Current Affairs of 3 June 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (3 जून 2017)

चालू घडामोडी (3 जून 2017)

विमान निर्मितीसाठी संयुक्त प्रकल्प :

  • भारताला रशिया अणुऊर्जा निर्मितीसाठी 25 हजार कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे.
  • भारताच्या सगळ्यात मोठ्या अणुऊर्जा निर्मितीच्या तामिळनाडूतील प्रकल्पाच्या पाच आणि सहा क्रमांकाच्या संच बांधणीचा खर्च 50 हजार कोटी रुपये असून, त्याचा निम्मा भाग रशिया कर्जरूपाने देणार आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात 1 जून रोजी झालेल्या वार्षिक शिखर भेटीत कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या दोन नव्या रिअ‍ॅक्टर्ससाठी उभय देशांत करारावर स्वाक्षरी झाली.
  • तसेच या प्रकल्पातून प्रत्यक्ष वीज निर्मितीला सात वर्षे लागतील, असे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे (एनपीसीआयएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस.के. शर्मा यांनी सांगितले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 जून 2017)

लिओ अशोक वराडकर आयर्लंडचे नवे पंतप्रधान :

  • मूळचे महाराष्ट्रातील मालवणचे असलेले लिओ अशोक वराडकर यांची आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून निवड झाली.
  • आयर्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीत वराडकर यांनी शेवटच्या फेरीत 73 पैकी 51 मते मिळवत हा ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांनी प्रतिस्पर्धी सिमोन कोव्हिने यांचा पराभव केला.
  • आयर्लंडमध्ये 2007 मध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये लिओ सर्वप्रथम निवडून आले होते. लवकरच त्यांना उपमहापौरपद भूषवण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदापर्यंत मजल मारली होती.
  • ‘पंतप्रधान झाल्यास देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा; तसेच राजकीय स्थैर्य देण्याचा माझा प्रयत्न असेल’, अशी भूमिका वराडकर यांनी मांडली होती.
  • भारतीय वंशाच्या लिओ वराडकर यांना आयर्लंडमधील पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचे पाहून त्यांच्या भारतातील कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे.

समीर दिघे यांची मुंबई संघाचे प्रशिक्षकपदी निवड :

  • मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदी भारताचे माजी यष्टीरक्षक समीर दिघे यांची निवड केली.
  • यंदा रणजी विजेतेपद राखण्यात अपयशी ठरलेले चंद्रकांत पंडित यांची जागा घेण्यास दिघे यांच्यासह माजी कसोटीपटू प्रवीण आमरे यांचेही नाव मुंबई प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत होते.
  • मुंबई क्रिकेट संघटनेने जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, ‘समीर दिघे यांना 201718 मोसमासाठी मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदी निवडण्यात आले आहे.’
  • मुंबई निवड समितीचे प्रमुख आणि माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील एमसीएच्या क्रिकेट सुधार समितीने घेतलेल्या बैठकीमध्ये 48 वर्षीय दिघे यांची प्रशिक्षकपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘पृथ्वी-2’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी :

  • अण्वस्त्र वाहक भारतीय बनावटीच्या पृथ्वी-2 या क्षेपणास्त्राची ओडिशातील चांदीपूरनजीकच्या एकात्मिक चाचणी तळावरून यशस्वी चाचणी घेण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 350 किलो मीटर आहे.
  • फिरत्या प्रक्षेपकातून 2 जून रोजी सकाळी 9.50 वाजता हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. 500 ते 1 हजार किलो अण्वस्त्रे वाहून नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. यात प्रगत दिशादर्शक प्रणालीचा वापर करण्यात आलेला असल्याने हे क्षेपणास्त्र अचूक वेध घेते.
  • 21 नोव्हेंबर 2016 रोजी ही यशस्वी चाचणी पार पडली होती. 2003 मध्ये लष्करात सामील करण्यात आलेले हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केले आहे.

दिनविशेष :

  • ‘भारतीय महिला विद्यापीठ’ या संस्थेची 3 जून 1831 मध्ये स्थापना झाली. 1920 मध्ये ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ’ (एस.एन.डी.टी.) असे नामांतर करण्यात आले.
  • 3 मे 1890 मध्ये सरहद्ध गांधी ‘खान अब्दुल गफारखान’ यांचा जन्म झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 जून 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.