Current Affairs of 31 May 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (31 मे 2018)

चालू घडामोडी (31 मे 2018)

इंडोनेशियाच्या नागरिकांना भारताकडून मोफत व्हिसा :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इंडोनेशियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पंतप्रधानांनी इंडोनेशियाच्या नागरिकांना 30 दिवसांसाठी मोफत व्हिसा देण्यात येणार असल्याची घोषणा केली.
  • इंडोनेशियातील जकार्ता येथील ‘जकार्ता कन्व्हेन्शन सेंटर‘ मध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, इंडिया हे नाव केवळ आमच्या देशाचे यमक नसून, भारत-इंडोनेशिया मैत्रीचे यमक आहे.
  • यावेळी पंतप्रधान मोदींनी इंडोनेशियातील नागरिकांना ‘न्यू इंडिया‘चा (नवा भारत) अनुभव यावा, यासाठी 30 दिवसांसाठी मोफत व्हिसा देण्यात येईल, अशी घोषणा केली. ‘तुमच्यापैकी अनेकांनी भारत दर्शन केले नसेल. त्यामुळे मी आता तुम्हाला आमंत्रित करत आहे, की पुढील वर्षी भारतात होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी भारतात या’, असे आमंत्रण मोदींनी इंडोनेशियातील नागरिकांना दिले.
  • दरम्यान, इंडोनेशियाच्या दौऱ्यात मोदींनी, इंडोनेशिया स्वातंत्र्यता संग्रामामध्ये हुतात्मा झालेल्या 7 हजारांपेक्षा अधिक जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 मे 2018)

राज्यात बारावीत यंदाही मुलीच अव्वलस्थानी :

  • राज्य माध्यमिकउच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 30 मे रोजी जाहीर करण्यात आला. या निकालात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे.
  • राज्याचा एकूण निकाल 88.41 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 94.85 टक्के निकाल लागला असून, सर्वांत कमी निकाल नाशिक विभागाचा 86.13 टक्के लागला.
  • राज्य मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली. या वेळी राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले उपस्थित होते. यंदाही मुलींनी बाजी मारल्याचे चित्र आहे.
  • सर्व विभागांतून 92.36 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, 85.23 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात एक टक्का घट झाली आहे. राज्यात यंदा 14 लाख 16 हजार 986 विद्यार्थी परीक्षेस बसले होते.
  • यापैकी 12 लाख 52 हजार 817 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये 6 लाख 68 हजार 125 मुले, तर 5 लाख 84 हजार 692 मुली उत्तीर्ण झाल्या.

भारताचा जीडीपी 7.3 टक्क्यांनी वाढणार :

  • भारताच्या जीडीपी वाढीच्या अंदाजामध्ये घट करण्यात आल्याचे मूडीज रेटिंग या जागतिक स्तरावरील पतनिर्धारण संस्थेने म्हटले आहे. या वर्षी भारताची अर्थव्यवस्था 7.5 टक्क्यांच्या दराने वाढेल असा अंदाज आधी वर्तवण्यात आला होता. मात्र, यात कपात करताना भारताची अर्थव्यवस्था 7.3 टक्क्यांनी वाढेल असा सुधारीत अंदाज मूडीजनं वर्तवला आहे. यामुळे निवडणुकीच्या वर्षाआधी मोदी सरकारला याचा फटका बसेल अशी शक्यता आहे.
  • विशेष म्हणजे खनिज तेलाच्या वाढलेल्या किंमतींमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसणार असल्याचे मूडीजने म्हटले आहे. अर्थात 2019 मध्ये मात्र भारताची अर्थव्यवस्था 7.5 टक्क्यांच्या दरानेच वाढेल असा अंदाज मात्र कायम ठेवला आहे. समाधानकारक पाऊस, शेतमालाला किमान आधारभूत किंमत आणि ग्रामीण भागातील वाढती उलाढाल यामुळे अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग चांगला राहील, मात्र इंधनाच्या महागाईमुळे अर्थव्यवस्थेची वाढ 7.5 टक्क्यांऐवजी 7.3 टक्क्यांनी घटेल असे मूडीजने म्हटले आहे.
  • तसेच येत्या काही महिन्यांमध्ये जीएसटीचा परिणामही अर्थव्यवस्थेवर जाणवणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जीएसटीमुळे अर्थव्यवस्था काही प्रमाणात मंदावणार असली तरी दीर्घकालीन दृष्टीने ते फायद्याचे ठरणार असल्याचे पतनिर्धारण संस्थेने नमूद केले आहे. जीएसटी संदर्भात एका वर्षभरात परिस्थिती समाधानकारक होईल असेही मूडीजने म्हटले आहे.

