Current Affairs of 27 June 2015 For MPSC Exams

Current Affairs 27 june 2015

चालू घडामोडी 27 जून 2015

आयआयटी संशोधकांनी अतिशय सूक्ष्म अशा पारदर्शी नॅनोशीटचा शोध लावला :

 • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्या (आयआयटी) संशोधकांनी अतिशय सूक्ष्म अशा पारदर्शी नॅनोशीटचा शोध लावला आहे.
 • या शीटचे आकारमान माणसांच्या केसांपेक्षा 20 हजार पटींनी लहान असल्याचे रसायन तंत्रज्ञान विषयाचे प्राध्यापक कबीर जसुआ यांनी सांगितले.
 • कबीर यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने हा शोध लावला आहे.
 • ही नॅनोशीट कार्बनपासून बनविलेली असून, यामध्ये ग्रॅफीनविरहित बोरॉनचाही समावेश आहे तसेच बोरॉनचा उपयोग ही नॅनोशीट पातळ व पारदर्शी करण्याकरिता केला.
 • तसेच यातून साधारण प्रकाशकिरण सहज पार जाऊ शकतात. मात्र, अतिनील किरणांना मात्र ती रोखून धरते. किंबहुना अतिनील किरणांना ती अडविते. एकूणच अतिनील किरणांपासून संरक्षणासाठी या नॅनोशीटचा उपयोग होऊ शकतो.
 • ही नॅनोशीट अवकाश संशोधनासाठी वापरण्यात येणार असून, तिच्यामध्ये शक्‍य तितके बदल करता येतील.
 • या नॅनोशीटचे तांत्रिक, औष्णिक, तसेच रासायनिक गुणधर्म पडताळणीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याचे कबीर यांनी सांगितले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी 26 जून 2015

“नो ऍक्‍सिडेंट डे” साजरा करण्याचा निर्णय :

 • देशात प्रथमच उत्तर प्रदेश सरकारने 1 जुलै रोजी “नो ऍक्‍सिडेंट डे” साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • या दिवशी जिल्हा प्रशासनाने आवश्‍यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
 • यासंबंधीचे पत्र राज्य सरकारकडून सर्व राज्य परिवहन आयुक्‍तांना पाठविण्यात आले आहेत.
 • या दिवशी राज्यातील सर्वच भागातील अपघात रोखणे शक्‍य होणार नाही. पण अपघातप्रवण भागामध्ये 30 जूनच्या मध्यरात्रीपासून पोलिस तैनात करण्यात येतील.

आता रेल्वेबाबतची माहिती “एसएमएस”द्वारे पाठविणार :

 • ऐनवेळी रद्द झालेल्या रेल्वेमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे यापुढे तिकिट आरक्षित केलेल्या प्रवाशांना रद्द झालेल्या रेल्वेबाबतची माहिती “एसएमएस”द्वारे पाठविणार आहे.
 • सुरुवातीला केवळ सुरुवातीच्या स्थानकावरून तिकिट आरक्षित केलेल्या प्रवाशांनाच ही सुविधा पुरविण्यात येणार आहे.
 • सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणाऱ्या या सुविधेमध्ये टप्प्याटप्प्याने सर्व स्थानकांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
 • अनिवार्य परिस्थितीत काही रेल्वेच्या सेवा ऐनवेळी रद्द कराव्या लागतात. मात्र, यामुळे तिकिट आरक्षित केलेल्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. यावर मात करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ही नवी सुविधा सादर केली आहे.
 • तसेच प्रवाशांनी तिकिट आरक्षण करताना नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावरच रद्द झालेल्या रेल्वेबाबतची माहिती दिली जाणार आहे.

‘पुण्यभूषण पुरस्कार’ प्रतापराव पवार यांना प्रदान :

 • पुण्यभूषण फाउंडेशनचा यंदाचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
 • नांगराच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली बालशिवाजीची प्रतिकृती व एक लाख रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 • उद्योग, पत्रकारिता तसेच सामाजिक क्षेत्रात सुमारे चाळीस वर्षांपासून प्रतापराव पवार कार्यरत आहेत.
 • त्यांना गेल्या वर्षीच ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
 • तसेच मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

रिझर्व्ह बॅंकेची 2005 पूर्वीच्या नोटा बदलून घेण्यासाठी सहा महिन्याची मुदतवाढ :

 • रिझर्व्ह बॅंकेने 2005 पूर्वीच्या नोटा बदलून घेण्यासाठी आता सहा महिने मुदत वाढवली आहे.
 • त्यामुळे ज्यांच्याकडे अशा नोटा असतील, त्यांना त्या 31 डिसेंबर 2015 पर्यंत बॅंकांतून बदलून घेता येतील.
 • यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार ही मुदत येत्या तीस तारखेला संपत होती. मात्र, आता रिझर्व्ह बॅंकेने ही मुदत वाढवण्यात आली असल्याचे आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.
 • गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात 2005पूर्वीच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंकेने घेतला होता. अशा नोटा ओळखणे सोपे आहे.
 • या नोटांच्या मागील बाजूस प्रिंटिंगचे वर्ष छापलेले नाही. 2005नंतरच्या नोटांवर मागील बाजूस प्रिंटिंगचे वर्ष छापलेले आहे.

अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाकडून समलिंगी व्यक्तींना अमेरिकेत कुठेही विवाहबद्ध होण्याचा अधिकार :

 • समलिंगी व्यक्तींना अमेरिकेत कुठेही विवाहबद्ध होण्याचा अधिकार आहे, असा निर्वाळा अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने गुरुवारी दिला.
 • अमेरिकेच्या 36 राज्यांमध्ये आणि कोलंबिया डिस्ट्रिक्टमध्ये पुरुष समलिंगी (गे) आणि स्त्री समलिंगी (लेस्बियन) जोडप्यांना लग्न करण्याची परवानगी आहे.
 • आता दक्षिण आणि मध्य-पश्चिम भागातील उर्वरित 14 राज्यांनाही समलिंगी लग्नांवरील बंदीची अंमलबजावणी थांबवावी
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.