Current Affairs of 29 June 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (29 जून 2015) :
कृष्णावाडा विकास प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण विभागाची मान्यता :
- केंद्रीय पर्यावरण विभागाने गोदावरी मराठा पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत येणार्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कृष्णा सिंचन प्रकल्पासाठी मंजुरी दिली आहे.
- या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील पश्चिमेकडील दुष्काळी भागात मोठा फायदा होणार आहे.
- या प्रकल्पासाठी 4 हजार 845 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली आहे.
Must Read (नक्की वाचा):
अमीर खान गावोगावी फिरून करणार दुष्काळमुक्त महाराष्ट्र मोहिमेची जनजागृती :
- स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी ‘सप्तपदी स्वच्छतेची’ हे अभियान राबवण्यात येणार आहे.
- अभिनेता अमिर खान या अभियानाचा ब्रॅंड अॅबेसिडर असणार आहे.
- तसेच अमिर खान या पार्श्र्वभूमीवर गावोगावी फिरणार असल्याचे त्याने म्हटले आहे. या मोहिमेचा शुभारंभ मुंबईत करण्यात आला आहे.
गुगल देणार मोफत वायफाय सुविधा :
- जगभर मोफत वायफाय सुविधा गुगल येत्या काळात उपलब्ध करून देण्याची तयारी करीत आहे.
- तसेच गुगलची न्यूयार्क शहरात ट्रायलही सुरू केल्यामुळे येणार्या काळात प्रत्येक देशात गुगलची वायफाय सुविधा उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे मोबाइलधारकांना मोफत वायफाय सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
- न्यूयार्कमध्ये वायफाय सुविधा देण्यासाठी बिग अॅप्पल्यच्या जुन्या फोन बूथचा वापर करण्यात येणार आहे.
केरळ टुरिझमची ‘ब्रॅंड अॅबेसिडर’ म्हणून स्टेफी ग्राफची निवड :
- टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हीची केरळ टुरिझम विभागाची ‘ब्रॅंड अॅबेसिडर’ म्हणून निवडली जाण्याची शक्यता आहे.
- तिने मान्यता दिल्यास तिच्यावर केरळच्या जगप्रसिद्ध आयुर्वेदाचा प्रसार करण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.
- तसेच ‘ब्रॅंड अॅबेसिडर’ च्या यादीत स्टेफी ग्राफ व्यतिरिक्त बॉलीवूडचा सुपरस्टार किंग खान आणि अन्य सेलिब्रेटींचा समावेश आहे.
- स्टेफी ग्राफने आपल्या टेनिस कारकीर्तीत तब्बल 22 वेळा ग्रँड स्लम विजेतेपद मिळविले आहे.
आयसीसीचे अध्यक्ष जहीर अब्बास बनले :
- अंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या (आयसीसी) अध्यक्ष पदाची सुत्रे पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अब्बास यांनी स्वीकारली आहेत.
- बाबोंडोस येथील आयसीसीच्या तीन दिवस वार्षिक परिषदेदरम्यान यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
भारतीय डाक विभाग देणार डेबिट कार्ड :
- भारतीय डाक विभाग आता डेबिट कार्ड सुविधा जारी करणार आहे.
- डाग विभाग दीड कोटी खातेधारकांचे डेबिट कार्ड तयार करणार आहे.
- भारतीय डाग विभागाचे 10 कोटी खातेधारक आहेत. डाग विभाग रुपे कार्डही बनवत आहे.
तसेच सुरवातीस ते डाग खात्याच्याच एटीएममध्ये वापरता येईल व नंतर ते सर्व एटीएममध्ये चालेल.