Current Affairs of 26 June 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (26 जून 2015) :

इंदिरा गांधी आणीबाणीची चाळीशी :

 • माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारने 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली होती.
 • तसेच नंतर आणीबाणीच्या पार्श्‍वभूमीवर देशातील राजकारण आणि समाजकारणात पुढील 12 महिन्यांत अनेक घटना घडल्या.
 • एकूणच आणीबाणी लादण्याच्या इंदिरा गांधी यांच्या निर्णयामुळे अवघा भारत देश ढवळून निघाला. या घटनेमुळे देशाच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी 25 जून 2014

सचिन तेंडुलकर सर्वोत्तम कसोटी खेळाडू :

 • भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची 21व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
 • ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ या वेबसाईटतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात चाहत्यांनी सचिनला हा गौरव बहाल केला आहे.
 • या सर्वेक्षणासाठी 21व्या शतकातील 100 सर्वोत्तम कसोटी खेळाडुंमधून एका खेळाडुची निवड करण्याचा पर्याय देण्यात आला होता.
 • त्यामध्ये सचिन तेंडुलकरने सर्वाधिक मते मिळवत बाजी मारली.
 • तर श्रीलंकेचा कुमार संगाकारा आणि ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले आहे.
 • या सर्वेक्षणात तब्बल 16000 लोकांनी सहभाग घेतला होता.
 • त्यापैकी 23 टक्के लोकांनी सचिन तेंडुलकर तर 14 टक्के लोकांनी कुमार संगाकाराच्या नावाला पसंती दिली.
 • तब्बल दहा दिवस सुरु असलेल्या या सर्वेक्षणात 2000 सालापासूनच्या कसोटी खेळाडुंचा समावेश करण्यात आला होता.
 • विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने केलेल्या स्वत: जाहीर केलेल्या यादीत सचिन पाचव्या क्रमांकावर होता.
 • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही प्रकारांमध्ये सचिनच्या नावावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे.

सहा ठिकाणी आयआयएम स्थापना करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी :

 • नागपूरसह देशातील सहा ठिकाणी नव्याने इंडियन ‌इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची (आयआयएम) (भारतीय व्यवस्थापन संस्था) स्थापना करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
 • विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश,) बोधगया (बिहार), सिरमौर (हिमाचल प्रदेश), संबळपूर (ओडिशा) आणि अमृतसर (पंजाब) येथे अन्य पाच आयआयएम असतील.
 • येत्या शैक्षणिक वर्षापासूनच या संस्था विविध व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू करतील.
 • प्रत्येक संस्थेत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 140 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून कॅट (कॉमन ऍडमिशन टेस्ट) मार्फत प्रवेशप्रक्रिया पार पाडली जाईल.
 • तसेच दरवर्षी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ केली जाणार असून सात वर्षानंतर प्रत्येक संस्थेतील विद्यार्थ्यांची संख्या 560 विद्यार्थ्यांपर्यंत वाढविली जाईल.
 • देशात याआधी 13 आयआयएम आहेत.

नेपाळला भारत करणार 1 अब्ज डॉलरची मदत :

 • नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय दाता परिषद 25 जून रोजी पार पडली.
 • या परिषदेत भूकंपामुळे उध्वस्त झालेल्या नेपाळच्या पुन:उभारणीसाठी भारत तब्बल 1 अब्ज डॉलरची आर्थिक मदत देणार असल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी जाहीर केले.
 • आता एक अब्ज डॉलरची मदत करण्यात येणार असून, आणखी एक अब्ज डॉलरची मदत पुढील पाच वर्षांत करण्यात येणार असून, एकूण मदतीचा आकडा दोन अब्ज डॉलरवर गेला आहे.
 • नेपाळच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या सुषमा स्वराज यांनी काही भागांची पाहणी केली.
 • याच परिषदेत चीनने 48.3 कोटी डॉलरची मदत जाहीर केली असून, नेपाळच्या शाश्वत विकासासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
 • तसेच, चीन ‘सिल्क रोड फंड’ मधून वेळोवेळी मदत करणार असून, पुढील वर्षभरात दीड हजार नेपाळी नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येईल, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वॅंग यी यांनी जाहीर केले.
 • तसेच जपाननेही 26 कोटी डॉलरची मदत नेपाळसाठी जाहीर केली आहे. यातून घरे, शाळा आणि पायाभूत सुविधांची उभारणी करण्यावर भर देण्यात येणार आहे.
 • 25एप्रिल भूकंपामुळे नेपाळचे प्रचंड नुकसान झाले. सुमारे 9000 लोक मृत्यूमुखी पडले. त्यावेळी झालेल्या जीवित आणि वित्तहानीमुळे नेपाळ मोठ्या संकटात सापडले.

