Current Affairs of 28 July 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (28 जुलै 2016)

चालू घडामोडी (28 जुलै 2016)

2016 चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर :

 • प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्ते बेजवाडा विल्सन आणि दक्षिणेतील शास्त्रीय संगीतकार टी.एम. कृष्णा यांना आशियातील सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • कर्नाटकातील दलित कुटुंबामध्ये जन्मलेल्या बेजवाडा विल्सन यांनी मानवी मैला डोक्‍यावर वाहून नेण्याच्या प्रथेविरोधात आवाज उठविला होता.
 • स्वच्छता कामगारांमधील स्वत्व आणि स्वाभिमान जागा व्हावा म्हणून त्यांनी सफाई कर्मचारी आंदोलन उभारले.
 • संगीताच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कामासाठी टी.एम. कृष्णा यांना सन्मानित केले जाणार आहे.
 • तसेच फिलिपिन्समधील कोकिंथा कारपिओ-मोरालेस, इंडोनेशियातील डॉम्पेट दुआफा यांनाही हा सन्मान जाहीर झाला आहे.
 • लोकांच्या मनात कायद्याप्रती विश्‍वास निर्माण केल्याबद्दल कारपिओ-मोरालेस यांना सन्मानित केले जाणार असून, मुस्लिमांमधील धार्मिक कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘जकात’मध्ये घडवून आणलेल्या सकारात्मक बदलाबद्दल दुआफा यांचा गौरव केला जाईल.
 • संकटाच्या काळात लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या लाओस येथील ‘व्हिएतियन रेस्क्‍यू’ आणि ‘जपान ओव्हरसीज कोऑपरेशन’या दोन संस्थांनादेखील हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 जुलै 2016)

‘पी-8 आय’ विमानांसाठी भारताचा अमेरिकेशी करार :

 • भारताने अमेरिकेसोबत चार पोसायडन-8 आय लांब पल्ल्याच्या लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी एक अब्ज डॉलरचा करार केला.
 • गेल्या दहा वर्षांत भारताने संरक्षण सामग्रीसाठी केवळ अमेरिकेसोबत 15 अब्ज डॉलरची गुंतवणूक केलेली आहे.
 • तसेच ही चार लढाऊ विमाने रडार्स व शस्त्रांसहित 1 ऑगस्ट रोजी भारतीय नौदलात दाखल होणार आहेत.
 • या आधीही मे 2013 व ऑक्‍टोबर 2015 रोजी अशी विमाने भारतीय नौदलात आयात करण्यात आली होती.
 • सध्या नौदलात पी 8 आयएस हे लढाऊ विमान हार्पन ब्लॉक 2 मिसाईलसह सज्ज आहे. याचसोबत एमके-54 लाइटवेट पाणबुड्या, रॉकेट आदींचा समावेश आहे.
 • तसेच समुद्रावर लक्ष्य करण्यासाठी ‘इंटेलिजंट हॉक हाय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आहे.
 • पोसायडन-8 आय बाराशे मैलांपर्यंत मारा करू शकणार आहे.
 • समुद्री निरीक्षण व गुप्तचर तपास मिशन अशा महत्त्वाच्या मोहिमांवरही याचा उपयोग होणार आहे.

राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार जाहीर :

 • राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विविध राज्यस्तरीय पुरस्कारांची राज्य शासनाकडून घोषणा करण्यात आली आहे.
 • राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ठ काम केल्याबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
 • याच विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.भाऊ दायदार यांना उत्कृष्ट समन्वयक म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • 2015-16 या वर्षात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत नि:स्वार्थ भावनेने काम केलेल्यांचा हे पुरस्कार देऊन राज्य शासनातर्फे गौरव करण्यात येणार आहे.
 • विद्यापीठाअंतर्गत विविध महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत सामाजिक व राष्ट्रीय उपक्रम हाती घेतले जातात.
 • रक्तदान, पर्यावरण जनजागृती, व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यटन विकास, शाळाबाह्य मुलांचे संरक्षण, एड्स जनजागृती, आदी विषयांत या विभागाने चांगली कामगिरी केली आहे.
 • ग्रामीण भागात बंधारे बांधणे, वैचारिक प्रबोधन करणे, झोपडपट्टीतील लोकांशी संवाद साधणे या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकास घडविण्याचे कार्य केले जाते.

रामेश्‍वर मध्ये अब्दुल कलाम यांच्या पुतळ्याचे अनावरण :

 • देशाचे माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या पार्श्‍वभूमीवर रामेश्‍वर येथे उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुतळ्याचे (दि.27) अनावरण करण्यात आले.
 • तसेच या वेळी कलाम यांची जन्मभूमी असलेल्या रामेश्‍वरचा अमृत योजनेत समावेश करून सरकारने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
 • कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रामेश्‍वर येथे संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या वतीने (डीआरडीओ) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 • केंद्रीय शहरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी पेयकारुंभू येथे उभारण्यात आलेल्या कलाम यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

आयसीसी क्रमवारीत आर. अश्विन प्रथम स्थानी :

 • भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले.
 • त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने पहिली कसोटी एक डाव व 92 धावांनी जिंकली.
 • या वर्षांच्या सुरुवातीला अश्विनला अव्वल स्थान गमवावे लागले होते, परंतु विंडीजविरुद्ध 83 धावांत सात गडी बाद करून त्याने ते पुन्हा मिळवले.
 • याचबरोबर त्याने फलंदाजांच्या यादीतही तीन स्थानांची सुधारणा करून 45वे स्थान पटकावले.
 • अश्विनने (7/83 व 113 धावा) अष्टपैलू खेळ  करून अष्टपैलू खेळाडूंमध्ये असलेल्या अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत केली.
 • इंग्लंडचे जेम्स अ‍ॅण्डरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड अनुक्रमे दुसऱ्यातिसऱ्या, तर दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन चौथ्या स्थानावर आहे.  
 • भारताचा उमेश यादव आणि मोहम्मद शमी अनुक्रमे 2428व्या स्थानावर आहेत.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 जुलै 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.