Current Affairs of 29 August 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (29 ऑगस्ट 2015)
‘वन रॅंक वन पेन्शन’ बाबत योग्य वेळी घोषणा
- माजी सैनिकांसाठी असलेल्या ‘वन रॅंक वन पेन्शन‘ योजनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी योग्य वेळी घोषणा करतील, असे आश्वासन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले आहे.
- ही योजना जाहीर झाल्यास देशातील जवळपास बावीस लाख निवृत्त सैनिक आणि सहा लाखांहून अधिक वीर पत्नींना त्याचा लगेच फायदा होणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
भारत-जर्मनी दरम्यानचे सहकार्य वाढविण्याचे प्रयत्न
- भारत आणि जर्मनी या दोन देशांतील करारासंदर्भातील माहितीचे आदान-प्रदान यापुढेही सुरूच राहणार आहे. या प्रकरणी परस्पर सहकार्यात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यावरही शिक्का मोर्तब झाले.
- भारताच्या महसूल सचिव शक्तिकांता दास आणि त्यांचे जर्मनीतील समकक्ष अधिकारी जॉहनेस जिस्मन यांच्यात बर्लिन येथे काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. या वेळी दोन्ही देशांत माहितीचे आदान-प्रदान सुरू ठेवण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते.
औरंगजेब रस्त्याला डॉ. कलाम यांचे नाव
- नवी दिल्लीतील औरंगजेब रस्त्याला माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्याची मागणी दिल्ली सरकारने मान्य केली आहे.
- तत्कालीन ब्रिटिश सरकारने दिल्लीतील काही रस्त्यांना बाबर, तुघलक व औरंगजेबाची नावे दिली होती व आजतागायत ती तशीच होती.
- जनसंघाने 1950 च्या पूर्वार्धात बलराज मधोक, मदनलाल खुराना, लालकृष्ण अडवानी आदींच्या नेतृत्वाखाली दिल्ली नगरपालिकेची सत्ता मिळविली, तेव्हापासून या औरंगजेब रस्त्याचे नाव बदलण्याची मागणी होत होती.
फेसबुकवर एकाच दिवसात एक अब्ज युजर्स
- लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइटवर सोमवारी एकाच दिवसात तब्बल एक अब्ज जणांनी फेसबुक वापरल्याचा दावा फेसबुकने केला आहे. त्याबाबत फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली आहे.
- सोमवारी पृथ्वीवरील प्रत्येक सात व्यक्तींपैकी एक व्यक्ती फेसबुकद्वारे आपल्या मित्रांच्या आणि नातेवाइकांच्या संपर्कात असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.
- फेसबुकच्या स्थापनेपासून यापूर्वी कधीही एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात युजर्स फेसबुकवर आढळून आले नव्हते.