भारतीय थाळीफेकपटू विकास गौडा निवृत्त :

  • भारताचा थाळीफेकपटू विकास गौडा याने 30 मे निवृत्तीची घोषणा केली. 15 वर्षाच्या कारकिर्दीनंतर वयाच्या 34व्या वर्षी विकासने निवृत्तीचा निर्णय घेतला. विकासने अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. भारतातर्फे राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमध्ये पुरुष गटात सुवर्णपदक जिंकणारा विकास हा एकमेव खेळाडू आहे. विकासने चार वेळा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता.
  • गेल्या वर्षी भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये विकासने कांस्य पदक पटकावले होते. त्यानंतर वर्षभरात विकासने कोणत्याही बड्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला नाही. त्यामुळे त्याच्या निवृत्तीचा निर्णय हा अपेक्षित होता.
  • विकासने अथेलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (AFI) यांना आपण निवृत्त स्वीकारत असल्याचे पत्र पाठवले. त्यानंतर AFI ने ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. ‘भारताचा थाळीफेकपटू, ऑलिम्पियन, राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा 2014 मध्ये सुवर्णपदक पटकावणारा विकास गौडा याने निवृत्ती स्वीकारली आहे. भारतीय अॅथेलेटिक्समधील योगदानाबाबत आणि भारताला नव्या उंचीवर नेल्याबद्दल तुझे आभार. तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! असे ट्विट AFI ने केले आहे.

भारतीय रेल्वे सुरक्षा प्रचार मोहिमेत ‘बिग’बी चा सहभाग :

  • रेल्वेचा प्रवास सुरक्षित होण्याच्या दृष्टीने रुळ न ओलांडण्याचा भाग महत्त्वाचा ठरतो. तसेच, रेल्वे परिसरातील स्वच्छतेचाही भाग लक्षात घेउन मध्य रेल्वेने जनजागृतीसाठी ‘एक सफर रेल के साथ’ मोहीम राबवली आहे.
  • रेल्वे रुळ न ओलांडणे आणि स्वच्छतेचा प्रसार करण्यासाठी मध्य रेल्वेने कलाकारांचं सहाय्य घेतले आहे. ‘एक सफर रेल के साथ’ या सुरक्षित रेल्वे प्रवासाचा संदेश देणाऱ्या मोहिमेचे दूत म्हणून अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे.
  • भारतीय रेल्वेच्या सुरक्षा प्रचार मोहिमेत बिग बी सहभागी झाले आहेत. रूळ ओलांडणे जीवावर बेतू शकते, अशी सूचना रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येते. असे असतानाही पुलाचा किंवा सबवेचा वापर न करता रूळ ओलांडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून याआधीही बरेच मोहीम राबवले गेले.

दिनविशेष :

  • 31 मे हा दिवस जागतिक तंबाखूविरोधी दिन म्हणून पाळला जातो.
  • सेल्सियस थर्मामीटरचे शोध लावणारे जीन पियरे क्रिस्टिन यांचा जन्म 31 मे 1683 मध्ये झाला.
  • महाराणी ‘अहिल्याबाई होळकर’ यांचा जन्म 31 मे 1725 रोजी झाला.
  • 31 मे 1952 रोजी ‘संगीत नाटक अकादमी’ची स्थापना झाली.
  • नेल्सन मंडेला यांना 31 मे 1990 रोजी लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर झाला.
  • प्रख्यात गुजराती कवी हरिंद्र दवे यांना 1991 चा कबीर सन्मान मध्य प्रदेश सरकारकडून 31 मे 1992 मध्ये जाहीर झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 जून 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.