Current Affairs of 29 September 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (29 सप्टेंबर 2016)
प्रतापराव पवार यांना महर्षी पुरस्कार जाहीर :
- सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे यंदाचा ‘महर्षी पुरस्कार’ ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना जाहीर झाला आहे.
- माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते (दि.6 ऑक्टोबर) हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
- श्री लक्ष्मीमातेची चांदीची प्रतिमा, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
- तसेच यापूर्वी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, पं. जसराज, शिल्पकार बी. आर. खेडकर, शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
- महोत्सवाचे यंदा 22 वे वर्ष असून, 1 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत हा महोत्सव होणार आहे.
- पवार हे उद्योगांशी संबंधित अनेक कंपन्यांचे संचालकपद भूषवीत आहेत.
- देशातील विविध वृत्तपत्र संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले असून, वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्समध्येही त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
- ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्युलेशन (एबीसी) या संस्थेच्या कार्यकारिणीवर त्यांची नुकतीच निवड झाली आहे.
Must Read (नक्की वाचा):
‘पॅरिस करार’ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता :
- पर्यावरणाच्या मुद्द्यावरील अत्यंत महत्त्वाच्या अशा ‘पॅरिस करारा’ला (दि.28) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
- तसेच अर्थमंत्रालयाच्या ‘सक्षम योजनेला’ हि मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
- तसेच ‘हिंदुस्तान केबल लिमिटेड कंपनी’ बंद करण्याला मंजुरी दिली.
- केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत निर्णयांची माहिती दिली.
- ‘पॅरिस करारा’वर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलताना सरकार दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीदिनी ‘पॅरिस करारा’ला औपचारिक मान्यता देईल, असे जाहीर केले होते.
- संयुक्त राष्ट्रसंघातील भाषणात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही याच आशयाचे विधान केले होते.
- तसेच त्यानुसार मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने या करारावर शिक्कामोर्तब केले.
- ‘पॅरिस करारा’ला आतापर्यंत साठ देशांनी मान्यता दिली आहे.
केंद्र सरकारव्दारे पीक नुकसानासाठी आर्थिक मदत :
- महाराष्ट्रातील खरीप आणि रब्बी हंगामांतील पिकांच्या दुष्काळामुळे झालेल्या नुकसानाच्या संदर्भात केंद्र सरकारने (दि.28) 1269 कोटी रुपयांची मदत जाहीर केली.
- तसेच यातील 589.47 कोटी रुपयांची रक्कम ही खरिपातील तर 679.54 कोटी रुपयांची रक्कम रब्बी हंगामातील नुकसानीपोटी असेल.
- केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली (दि.28) एक उच्चस्तरीय बैठक होऊन त्यामध्ये हा निर्णय झाला.
- खरीप हंगामात (गेल्या वर्षीच्या) झालेल्या नुकसानापोटीचे पुरवणी साह्य म्हणून 589.47 कोटी रुपये देण्यात आले आहेत, तर रब्बी हंगामासाठी ही रक्कम 679.54 कोटी रुपये असेल.
- केंद्रीय निरीक्षकांनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून दिलेल्या अहवालाच्या आधारे हे अर्थसाह्य दिले जाते.
अनंत दीक्षित यांना जवाहरलाल दर्डा पुरस्कार :
- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा स्व. जवाहरलाल दर्डा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांना जाहीर झाला आहे.
- राज्याचे महसूल, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि ‘लोकमत’ चे समूह संपादक दिनकर रायकर यांच्या हस्ते (दि.29) या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
- तसेच या पुरस्काराचे स्वरूप पन्नास हजार रूपये व सन्मानचिन्ह असे आहे.
- यावेळी राज्य मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सोलापूर ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांनाही गौरविण्यात येणार आहे.
दिनविशेष :
- 1930 : भारतीय क्रिकेट खेळाडू, रामनाथ केणी यांचा जन्मदिन.
- 1932 : मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, हमीद दलवाई यांचा जन्मदिन.
- 1991 : उत्तर प्रदेशातील आग्रा घराण्याचे प्रसिद्ध गायक उस्ताद युनुस हुसेन खान स्मृतीदिन.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा