Current Affairs of 28 May 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (28 मे 2016)

चालू घडामोडी (28 मे 2016)

कोहली जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मार्केटेबल खेळाडू :

  • आपल्या तुफान फलंदाजीच्या जोरावर सध्या क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या स्टार विराट कोहलीने कमाईचे मैदानही गाजवले आहे.
  • फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी आणि जागतिक अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकाविक यांना मागे टाकत कोहलीने जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मार्केटेबल (कमाई करणारा) खेळाडूचा मान पटकावला आहे.
  • क्रीडा व्यापारावर संशोधन करणाऱ्या एका कंपनीने तीन वर्षांत मार्केटमध्ये खेळाडूंच्या क्षमतेनुसार ही क्रमवारी जाहीर केली आहे.
  • तसेच यामध्ये पैसा, वय, देशांतर्गत बाजार, चमत्कारिक प्रदर्शन आणि बाजारात उतरण्याची इच्छा या गोष्टींचा समावेश आहे.
  • या क्रमवारीत एनबीएतील सर्वाधिक महागडा खेळाडू स्टीफन करी आणि युवेंट्स संघाचा फ्रान्सीस फुटबॉलर पॉल पोग्बा यांनी अनुक्रमे प्रथमद्वितीय क्रमांक पटकावला आहे, तर या दोघांनंतर थेट कोहलीने तिसऱ्या स्थान मिळवला आहे.
  • विशेष म्हणजे या बाबतीत कोहलीने दिग्गज गोल्फर जॉर्डन स्मिथलाही मागे टाकण्याची ‘विराट’ कामगिरी केली आहे, तर जोकोविच 23व्या स्थानी आणि मेस्सी 27व्या स्थानी आहे.
  • तसेच जगातील सर्वांत वेगवान व्यक्ती म्हणून नावाजलेला धावपटू उसेन बोल्ट 31व्या स्थानी आहे.  
  • भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झानेही स्थान मिळवले असून, ती 50व्या स्थानी आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 मे 2016)

चीन भारताबरोबर सहकार्य वाढविणार :

  • दहशतवादाविरोधात लढा तीव्र करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताबरोबर सहकार्य वाढविणार असल्याचे चीनने सांगितले.
  • जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या मागणीला चीनने आडकाठी आणल्याचा मुद्दा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी उपस्थित केल्यानंतर चीनने हे आश्‍वासन दिले आहे.
  • राष्ट्रपती मुखर्जी यांच्या चार दिवसांचा चीन दौरा संपला. त्यांचा हा दौरा अतिशय यशस्वी आणि फलदायी ठरल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनियांग यांनी सांगितले.
  • द्विपक्षीय पातळीवर असलेले संबंध अधिक दृढ करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.
  • द्विपक्षीय पातळीवर दहशतवादविरोधातील सहकार्य वाढविले जाईल.

ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :

  • भारताने (दि.27) 290 किलोमीटर पल्ल्यावरील लक्ष्य भेदणाऱ्या सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
  • हवाई दलाच्या वतीने (दि.27) दुपारी बाराच्या सुमारास पोखरण येथे चाचणी घेण्यात आली.
  • भारत आणि रशिया यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ब्राह्मोस एरोस्पेसने निवेदनात म्हटले की, ब्राह्मोस क्षेपणास्त्राने नेहमीच आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे.  
  • तसेच घेण्यात आलेल्या चाचणीत अपेक्षेनुसार क्षेपणास्त्राने लक्ष्य गाठले.
  • ब्राह्मोसने जगातील सर्वांत श्रेष्ठ सुपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्र असल्याचे पुन्हा एकवार सिद्ध केले आहे.
  • संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रानुसार, हवाई दलाने गेल्यावर्षीच क्षेपणास्त्र प्रणाली आत्मसात केली होती. जेणेकरून सीमेवरचे शत्रूंची रडार, संचार प्रणालीसारखी यंत्रणा नष्ट करता येईल.

भू विभागाकडून मिशन मान्सून प्रकल्पला सुरुवात :

  • मान्सूनचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाच्या भू विज्ञान विभागाने ‘मिशन मान्सून’ हा प्रकल्प सुरू केला आहे.
  • तसेच त्यासाठी 400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • सध्या भारताच्या हवामान विभागाकडे दहा ते वीस दिवस व संपूर्ण मोसमाचा अंदाज देण्याचे कसब आहे.
    त्याद्वारे गेल्या दोन वर्षांत कमी पावसाचे अचूक भाकित हवामान विभागाने केले होते.
  • सध्या स्टॅटॅस्टिकल मॉडेलडायनॅमिक मॉडेल दोन्हीचा एकत्रित वापर केला जातो.
  • मात्र, लवकरच यासाठी डायनॅमिक मॉडेलचा वापर सुरू केला जाईल.
  • ग्रामीण कृषी मौसम सेवेअंतर्गत देशातील 1.1 कोटी शेतकऱ्यांना प्रादेशिक भाषांमधून कृषी व हवामानविषयक इशारे-सल्ले मिळतात.
  • कृषी-हवामान आधारित सेवांचा लाभ 42 हजार कोटी रुपये इतका होता.
  • गहू, तांदूळ, ऊस, कापूस उत्पादक या सेवांचे प्रमुख लाभार्थी आहेत.

दिनविशेष :

  • 1883 : भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
  • 1952 : ग्रीसमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क देण्यात आला.
  • 1964 : पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेची स्थापना.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 मे 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.