Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs of 28 August 2015 For MPSC Exams

Current Affairs 28 Aug 2015

 चालू घडामोडी (28 ऑगस्ट 2015)

स्मार्ट सिटी योजनेत देशातील 98 शहरांचा समावेश :

 • केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या स्मार्ट सिटी योजनेला (गुरुवार) प्रारंभ करण्यात आला असून, यामध्ये देशातील 98 शहरांचा समावेश करण्यातSmart City आला आहे.
 • केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज पत्रकार परिषदेत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निवडण्यात आलेल्या शहरांची यादी जाहीर केली.
 • यावेळी त्यांनी केंद्र सरकार पुढील पाच वर्षांमध्ये या शहरांच्या विकासासाठी 48 हजार कोटी रुपयांची रक्कम खर्च करणार असल्याचे सांगितले.
 • तसेच त्यांनी राज्य सराकरही एवढीच रक्कम खर्च करणार असल्याचेही स्पष्ट केले.
 • स्मार्ट सिटी योजनेमध्ये निवडण्यात आलेल्या शहरांमध्ये उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 13 शहरांचा समावेश आहे.
 • त्यानंतर तमिळनाडूतील 12, महाराष्ट्रातील 10, मध्य प्रदेशातील 7, गुजरात आणि कर्नाटकमधील 6, राजस्थान व पश्चिम बंगालमधील 4, आंध्र प्रदेश आणि बिहारमधील तीन शहरांचा समावेश आहे.
 • जम्मू काश्मीर सरकारने आपल्या दोन शहरांचे नाव प्रसिद्ध करण्यासाठी वेळ मागितला आहे.
 • सरकारने आज जाहीर केलेल्या स्मार्ट सिटीमध्ये 24 राजधानी शहरे आहेत.
 • तसेच 24 व्यापार व औद्योगिक संबंधी आणि 18 सांस्कृतिक व पर्यटन संबंधी शहरे आहेत.
 • यादीतील प्रमुख शहरांमध्ये चेन्नई, अहमदाबाद, मुंबई, हैदराबाद, पाटणा, शिमला, बंगळूर, दमन, कोलकता, गंगटोक आदी शहरांचा समावेश आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 ऑगस्ट 2015)

मोदी आणि ओबामा यांच्यात थेट संपर्कासाठी ‘हॉटलाइन’ सुरू :

 • अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात थेट संपर्कासाठी संरक्षित दूरध्वनी यंत्रणा (हॉटलाइन) नुकतीच सुरू करण्यात आल्याचे अमेरिकेतर्फेobama जाहीर करण्यात आले आहे.
 • दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्येही अशी हॉटलाइन सुरू करण्यात आली आहे.
 • हॉटलाइन सुरू होऊन काही दिवस झाले असले तरी अद्याप त्याचा वापर करण्यात आलेला नाही.
 • अत्यंत जवळच्या दोन भागीदारांना सर्वोच्च पातळीवरून विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी ही हॉटलाइन सुरू केली आहे.
 • देशाच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये चर्चेसाठी असलेली भारताची ही पहिलीच हॉटलाइन असून, अमेरिकेबरोबर हॉटलाइन असलेला भारत हा फक्त चौथाच देश आहे.
 • चीन, रशिया आणि ब्रिटनबरोबरही अमेरिकेचा हॉटलाइनद्वारे संपर्क आहे.
 • परराष्ट्र सचिव पातळीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हॉटलाइन सुरू करण्याचा निर्णय 2004 मध्ये होऊन ती अमेरिकी लष्कराच्या मदतीने सुरू करण्यात आली आहे.
 • तसेच, चीनबरोबरही परराष्ट्रमंत्री पातळीवरील हॉटलाइन सुरू करण्याचे 2010 मध्ये ठरले आहे.
 • परंतु चीनबरोबरील हॉटलाइन अद्याप कार्यान्वित झालेली नाही.

विविध सामुग्रीवापरून 10 वस्तू तयार करणारे “थ्री डी” प्रिंटर तयार :

 • एकाच वेळी विविध सामुग्री (मटेरियल) वापरून 10 वस्तू तयार करणारे “थ्री डी” प्रिंटर तयार केल्याचा दावा मॅसेच्युसेट्‌स इन्स्टिट्युट ऑफ टेक्‍नॉलॉजीतील (एमआयटी) संशोधकांनी केला आहे.
 • “थ्री डी” प्रिंटिंग तंत्रज्ञानाद्वारे एखाद्या वस्तूच्या त्रिमितीय प्रतिमेद्वारे एका वेळी एकच मटेरियल असलेली एकच वस्तू तयार करता येणे शक्‍य आहे.
 • मात्र एकाच वेळी विविध मटेरियल्स वापरून तब्बल 10 वस्तू तयार करण्याची क्षमता असलेले प्रिंटर एमआयटीतील संशोधकांनी विकसित केले आहे.
 • या प्रिंटरला “मल्टिफॅब” असे नाव देण्यात आले असून इलेक्‍ट्रिकल, मेकॅनिकल आदी क्षेत्रात विविध वस्तू तयार करण्यासाठी हे तंत्र उपयोगी ठरेल असा विश्‍वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.
 • यापूर्वी दोन किंवा तीन मटेरियल्सद्वारे “थ्री डी” प्रिंटिंग करता येणे शक्‍य होते.
 • मात्र आम्ही या क्षमता वाढवून एकाच वेळी 10 वेगवेगळ्या मटेरियल्सद्वारे दहा वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचे तंत्र शोधले आहे.
 • तसेच हे प्रिंटर 40 मायक्रॉन पर्यंतच्या दर्जाची वस्तू तयार करू शकत असल्याचेही पुढे म्हटले आहे.
 • या प्रिंटरची सुरुवातीची विक्री किंमत 7 हजार डॉलर निश्‍चित करण्यात आली असून अद्याप ते विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले नाही.

