Current Affairs of 2 June 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (2 जून 2017)

चालू घडामोडी (2 जून 2017)

सुधाकर शिंदे पुन्हा पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी :

 • जनतेने नगरसेवकाच्या माध्यमातून आपले लोकप्रतिनिधी पालिकेवर पाठविले आहेत. त्यामुळे प्रशासनाचे काम आणखी सोपे होऊन ताण कमी होणार आहे.
 • प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने पनवेल महानगरपालिकेच्या विकासासाठी काम केले जाईल, अशी प्रतिक्रिया डॉ. सुधाकर शिंदे यांनी पालिकेत पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
 • तसेच 1 जून रोजी शिंदे यांनी दुसऱ्यांदा पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त पद स्वीकारले.
 • पनवेल पालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुधाकर शिंदे यांची तडकाफडकी उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली केली होती.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 जून 2017)

सरिता सिंहचा नवीन राष्ट्रीय विक्रम :

 • 21व्या फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या सरिता सिंहने हातोडाफेक प्रकारात 65.25 मीटरची कामगिरी करून नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करून सुवर्णपदक जिंकले.
 • पूर्वीचा विक्रम 2014 मध्ये मंजू बालाने 62.75 मीटरची कामगिरी करून नोंदविलेला होता. सरिता सिंह नंतर गुंजन सिंहने 61.95 मी.निधि कुमारने 57.99 मी. हातोडा फेकून अनुक्रमे रौप्यकास्यपदक जिंकले.
 • तसेच महिलांच्या 400 मी. अडथळ्याच्या (57.39 से.) शर्यतीत केरळच्या आर. अनुने सुवर्ण जिंकून नवा विक्रम नोंदविला.

लंडनमध्ये साजरा होणार मराठी संस्कृतीचा जागर :

 • लंडन मराठी संमेलनाच्या (एलएमएस) निमित्ताने महाराष्ट्र मंडळ लंडनचा 85वा वर्धापन सोहळा 2, 3 आणि 4 जूनला साजरा होणार असून, तो महाराष्ट्रीय उद्योजकतेचा, संस्कृतीचा आणि चैतन्याचा एक मोठा उत्सव असणार आहे.
 • पूर्व इंग्लंडच्या नौदलाचे प्रादेशिक कमांडर कमोडोर डेविड एलफोर्ड कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. लंडन मराठी संमेलनाचे प्रमुख पाहुणा होण्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराबद्दल दाखवलेल्या दूरदृष्टीचादेखील उल्लेख केला आहे.
 • ‘एलएमएस’मध्ये भारतातून येणाऱ्या आणि स्थानिक कलाकारांचा योग्य तो समन्वय असणार आहे.
 • भारत विकास ग्रुप (बिव्हीजी)चे एच.आर. गायकवाड हे संमेलनाचे मुख्य प्रायोजक आहेत.

दिनविशेष :

 • अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी 2 जून 1862 रोजी टेलीफ़ोनचा शोध लावला.
 • 2 जून 1948 मध्ये शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्यात आली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 जून 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.