  पुरातन मंदिरे, वास्तू, सरकारी कार्यलय, हॉस्पिटल यांचेही प्रचंड नुकसान झाले.

 • नेपाळच्या अर्थ व्यवस्थेत पर्यटनाचा मोठा वाटा आहे. पण भूकंपामुळे पर्यटकांनीही पाठ फिरवल्याने नेपाळला मोठ्या मदतीची गरज असताना भारताने पुढाकार घेतला आहे.

स्मार्ट सिटी आणि अमृत योजनेची घोषणा :

 • शहरी भारताचा चेहरामोहरा बदलण्याच्या उद्देशाने चार लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या तीन महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा 25 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
 • 100 स्मार्ट शहरांचा विकास, अटल शहरी पुनरुज्जीवन आणि परिवर्तन मिशन (एएमआरयूटी) तसेच पंतप्रधान आवास योजना, ही शहर विकासाची सुसाट इंजिने मानल्या जाणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीत राज्य सरकारे, स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.    

रिन्युएबल एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (रेकी) प्रस्तावाला मान्यता :

 • केंद्र सरकारने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची (सेकी) नोंदणी व्यवसायिक कंपनी म्हणून करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आता सेकीचे नाव रिन्युएबल एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (रेकी) असे होईल.
 • यामुळे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांना गती येण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे.
 • सेकी ही सध्या कायद्यांतर्गत सेक्शन-8 प्रकारची कंपनी आहे. या विभागांतर्गत समाजासाठी काम करणाऱ्या कंपन्यांची स्थापना व नोंदणी करता येते.
 • यामुळे अशा कंपनीला व्यवसाय करण्यास तसेच व्यावसायिक लाभ मिळवण्यास पूर्णपणे बंदी आहे.
 • अपारंपरिक ऊर्जेसारखे क्षेत्र ही काळाची गरज असल्यामुळे सेकीची नोंदणी बदलून तिला व्यावसायिक कंपनीचा दर्जा देणे आवश्यक होते.
 • आता सेकीची नोंदणी कंपनी कायद्याच्या सेक्शन-3 अंतर्गत होणार असल्यामुळे नव्याने स्थापन होणाऱ्या रेकी या कंपनीला स्वत:च्या मालकीचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणे, त्यातून निर्माण होणारी वीज व्यावसायिक स्तरावर विकणे तसेच सौरऊर्जेवर चालणाऱ्या उत्पादनांची निर्मिती करणे शक्य होणार आहे.
 • कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यामुळे सेकी ही कंपनी कंपनी रजिस्ट्रारकडे सेक्शन-3 अंतर्गत नोंदणी करून घेण्यासाठी अर्ज करेल आणि नाव बदलून रेकी हे नवे नाव धारण करेल.
 • सेकीला संपूर्णत: व्यावसायिक कंपनी म्हणून वावरताना कोणतीली अडचण येऊ नये, यासाठीच या कॉर्पोरेशनची नोंदणी कंपनी कायदा सेक्शन-3 अंतर्गत नव्याने केली जाणार आहे.
 • नवी रेकी ही कंपनी आपले कार्यक्षेत्र सौरऊर्जेपुरतेच मर्यादित ठेवणार नसून त्याखेरीज अन्य अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रांमध्येही ही कंपनी काम करणार आहे. यामध्ये जिओथर्मल, ऑफशोअर विंड, टायडल अशा ऊर्जांचाही समावेश असणार आहे.

