Current Affairs of 30 May 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (30 मे 2016)

चालू घडामोडी (30 मे 2016)

आयपीएल-9 सत्राचे विजेते सनरायझर्स हैदराबाद :

  • सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या नवव्या सत्राचे विजेतेपद पटकावताना बलाढ्य रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला 8 धावांनी पराजित केले.
  • हैदराबादने प्रथम फलंदाजी करून 208 धावा उभारल्यानंतर बँगलोरला 200 धावांवर रोखले.
  • संघात फारसे नावाजलेले खेळाडू नसताना हैदराबादने संपूर्ण स्पर्धेत सांघिक खेळाच्या जोरावर वर्चस्व राखले.
  • विशेष म्हणजे 20092011 नंतर पुन्हा एकदा बँगलोरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
  • एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून हैदराबादने प्रथम फलंदाजी केली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 मे 2016)

भारतातील सिंधू संस्कृती 8 हजार वर्षांपूर्वीची :

  • भारताचा प्राचीन सांस्कृतिक वारसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधू संस्कृतीविषयी ‘आयआयटी खड्‌गपूर’ या संस्थेने केलेल्या संशोधनातून ही माहिती उघड झाली आहे.
  • सिंधू संस्कृतीचा काळ हा 8 हजार वर्षे एवढा पुरातन असून, पूर्वी काही संशोधक तो केवळ 5,500 एवढाच गृहीत धरत असत.
  • तसेच या संशोधनामध्ये भारतीय पुरातत्त्व खात्याचे अधिकारीही सहभागी झाले होते.
  • प्राचीन इजिप्शियन संस्कृती कालखंड हा इसवीसनपूर्व 7 हजार ते 3 हजार हा मानला जातो, तर मेसोपोटोमियन संस्कृतीचा कालखंड इसवीसनपूर्व 6500 ते 3100 हा गृहीत धरण्यात आला आहे.
  • एवढेच नाही तर संशोधकांनी हडप्पा संस्कृतीपेक्षा एक हजार वर्षे पुरातन असलेल्या वेगळ्या संस्कृतीचे पुरावेही शोधून काढले आहेत.
  • नेचर’ या विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
  • आजपासून तब्बल तीन हजार वर्षांपूर्वी ही संस्कृती नष्ट झाली असून, वातावरणातील बदलच याला कारणीभूत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

सहा महाऔष्णिक वीज केंद्रातून वीजनिर्मिती :

  • दुर्गापूर (चंद्रपूर) राज्यातील सहा महाऔष्णिक वीज केंद्रातून चार हजार 24 मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे.
  • परळी वीज केंद्र पाण्याअभावी गत एक वर्षापासून बंद आहे.
  • तसेच याशिवाय अन्य कोणत्याही वीज केंद्राची पाण्याअभावी वीज निर्मिती प्रभावित झाली नसून सर्व वीज केंद्रांच्या जलाशयात जून अखेरपर्यंत पुरेल एवढा जलसाठा शिल्लक आहे.  
  • राज्यात महानिर्मितीचे एकूण सात औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहेत.
  • प्रत्येक वीज निर्मिती केंद्राचे स्वतंत्र धरण जलाशय आहे.
  • वीज केंद्राला वर्षभर पुरेल एवढा पाण्याचा साठा साठवून ठेवण्याची या धरण व जलाशयांची क्षमता आहे.

यंग थ्रोअर्स क्लासिक स्पर्धेत सीमा पुनियाला सुवर्णपदक :

  • आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पटकावणाऱ्या भारताच्या सीमा पुनियाने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करताना यंग थ्रोअर्स क्लासिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून आगामी रिओ ऑलिम्पिकसाठी आपली जागा निश्चित केली.
  • (दि.29) अमेरिकेत झालेल्या या स्पर्धेत हरियाणाच्या पुनियाने दबदबा राखून ऑनलिम्पिक तिकीट मिळवले.
  • तसेच  या स्पर्धेत ऑलिम्पिक प्रवेश निश्चित करण्यासाठी 61 मीटरची थाळी फेक करणे आवश्यक होते.
  • पुनियाने या वेळी शानदार कामगिरी करताना 62.62 मीटरची ‘सुवर्ण’ फेक करून ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला.
  • तसेच याआधी 2004 आणि 2012 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पुनियाने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
  • 2014 सालच्या आशियाई स्पर्धेत पुनियाने सुवर्ण पटकावून भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली होती.
  • आता, रिओ ऑलिम्पिकच्या तयारीसाठी क्रीडा मंत्रालयाच्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टॉप) योजना अंतर्गत पुनिया अमेरिकेत प्रशिक्षणासाठी जाईल.

PMOची वेबसाइट सहा प्रादेशिक भाषांमध्ये :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदी निवड होण्याआधीच व राष्ट्रीय पातळीवर येण्याआधीच गुजरातचे विकास पुरूष म्हणुन सोशल मिडियात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.
  • तरुण मतदारांना त्यांनी आकर्षीत करुन नवा मदतार जागृत करत पंतप्रधान पदावर विराजमानतर झालेच त्याशिवाय आपल्या पक्षाला एरहाती विजय मिळवून दिला.
  • मोदींनी सोशल मिडियाची ताकद , व्याप्ती व त्याचे भविष्य ओळखत भारतातील बहुतेक नेत्यांआधी त्यांनी सोशल मिडियाचा शितापिने वापर केला होता.
  • पंतप्रधानांची इंग्रजीमध्ये असणारी वेबसाईट आज सहा प्रादेशिक भाषेमध्ये सुरु करण्यात आली आहे.
  • नवी दिल्ली येथे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या सहाही वेबसाइट लाँच केल्या.
  • तसेच यामध्ये बंगाली, गुजराती, मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि मराठीचा समावेश आहे.

कोकण रेल्वेमार्गावरील 11 नवीन स्थानकांना मंजुरी :

  • कोकण रेल्वेमार्गावर दुहेरीकरण करतानाच 11 नवीन स्थानकांचा त्यात समावेश करण्यात आला आहे.
  • तसेच कोकण रेल्वेने पाठवलेल्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिली.
  • 11 पैकी बहुतांश स्थानके महाराष्ट्रातील असून, त्यामुळे कोकणातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
  • मध्य रेल्वेकडून दिवा ते रोहापर्यंतच्या दुहेरीकरणाच्या कामाला गती देण्यात येत आहे.
  • तसेच हे काम करताना कोकण रेल्वेकडील दुहेरीकरणाच्या कामाचा प्रस्ताव बरीच वर्षे मागे पडला होता.
  • त्यानंतर कोकण रेल्वेकडून कोलाड ते ठोकूर या 741 किलोमीटरपर्यंतच्या टप्प्याचे दुहेरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दिनविशेष :

  • 1858 : भारतातील प्रसिध्द भौतिकशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचा विक्रमपूर जिल्ह्यातील राणीखल या गावी जन्म झाला.
  • 1987 : गोवा हे भारतातील 25 वे घटकराज्य मान्य करण्यात आले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (31 मे 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.