Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs of 29 July 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (29 जुलै 2016)

चालू घडामोडी (29 जुलै 2016)

महाराष्ट्रातून रिओ ऑलिम्पिकसाठी ललिता बाबरची निवड :

 • रिओ ऑलिम्पिकसाठी 28 भारतीयांनी अ‍ॅथलेटिक्समध्ये पात्रता मिळवली असली तरी महाराष्ट्रातून नावे दोनच आहेत.
 • ललिता बाबर आणि कविता राऊत-तुंगार. या दोन रणरागिणींनी रिओसाठी पात्र ठरलेल्या आहे.
 • तसेच लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर ठरलेली ललिता 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे.
 • ‘माणदेशी एक्स्प्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ललिता शिवाजी बाबरचा जन्म सातारा जिल्ह्यातील मोही (ता. माण) या छोट्याशा गावात झाला.
 • 2005 साली पुण्यात झालेल्या 20 वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत तिने पहिले सुवर्णपदक जिंकले.
 • 2014 मध्ये मुंबई मॅरेथॉनमध्ये हॅट्ट्रिक नोंदविल्यानंतर ललिताने ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याच्यादृष्टीने 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात करिअर करायचा निर्णय घेतला.
 • तसेच या आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स खेळाडूने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन आतापर्यंत 23 पदके मिळविली आहेत. त्यामध्ये 8 सुवर्ण, 6 रौप्य आणि 9 कांस्यपदकांचा समावेश आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 जुलै 2016)

ज्ञानपीठ विजेत्या महाश्वेता देवी कालवश :

 • आपल्या कथा, कादंबऱ्यांच्या माध्यमातून दलित, शोषित, गरीब आणि भूमिहीनांचा संघर्ष मांडणाऱ्या, आदिवासींसाठी आंदोलन उभारत त्यांच्या वेदनांना वाचा फोडणाऱ्या ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या महाश्‍वेतादेवी (वय 90) यांचे (दि.28) कोलकात्यामध्ये प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले.
 • बंगाली भाषेमध्ये वैचारिक, संवेदनशील कथा, कादंबऱ्या लिहिणाऱ्या महाश्‍वेतादेवींनी विविध सामाजिक प्रश्‍नांवरील आंदोलनांमध्येही हिरिरीने सहभाग घेतला होता.
 • स्त्री, दलित, आदिवासी या शोषित समाज घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी थेट व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारले होते.
 • महाश्‍वेतादेवींना पद्मविभूषण, साहित्य अकादमी, रॅमन मॅगसेसे आणि ज्ञानपीठ आदी पुरस्कारांनीही गौरविण्यात आले होते.
 • पश्‍चिम बंगालमधील ‘लोधास’ आणि ‘शबर’ या आदिवासींच्या विकासासाठी महाश्‍वेतादेवी यांनी केलेले काम आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरले होते.

बोइंग कंपनी आपल्या ‘जम्बो जेट’चे उत्पादन थांबवणार :

 • विमान निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी बोइंग आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा ‘जम्बो जेट’ अथवा ‘क्वीन ऑफ द स्काइज’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘747’ विमानांचे उत्पादन थांबविणार आहे.
 • तसेच या विमानाची कमी होत चाललेली मागणी आणि किंमत कमी करण्याबाबत ग्राहक कंपन्यांकडून येत असलेला दबाव यामुळे हा निर्णय घेत असल्याचे बोइंग कंपनीने म्हटले आहे.
 • ‘747’चे उत्पादन 2019 पासून दरमहा एक विमानापर्यंत ठेवण्याचा कंपनीचा मानस होता. मात्र, कंपनीने ही योजना आता रद्द केली आहे.
 • कंपनी सप्टेंबर 2016 पासून या विमानाची निर्मिती कमी करणार आहेत.
 • ‘747’ या विमानाला ‘जम्बो जेट’ अथवा ‘क्वीन ऑफ द स्काइज’ या नावाने ओळखले जाते.
 • अमेरिकेच्या अध्यक्षांचे ‘एअर फोर्स वन’ हे विमानही ‘747’ आहे.
 • ‘747’च्या आधुनिक आवृत्तीची क्षमता एका सेकंदात फिफाच्या तीन मैदानांची लांबी पार करण्याची आहे.

कोस्मो फिल्म कंपनीची गुंतवणूक औरंगाबादमध्ये :

 • कोस्मो फिल्मस् लिमिटेड या कंपनीने औरंगाबाद येथील वाळुज औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे 800 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव राज्य शासनास दिला आहे.
 • तसेच या नव्या प्रकल्पामुळे पाचशे जणांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे.
 • कोस्मो फिल्मस् कंपनीचे गुजरात आणि वाळुज येथे प्रकल्प आहेत. याव्यतिरिक्त कंपनीने आणखी 800 कोटी रुपयांची गुंतवणूक करून वाळुज औद्योगिक वसाहतीत नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
 • दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या माध्यमातून औरंगाबाद परिसरातील शेंद्रा व बिडकीन येथे औद्योगिक वसाहत निर्माण होत आहे.

महाराष्टाकडून नेपाळला शाळा उभारण्यास मदत :

 • अन्नपूर्णा असेल किंवा एव्हरेस्ट या मोहिमांसाठी गिर्यारोहकांचे हक्काचे ठिकाण म्हणजे नेपाळ.
 • 2015 मध्ये झालेल्या भूकंपाने नेपाळ हादरले आणि अत्यंत सुंदर असलेली ही भूमी बेचिराख झाली.
 • नेपाळच्या दऱ्याखोऱ्यांत अंगाखांद्यावर खेळलेल्या या गिर्यारोहकांना झालेली ही वाताहत पाहवेना म्हणून त्याच्या उभारणीसाठी ठोस काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
 • आता लवकरच महाराष्ट्रातील गिरीप्रेमी आणि मैत्री या संस्थांच्या मदतीने तेथील अतिदुर्गम भागातील त्रिपुरेश्‍वरमध्ये शाळा उभारणीचे काम सुरू होणार आहे.
 • एव्हरेस्ट बेस कॅम्प किंवा काठमांडू अशा प्रसिद्ध ठिकाणी रोजगार, पर्यटन बुडू नये यासाठी तेथील शाळा, रुग्णालये, बाजाराची लागलीच उभारणी झाली; मात्र अतिदुर्गम भागात असलेल्या शाळा आणि घरांकडे दुर्लक्ष झाले.
 • तसेच या दुर्लक्षित राहिलेल्या अतिदुर्गम भागांतील शाळांचे काम करावे असं गिरीप्रेमीच्या वतीने ठरवण्यात आले आणि त्यातूनच निवड झाली ती पोखरा व्हॅलीतील दाडिंग जिल्ह्यातील त्रिपुरेश्‍वर या गावाची.

दिनविशेष :

 • जागतिक व्याघ्र दिन.
 • 1898 : इसिदोर आयझॅक राबी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
 • 1904 : जे.आर.डी. टाटा, भारतीय उद्योगपती यांचा जन्म.
 • 1922 : बळवंत मोरेश्वर पुरंदरे, मराठी इतिहाससंशोधक, लेखक यांचा जन्म.
 • 1925 : शिवराम दत्तात्रेय फडणीस, मराठी व्यंगचित्रकार यांचा जन्म.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 जुलै 2016)

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World