पतंजली आयुर्वेद कंपनीने अधिकृतरित्या भागीदारी जाहीर केली :

 • संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने अधिकृतरित्या भागीदारी जाहीर केली.
 • आता डीआरडीओने विकसीत केलेल्या आयुर्वेदिक सप्लीमेंट्स आणि अन्न पदार्थांची देशात व परदेशात विक्री तसेच जाहिरात रामदेव बाबा करणार आहेत.
 • यासाठी सरंक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग, डीआरडीओ प्रमुख एस. क्रिस्तोफर आणि रामदेव बाबा यांच्या उपस्थित एक करार करण्यात आला.
 • पतंजली योगपीठ आणि ‘डीआरडीओ’च्या डिफेंस इन्स्टिट्युट ऑफ हाय अल्टिट्युड रिसर्च (DIHAR) मध्ये हा करार झाला.
 • या करारानुसार ‘डीआरडीओ’च्या लेह येथील ‘डीआयएचएआर’ या प्रयोगशाळेत उत्पादनांची चाचणी होणार आहे.
 • या प्रयोगशाळेत शेती व प्राण्यांवर आधारित उत्पादनांचे विकसन केले जाते.
 • उत्पादनांच्या तपासणीसाठी या प्रयोगशाळेचा वापर होईल आणि तयार होणाऱ्या उत्पादनांची विक्री व जाहिरातीसाठी पतंजली योगपीठ मदत करेल.
 • याशिवाय ‘डीआयएचएआर’ आणि पतंजली यांच्यात तांत्रिक देवाण-घेवाण देखील होणार आहे.
 • ‘डीआयएचएआर’ रामदेव बाबांच्या पतंजली योगपीठाला आपली पाच उत्पादने कशी तयार करायची याची तांत्रिक माहिती देणार आहे.

यू मुंबा संघाला प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामातील विजेतेपद प्राप्त :

 • अनुप कुमारच्या नेतृत्वाखालील यू मुंबा संघाने प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामातील विजेतेपद प्राप्त केले. Pro Kabaddi League 2015
 • अखेरच्या काही मिनिटांपर्यंत उत्कंठा टिकवणाऱ्या अंतिम सामन्यात यू मुंबाने बंगळुरू बुल्सचा 36-30 असा पराभव केला.
 • प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामातील विजेत्याला 1 कोटी रुपये आणि चषक देण्यात आले.
 • तसेच उपविजेत्याला 50 लाख तसेच तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघाला अनुक्रमे 30 आणि 20 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

‘पहल’ योजनेचे नाव आता गिनीज बुकमध्ये :

 • विविध प्रकारची अनुदाने थेट बँक खात्यात जमा करण्याच्या तेल व पेट्रोलियम कंपन्यांच्या व्यवहारांची वाढती संख्या आणि त्याची गती या मुद्यावर ‘पहल’ योजनेचे नाव Guinness world recordआता गिनीज बुकमध्ये नोंदले गेले आहे.
 • ‘प्रत्यक्ष हस्तांतरण लाभ’ (पहल) असे या योजनेचे नाव असून अनुदानाची रक्कम लाभार्थीच्या खात्यात जमा करण्याच हा जगातील सर्वात मोठा यशस्वी प्रयोग ठरला आहे.
 • या विक्रमीच गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी याकरिता इंडियन ऑईल कंपनीने एक अर्ज गिनीज बुक व्यवस्थापनाकडे केला होता. तसेच, आपल्या दाव्याच्या पुष्ठर्थ्य आकडेवारीदेखील सादर केली.
 • अशा प्रकारची योजना राबविणाऱ्या देशांतील आकडेवारीचा आढावा घेतल्यानंतर आणि त्यानंतर भारतातील दाव्याची सत्यता पटल्यानंतर हा या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे.

जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धात बोल्टला सुवर्णपदक :

 • जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत बोल्टने 9.79 सेकंदात 100 मीटरचे अंतर पूर्ण करून जेतेपद कायम राखले.
 • अमेरिकेच्या जस्टीन गॅटलीनकडून त्याला कडवी टक्कर मिळाली.
 • गॅटलीनने 9.80 सेकंदाज शर्यत पूर्ण केली.
 • अवघ्या 0.1 सेकंदाच्या फरकाने गॅटलीनचे सुवर्णपदक हुकले.
 • कॅनडाचा अ‍ॅड्रे डे ग्रासे (9.92 से.) आणि अमेरिकेचा ट्रायव्हॉन ब्रोमेल (9.92 से.) यांनी समान वेळ नोंदविल्यामुळे संयुक्तरित्या कांस्यपदक देण्यात आले.

दिनविशेष :

 • 1609 : गॅलेलियोने आपल्या प्रथम दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.
 • 1718 : न्यू ऑर्लिअन्स शहराची स्थापना.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World