Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs of 28 October 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (28 ऑक्टोबर 2015)

चालू घडामोडी (28 ऑक्टोबर 2015)

पुणे विभाग लाचखोरीत पहिल्या क्रमांकावर :

 • लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे गेल्या वर्षापासून मोठ्या प्रमाणात करण्यात येत असलेली जनजागृती, कारवाईचा बडगा यामुळेच गेल्या वर्षाअखेर लाचखोरीत अव्वल असणारा नाशिक विभाग यंदा लाचखोरीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 • पुणे (187) विभागापाठोपाठ नाशिकमध्ये यंदा 161 सापळे यशस्वी झाले आहेत.
 • नाशिक, नगर, जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नाशिक परिक्षेत्रात गेल्या वर्षीप्रमाणेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे.
 • यामध्ये सर्वाधिक यशस्वी सापळे जळगाव (53) जिल्ह्यात झाले असून, नंदुरबार (10) जिल्ह्यात सर्वाधिक कमी सापळे आहेत.

फेसबुक युजर्ससाठी फेसबुकने “सेफ्टी चेक” टूल उपलब्ध :

 • भारतासह, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपग्रस्त भागातील फेसबुक युजर्ससाठी फेसबुकने “सेफ्टी चेक” टूल उपलब्ध करून दिले आहे. facebook
 • या टूलद्वारे भूकंपग्रस्त भागात असलेला युजर सुरक्षित असल्याचा संदेश मिळणार आहे.
 • भूकंपाच्या अनुभव आणि या “सेफ्टी टूल”बाबत माहिती झुकेरबर्गने फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली आहे.
 • भूकंपग्रस्त भागातील नागरिकांना आपल्या सुरक्षिततेची माहिती इतरांना देण्यासाठी फेसबुकवर https://www.facebook.com/safetycheck/afghanistanearthquake-oct2015/ या लिंकवर जाऊन सुरक्षित असल्याची माहिती जतन करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
 • त्याद्वारे इतरांना संबंधित युजरची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

नोव्हेंबरमध्ये मॅगी भारतातील बाजरात उपलब्ध होईल :

 • “नेस्ले”ने भारतामध्ये “इन्स्टंट मॅगी”चे उत्पादन सुरु केले असून तपासणीनंतर ती बाजारात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. Maggi
 • साधारण नोव्हेंबरमध्ये मॅगी भारतातील बाजरात उपलब्ध होईल, अशी आशा “नेस्ले”च्या प्रवक्‍त्याने व्यक्त केली आहे.
 • भारतातील नाजनगड (कर्नाटक), मोगा (पंजाब) आणि बायचोलिम (गोवा) या तीन ठिकाणी “मॅगी नूडल्स”चे उत्पादन सुरु केले आहे.
 • आरोग्यासाठी अपायकारक घटक सापडल्याने मॅगीवर संपूर्ण भारतात बंदी आणण्यात आली होती.
 • त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने नव्याने उत्पादन करण्यात आलेल्या “मॅगी”चे नमुने तीन प्रयोगशाळांद्वारे तपासण्याचे आदेश दिले होते.
 • त्यामुळे आता नव्याने तयार करण्यात आलेल्या “मॅगी”चे नमुने लवकरच प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
 • त्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यावर मॅगी बाजारात विक्रीसाठी खुली करण्यात येणार आहे.

मंत्रालयात महिला कर्मचाऱ्यांसाठी हिरकणी कक्षाचा प्रारंभ :

 • मंत्रालयात काम करणाऱ्या स्तनदा महिला कर्मचाऱ्यांसाठी हिरकणी कक्षाचा प्रारंभ करण्यात आला.
 • महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.

आघाडीचा फलंदाज जो रुट याला कसोटीतील अव्वल फलंदाजाचे स्थान :

 • इंग्लंडचा आघाडीचा फलंदाज जो रुट याने पुन्हा कसोटीतील अव्वल फलंदाजाचे स्थान मिळविले आहे. virat Kohali
 • तर, भारताच्या विराट कोहली 11 वरून 13 वर घसरला आहे.
 • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच कसोटी क्रमावारी जाहीर केली.
 • कोहलीनंतर भारताचा चेतेश्वर पुजारा 20 व्या, मुरली विजय 21, अजिंक्य रहाणे 22, शिखर धवन 32रोहित शर्मा 46 व्या स्थानी आहेत.
 • मिस्बाहने 102 व 86 धावा करून क्रमावारीत 5 अंकांची सुधारणा करून 11 व्या स्थानी झेप घेतली.
 • शफीकने 83 व 87 धावांची खेळी करून आत्तापर्यंतचे सर्वश्रेष्ठ 12वे स्थान मिळविले.
 • गोलंदाजीत भारताचा रविचंद्रन आश्विन आठव्या स्थानी कायम आहे.
 • अव्वल गोलंदाजांत डेल स्टेन याने आपले अग्रस्थान कायम राखले आहे.
 • दुबईत 8 बळी मिळविणारा पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज यासीर शाह याने प्रथमच दुसरे स्थान मिळविले आहे.

अंतराळ कचऱ्यातील एक मोठा तुकडा पृथ्वीवर आदळणार :

 • अंतराळ कचऱ्यातील एक मोठा तुकडा पृथ्वीवर आदळणार असून या घटनेबाबत भीतीयुक्त औत्सुक्य निर्माण झाले आहे.
 • अपोलो अंतराळ मोहिमेच्या काळातील किंवा अलीकडील चांद्रमोहिमेदरम्यानच्या असू शकणाऱ्या या मानवनिर्मित तुकड्याचे ‘डब्ल्यूटी1190एफ’ असे नामकरण करण्यात आले आहे.
 • तथापि ‘डब्ल्यूचीएफ’ या टोपणनावाने तो ओळखला जातो.
 • ‘डब्ल्यूचीएफ’ 13 नोव्हेंबरला सकाळी सहा वाजून 15 मिनिटांनी पृथ्वीवर कोसळेल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
 • हा तुकडा पोकळ असून तो रॉकेटचा वापर झालेला भाग किंवा अलीकडील चांद्र मोहिमेचे ‘पॅनेलिंग शेड’ असू शकतो.
 • या तुकड्याचा व्यास एक ते दोन मीटर असून तो श्रीलंकेच्या दक्षिण टोकापासून ४० मैल अंतरावर हिंद महासागरात कोसळण्याची शक्यता आहे.
 • पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर हा तुकडा जळून जाणे अपेक्षित आहे मात्र तसे न झाल्यास त्याचे उर्वरित अवशेष बॉम्बसारखे आदळू शकतात, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

दिनविशेष :

 • 1811 : संस्थानिक यशवंतराव होळकर यांचे निधन Dinvishesh
 • 1867 : हिंदू धर्म संस्कृतीच्या सखोल अभ्यासक, स्वामी विवेकानंदांच्या पाश्च्यात्य शिष्या मार्गारेट नोबेल उर्फ भगिनी निवेदिता यांचा जन्म.
 • 1885 : राष्ट्रीय सभेची स्थापना.
 • 1955 : बिल गेट्स यांचा जन्म

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World