Current Affairs of 30 May 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (30 मे 2017)

चालू घडामोडी (30 मे 2017)

राजू नायक यांना आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर :

 • सासवड या आचार्य अत्रे यांच्या जन्मगावी दोन महत्त्वाच्या संस्थांतर्फे दिला जाणारा आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार ‘लोकमत’चे संपादक राजू नायक यांना जाहीर झाला आहे.
 • आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर व महाराष्ट्र साहित्य परिषद, सासवड यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.
 • आचार्य अत्रे यांच्या पुण्यतिथीदिनी 13 जून रोजी सासवड येथे या पुरस्काराचे वितरण होईल. यापूर्वी हा पुरस्कार कुमार केतकर, किरण ठाकूर, संजय राऊत, राजीव साबडे, शरद कारखानीस, डॉ. दीपक टिळक, प्रकाश कुलकर्णी, राजीव खांडेकर, सुरेश भटेवरा, प्रवीण बर्दापूरकर यांना मिळाला आहे.
 • राजू नायक यांनी विविध मराठी व इंग्रजी वृत्तपत्रांत पत्रकारिता केली आहे. पर्यावरणविषयक पत्रकारितेसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांची कित्येक पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यात पर्यावरणविषयक दोन पुस्तकांचा समावेश आहे. गोव्याच्या खाण व्यवसायाचा पर्दाफाश करणारे ‘खंदक’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 मे 2017)

राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प इंदापुरात :

 • “जलविद्युत प्रकल्पाला मर्यादा आहेत. तर कोळशापासून वीजनिमिर्ती करताना प्रदूषण व कच्च्या मालाच्या उपलब्धतेसारख्या समस्या आहेत. राज्याची विजेची वाढती गरज लक्षात घेता सौरउर्जा हा सध्या उत्तम पर्याय आहे. मदनवाडी (ता. इंदापूर) येथे राज्यातील सर्वांत मोठा सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे, ही आनंदाची बाब आहे. त्याच्या यशस्वितेसाठी कंपनीने शेतकर्‍यांना प्रकल्पामध्ये सहभागी करुन घेतल्यास कंपनी व शेतकरी या दोघांचाही फायदा होईल,” असे मत राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले.
 • प्रकल्पाची वैशिष्ट्ये –

 • राज्यातील सर्वांत मोठा सौरउर्जा प्रकल्प.
 • 120 मेगावॉट वीजनिर्मितीची क्षमता.
 • एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक.
 • पाचशे स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी चार देशांच्या दौऱ्यावर :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 29 मे पासून जर्मनी, स्पेन, रशियाफ्रान्स या चार देशांच्या दौऱ्यावर जात आहेत.
 • पंतप्रधान दौऱयादरम्यान आर्थिक, सुरक्षा, विज्ञान या विषयांवर युरोपीय देशांसोबत व्दिपक्षीय चर्चा करणार आहेत.
 • चर्चेदरम्यान व्यापार व दहशतवादाविरोधातील लढाई हा सुद्धा मुख्य विषय असणार आहे.
 • शिवाय, जर्मनी येथे होत असलेल्या भारत-जर्मनी आंतर-सरकारी सल्लामसलत (आयजीसी) या परिषदेमध्येही ते सहभागी होणार आहेत.
 • तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यानंतर स्पेनचा दौरा करणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान असणार आहेत. सन 1988 मध्ये राजीव गांधी यांनी स्पेनचा दौरा केला होता.

‘CISCE’च्या परीक्षेत मुस्कान देशात प्रथम :

 • कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट्‌स एक्‍झामिनेशन (सीआयएससीई) ने बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर केला असून, त्यात पुन्हा मुलींनी बाजी मारली. बारावी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे 96.47, तर दहावीचे हेच प्रमाण 98.53 टक्के इतके आहे.
 • बारावीच्या परीक्षेत कोलकताच्या अनन्या मैती हिने 99.5 टक्के मिळवीत देशात प्रथम क्रमांक पटकाविला, तर पुण्याच्या मुस्कान अब्दुल्ला पठाण आणि बंगळूरूच्या आश्‍विन राव यांनी दहावीच्या परीक्षेत 99.4 टक्के मिळवून देशात संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकाविला.
 • तसेच यंदा झालेल्या आयसीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांत उत्तीर्ण होणाऱ्यांच्या प्रमाणात गेल्या वर्षीपेक्षा किरकोळ वाढ झाली आहे. बारावीच्या परीक्षेत 97.73 टक्के मुली, तर 95.39 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.

दिनविशेष :

 • भारतातील प्रसिध्द भौतिकशास्त्रज्ञ ‘जगदीशचंद्र बोस’ यांचा विक्रमपूर जिल्ह्यातील राणीखल या गावी 30 मे 1858 मध्ये जन्म झाला.
 • 30 मे 1987 मध्ये गोवा हे भारतातील 25 वे घटकराज्य म्हणून मान्य करण्यात आले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (31 मे 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.