मानवी हक्क आयोगाची राज्य सरकारला नोटीस :

 • मुंबईतील मालवणी येथे घडलेल्या दारूकांडप्रकरणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने (एनएचआरसी) महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलीस आयुक्तांवर नोटिसा बजाविल्या आहेत.
 • या दारूकांडात आतापर्यंत 100 हून अधिक जणांचा बळी गेला आहे.
 • विषारी दारू प्यायल्याने मालवणी येथे अनेक जण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच आयोगाने त्याची स्वत:हून दखल घेतली.
 • माध्यमातील वृत्तांमध्ये तथ्य असल्यास हा मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचा गंभीर प्रकार आहे, असे आयोगाने म्हटले आहे.
 • राज्याचे मुख्य सचिव, अबकारी विभागाचे प्रधान सचिव आणि मुंबई पोलिसांवर नोटिसा बजाविण्यात आल्या असून, दोन आठवडय़ात वस्तुस्थिती सादर करण्यास सांगितले आहे.
 • त्याचप्रमाणे बळींच्या नातेवाईकांना आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांना आर्थिक मदत करण्यात आली आहे का, त्याची माहितीही आयोगाने संबंधितांकडून मागविली आहे.

शाहीर लीलाधर हेगडेंना बालसाहित्य सन्मान जाहीर :

 • साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी एक असलेले व उत्तुंग आमुची उत्तर सीमा, माझे राष्ट्र महान यांसारख्या देशभक्तिपर गीतांनी राष्ट्रप्रेम जागवणारे शाहीर लीलाधर हेगडे यांना साहित्य अकादमीचा 2015चा राष्ट्रीय बालसाहित्य सन्मान जाहीर झाला आहे. त्याचबरोबर वीर राठोड यांना मराठीसाठीचा अकादमी युवा साहित्य सन्मान जाहीर झाला आहे.
 • येत्या 14 नोव्हेंबरला मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण होईल.
 • साहित्य अकादमीतर्फे यंदा 24 भाषांतील लेखकांना बालसाहित्य, तर 23 भाषांतील 35 वर्षांखालील लेखकांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले.   नाईक यांना कोकणीसाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • हेगडे यांना बालसाहित्यातील समग्र योगदानाबद्दल साहित्य अकादमी सन्मान मिळाला आहे. आपल्या गीतातंतून राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग जागविण्याबरोबरच उमलत्या पिढीत सुसंस्कारांची रूजवात व्हावी यासाठी अखंड धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये शाहीर हेगडे अग्रस्थानी आहेत. मुलांसाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.
 • ठाणे जिल्ह्यात जन्मलेले शाहीर हेगडे यांनी 1942च्या चले जाव आंदोलनात सहभाग घेतला; तसेच साने गुरुजींच्या पंढरपूर मंदिर सत्याग्रहातही ते सहभागी झाले. चुनाभट्टीतील साने गुरुजी आरोग्य मंदिराचे काम ते गेली किमान 45 वर्षे सांभाळत आहेत.
 • त्यांना यापूर्वी महाराष्ट्र फाउंडेशन न्यूयॉर्क व केशव गोरे स्मारक ट्रस्ट आदी संस्थांचे सन्मान मिळाले आहेत.

‘आयसीसी’च्या अध्यक्षपदी झहीर अब्बास :

 • पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार झहीर अब्बास यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली आहे.

  बार्बाडोसमधील आयसीसीच्या वार्षिक परिषदेत हा निर्णय घेण्यात आला असून अब्बास पुढील एका वर्षासाठी आयसीसीचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील.

 • बांगलादेशचे मुस्तफा कमाल यांनी विश्वचषक स्पर्धेदरम्यानच्या वादानंतर आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते.
 • एहसान मणी यांच्यानंतर आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे झहीर अब्बास हे दुसरे पाकिस्तानी असतील.
 • आयसीसीने या बैठकीदरम्यान सर्बिया क्रिकेट फेडरेशनलाही मान्यता दिली.
 • आयसीसीचे चेअरमन : एन. श्रीनिवासन
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.