Current Affairs of 28 September 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (28 सप्टेंबर 2016)

चालू घडामोडी (28 सप्टेंबर 2016)

‘सार्क’ परिषदेवर भारताचा बहिष्कार :

 • उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविषयी घेतलेली तीव्र भूमिका कायम राखत इस्लामाबादमध्ये नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ‘सार्क’ परिषदेवरही बहिष्कार टाकला.
 • ‘इस्लामाबादमध्ये होणाऱ्या परिषदेस पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार नाहीत,’ असे परराष्ट्र मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले.
 • भारताच्या या भूमिकेनंतर बांगलादेशानेही सार्क परिषदेला उपस्थित न राहण्याचा निर्णय जाहीर केला.
 • अफगाणिस्तान आणि भूतान या देशांनीही सार्क परिषदेला अर्थ नसल्याचे म्हटले आहे.
 • उरीत लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राजनैतिक पातळीवर पाकिस्तानची चहुबाजूंनी कोंडी करण्याचे धोरण आखले आहे.
 • परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या व्यासपीठावरून पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांवर कडाडून हल्ला केला होता.
 • सिंधू पाणीवाटप करारातील तरतुदीही भारतीय प्रशासन आता तपासून पाहू लागले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानमध्ये होणाऱ्या ‘सार्क’च्या परिषदेवर प्रश्‍नचिन्ह होते. 

ज्येष्ठ नेते शिमॉन पेरेस कालवश :

 • इस्राईलचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नेते व नोबेल पारितोषिक विजेते शिमॉन पेरेस यांचे आज (दि.28) निधन झाले. ते 93 वर्षांचे होते.
 • पेरेस यांनी दोन वेळा इस्राईलचे पंतप्रधानपद भूषविले होते. यानंतर त्यांनी 2007 ते 14 या काळात इस्राईलचे अध्यक्षपदही सांभाळले होते.
 • स्वतंत्र पॅलेस्टाईन देशाच्या संकल्पनेची मुहूर्तमेढ करणाऱ्या ‘ओस्लो करारा’ संदर्भात बजाविलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेसंदर्भात पेरेस यांना 1994 मध्ये पॅलेस्टाईनचे अध्यक्ष यासर अराफत व इस्राईलचे पंतप्रधान यित्झाक राबिन यांच्यासह नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले होते.
 • पेरेस यांना इस्राईलसहच जगात इतरत्रही अत्यंत आदराचे स्थान लाभले होते.

उत्तम सिंग यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर :

 • ज्येष्ठ संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक उत्तम सिंग यांना 2016 या वर्षीचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 • सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीतील सदस्यांनी एकमताने उत्तम सिंग यांची निवड केली.
 • तसेच या समितीत सांस्कृतिक कार्यप्रधान सचिव वल्सा नायर सिंह, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, स्वानंद किरकिरे, अजय व अतुल गोगावले आणि श्रेया घोषाल यांचा समावेश होता.
 • 1997 मध्ये ‘दिल तो पागल है’ या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार मिळाला.
 • 2002 मध्ये ‘गदर – एक प्रेमकथा’ या चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार (सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक) मिळाला.

महाराष्ट्राच्या पर्यटनाला येणार ‘अच्छे दिन’ :

 • महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे अनेक प्रकल्प आणि योजना आखण्यात येत आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशी दौऱ्यानंतर पर्यटन व्यवसायातही वृद्धी झाली आहे. त्यामुळे आता पर्यटन क्षेत्राचे रूपडे पालटून महाराष्ट्राच्या पर्यटनालाही ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे संकेत आहेत.
 • पर्यटन व्यवसायाची नवी मुहूर्तमेढ रोवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आता सरसावून पुढे आले आहे.
 • जागतिक नकाशावरचा पर्यटन बिंदू म्हणून महाराष्ट्र लख्खपणे चमकवण्यासाठी, महामंडळाने 3 हजार कोटींचा पर्यटन विकासाचा आराखडा करण्याचे निश्चित केले आहे.
 • 2015 साली भारतात येणाऱ्या पर्यटकांपैकी 44 लाख 8 हजार 916 पर्यटकांनी महाराष्ट्राला भेट दिल्याची नोंद आहे, तर आनंदाची बाब म्हणजे, पहिल्या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्र द्वितीय स्थानी आहे.
 • शासनाच्या नवीन कोकण पर्यटन विकास धोरणामुळे कोकणात पर्यटन व्यवसायामध्ये मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.
 • तसेच या पार्श्वभूमीवर कोकण पर्यटन उद्योग संघाचीदेखील स्थापना करण्यात आली आहे.

दिनविशेष :

 • 1929 : भारतीय पार्श्वगायक, लता मंगेशकर यांचा जन्म.
 • 1959 : भारताची आरती शहा ही इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली आशियाई महिला ठरली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.