओस्टलंड यांच्या ‘द स्क्वेअर’ या चित्रपटाला जाहीर झाला आहे.
- तर या महोत्सवाच्या सत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा पुरस्कार अभिनेत्री निकोल कीडमन हिने पटकावला आहे.
- इतर पुरस्कार पुढीलप्रमाणे –
कॅम डिओर पुरस्कार – जेन फेमी.
उत्कृष्ट लघुपट – अ जेन्टल नाइट.
परीक्षकांचा पुरस्कार – लव्हलेस.
उत्कृष्ट अभिनेत्री – डायनी क्रुगर.
उत्कृष्ट अभिनेता – जोआक्विन फिनिक्स.
उत्कृष्ट दिग्दर्शक – सोफिया कोपोला.
ग्रँड प्रिंक्स पुरस्कार – 120 बीट्स पर मिनीट.
वर्धापन दिन पुरस्कार – निकोल कीडमन.
पाम डिओर पुरस्कार – द स्क्वेअर (रूबेन ओस्टलंड).
दिनविशेष :
- 31 मे 1874 हा प्राच्यविद्यापंडित आणि समाजसेवक भाऊ दाजी लाड (रामकृष्ण विठ्ठल लाड) यांचा स्मृतीदिन आहे.
- 31 मे हा जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा