Current Affairs of 30 May 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (30 मे 2018)

चालू घडामोडी (30 मे 2018)

आज बारावीच्या परीक्षेचा निकाल लागणार :

 • फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 30 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. यावर्षी 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. राज्यातील दोन हजार 822 केंद्रांवर ही परीक्षा झाली.
 • राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान ही परीक्षा झाली. राज्यातील सुमारे नऊ हजार 486 कनिष्ठ महाविद्यालयांतून परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात आठ लाख 34 हजार 234 विद्यार्थी, तर सहा लाख 50 हजार 898 विद्यार्थिनींचा समावेश होता.
 • मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना विषयानुसार मिळालेले गुण दिसणार आहेत आणि त्याची प्रतही घेता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 मे 2018)

राजशेखरन यांची मिझोरामच्या राज्यपालपदी नियुक्ती :

 • मिझोरामचे राज्यपाल म्हणून केरळचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष कुम्मानम राजशेखरन यांनी शपथ घेतली. येथील राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जीत सिंह यांनी राजशेखरन यांना पदाची शपथ दिली.
 • या वेळी मिझोरामचे मुख्यमंत्री लाल थानहावला यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून राजशेखरन यांनी 1970 मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरवात केली.
 • 2015 मध्ये त्यांची भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2014 मध्ये केंद्रात एनडीएचे सरकार आल्यापासून मिझोरामचे राज्यपाल पद भूषविणारे राजशेखरन हे आठवे व्यक्ती आहेत. मावळते राज्यपाल लेफ्टनंट जनरल निर्भय शर्मा यांचा कार्यकाळ 28 मे रोजी संपला.

अल्पसूचनेनंतर अणुचाचणीस भारत सज्ज :

 • भारताने 1998 साली राजस्थानमधील पोखरण येथे केलेल्या अणुचाचण्यांनंतर पुन्हा चाचणी न घेण्याचे बंधन स्वत:वर घालून घेतले असले तरीही कधीही अल्पावधीत अणुचाचणी करण्याची तयारी आहे, अशी ग्वाही संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.ख्रिस्तोफर यांनी दिली.
 • भारताने राजस्थान येथील पोखरण येथे 1974 साली पहिली अणुचाचणी घेतली. त्यानंतर तेथेच 11 आणि 13 मे 1998 रोजी पाच अणुचाचण्या घेतल्या. त्यात हायड्रोजन बॉम्बचाही समावेश होता. त्यानंतर मात्र चाचण्या बंद करण्याचे भारताने जाहीर केले.
 • मात्र या निर्णयावर अनेक स्तरांतून शंका घेतली जात होती. प्रगत देशांना अण्वस्त्र तंत्रज्ञानावर प्रभुत्व संपादन करण्यासाठी शेकडो चाचण्या घ्याव्या लागल्या होत्या. त्यानंतर महासंगणकाच्या मदतीने आभासी चाचण्या घेऊन त्यात सुधारणा करता येते.
 • डॉ. ख्रिस्तोफर यांनी स्पष्ट केले की, 1998 नंतर भारताच्या अणुतंत्रज्ञानातील प्रगती थांबली नसून देश या बाबतीत प्रगत देशांची बरोबरी करू शकतो.

महाराष्ट्रातील उच्च शिक्षण संस्थांना रुसाकडून अनुदान :

 • महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान परिषद (रुसा परिषद) ने राज्याच्या उच्च शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठीचा आराखडा तयार केला असून यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.
 • या आराखड्यामध्ये महाविदयालयांची स्वायत्तता, स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठाचा दर्जा देणे, महाविद्यालयांच्या गटाला क्लस्टर (समूह) विद्यापीठाचा दर्जा देणे, संशोधन, नवे उपक्रम, अध्ययन, अध्यापनाच्या पद्धतीतील गुणवत्ता वाढ, मूल्यमापनाच्या नवनवीन पध्दती आदींवर भर देण्यात आला आहे. ही माहिती उच्चतंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.
 • तावडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या (रुसा) परिषदेच्या सभेमध्ये या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत रुसा महाराष्ट्राने तयार केलेले प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
 • ‘रुसा’च्या दुसऱ्या टप्यात काही वैशिष्ट्यपूर्ण बदल करण्यात आले आहेत. याआधी रुसा परिषद, महाराष्ट्र सर्व संस्थांच्या वतीने प्रस्ताव सादर केले जायचे, यंदा प्रथमच विद्यापीठे व महाविद्यालयांना स्पर्धेच्या स्वरूपात (चॅलेंजलेव्हल फंडींग) ऑनलाईन सहभाग नोंदवण्याची संधी मिळाली आहे.
 • तसेच या स्पर्धेमध्ये स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठाचा दर्जा, महाविद्यालयांच्या गटाला क्लस्टर (समूह) विद्यापीठाचा दर्जा, स्वायत्त महाविद्यालयांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न आणि पायाभूत सुविधांसाठी अनुदान यासाठी निधी देण्यात आला.

भारत-पाक सीमेवर आता शस्त्रसंधीचे उल्लंघन होणार नाही :

 • भारत-पाक सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून निर्माण झालेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये फोनवरुन तातडीची महत्वपूर्ण चर्चा झाली.
 • जम्मू-काश्मिरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानी रेंजर्सकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. यामध्ये भारताचे अनेक जवान शहीद झाले आहेत. त्याचबरोबर सीमाभागात राहणाऱ्या अनेक निरपराध नागरिकांचेही यात जीव गेले आहेत. तसेच अनेकांना विस्थापित व्हावे लागले आहे. मात्र, पाकिस्तानच्या या नापाक कृत्यांना भारतीय जवानांनीही वेळोवेळी सडेतोड उत्तरे दिली आहेत. त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (डीजीएमओ) यांनी भारताच्या डीजीएमओंशी 29 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता हॉटलाइनवरुन संपर्क साधला.
 • दरम्यान, दोन्ही पक्षांकडून झालेल्या चर्चेदरम्यान, सीमेवर दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधीचे उल्लंघन थांबवण्यात येऊन सध्याचे तणावपूर्ण वातावरण बदलावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याबाबत एकमत झाले. त्याचबरोबर दोन्ही लष्करी अधिकाऱ्यांदरम्यान 2003 मध्ये झालेल्या शस्त्रसंधीबाबत सहमती करार लागू करण्यावरही सहमती झाली.
 • तसेच जर कोणत्याही कारणास्तव सीमेवरील स्थिती बिघडली तरी सीमेवरील वातावरण खराब होऊ दिले जाणार नाही. त्यासाठी हॉटलाइनवरुन एकमेकांशी संपर्क करुन अथवा स्थानिक पातळीवर कमांडर स्तरावरील फ्लॅग मिटींगद्वारे त्यावर तोडगा काढण्यात यावा असे निश्चित झाले आहे.

गुगल प्रोग्रॅमिंगमध्ये अथर्व जोशी जगात प्रथम आला :

 • संगणक प्रणालीसाठी अत्यावश्‍यक ‘सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज’ हा अत्यंत आव्हानात्मक भाग असतो. याच प्रोग्रॅमिंगच्या स्पर्धेत पुण्याचा अथर्व जोशी (वय 17 वर्षे) जगात प्रथम आला आहे.
 • जागतिक पातळीवर गुगल-यू-ट्यूबकडून फेब्रुवारी महिन्यात घेतलेल्या स्पर्धेत भारतासह अमेरिका, इंग्लंड, चीन, जर्मनी, स्वित्झर्लंड अशा वीस देशांमधील आठ हजारांहून जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या अंतिम
 • निकालामध्ये ‘टॉप टेन‘ क्रमवारीत अथर्व सर्वप्रथम आला. सॅलसबरी पार्क येथील दीक्षा महाविद्यालयात अथर्व बारावीत शिकतो आहे.
 • ‘गुगल-यूट्यूबतर्फे ‘सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिक लॅंग्वेज’ अंतर्गत ‘ग्राफिक एनकोडिंग-डीकोडिंग’ ही जागतिक ऑनलाइन स्पर्धा वर्षातून एकदा होते. या परीक्षेसाठी किमान वय वर्षे 15 पूर्ण असावे लागते.
 • शिक्षणाची कोणतीही अट नसते. ‘कोडशेफ‘ या संकेतस्थळावर ही परीक्षा देता येते. सोपी, मध्यम आणि कठीण अशा तीन पातळ्यांवरील पाच प्रश्‍नांची उत्तरे द्यावी लागतात.
 • अल्गोरिदम आणि डेटा स्ट्रक्‍चरवर आधारित वेगवान प्रोग्रॅमिंग करावे लागते. चार तासांच्या परीक्षेचा अंतिम निकाल मेलद्वारे अथर्व हा ‘टॉप टेन‘ क्रमवारीत प्रथम आल्याचे गुगल-यूट्यूबकडून सांगण्यात आले.

दिनविशेष :

 • इतिहासकार डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्म 30 मे 1894 मध्ये झाला.
 • अत्यंत लोकप्रियप्रतिभावान चित्रकार दीनानाथ दलाल यांचा जन्म 30 मे 1916 रोजी झाला.
 • मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात 30 मे 1934 मध्ये झाली.
 • 30 मे 1987 रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.
 • पु.ल. देशपांडे यांना 30 मे 1993 रोजी ‘त्रिदलसंस्थेच्या वतीने पुण्यभूषण पुरस्कार प्रदान झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (31 मे 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.