Current Affairs of 28 February 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (28 फेब्रुवारी 2018)

चालू घडामोडी (28 फेब्रुवारी 2018)

विद्यार्थी कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी किशोरी पसारे :

 • शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी कमला महाविद्यालयाची विद्यार्थिनी किशोरी राजू पसारे, तर सचिवपदी साताराच्या आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनचा विद्यार्थी अमित विकास भिसे याची बिनविरोध निवड झाली.
 • कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दोघांचा सत्कार केला. महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्‍टच्या अंमलबजावणीनंतर विद्यार्थी मंडळासाठी ही पहिलीच निवड प्रक्रिया झाली.
 • अध्यक्षपदासाठी किशोरी व न्यू कॉलेजचा विद्यार्थी अभिषेक दादासाहेब श्रीराम यांनी अर्ज दाखल केले होते. अभिषेकने अर्ज माघारी घेतल्याने अध्यक्षपदी किशोरीचे नाव निश्‍चित झाले.
 • तसेच दोघांच्या निवडीची घोषणा कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केली. त्यांचा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पुस्तक देऊन सत्कार केला.

ए.के. प्रधान पीएनबी ग्रुपचे चीफ रिस्क ऑफिसर :

 • पंजाब नॅशनल बँकेने ग्रुप चीफ रिस्क ऑफिसर म्हणून ए.के. प्रधान यांची नियुक्ती केली आहे. सध्या त्यांच्याकडे पीएनबीचे जनरल मॅनेजर पद होते. मात्र आता त्यांची नियुक्ती ग्रुप चीफ रिस्क ऑफिसर म्हणून करण्यात आली आहे.
 • पब्लिक सेक्टरमध्ये येणाऱ्या बँकांनी तांत्रिकी घोळ आणि घोटाळे टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी येत्या 15 दिवसांच्या कालावधीत घ्यावी असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर लगेचच ए.के. प्रधान यांना ग्रुप चीफ रिस्क ऑफिसर म्हणून नियुक्त केले.

कर्नाटकात पहिलीपासून कन्नड भाषेची सक्ती :

 • यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून कर्नाटकमध्ये पहिलीपासून कन्नड सक्तीचा विषय असल्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रात मराठी सक्ती कधी होणार हा विषय ऐरणीवर आला आहे.
 • सध्या महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मराठीचा मुद्दा उपस्थित करत पहिली ते दहावीपर्यंत मराठी सक्तिची करण्याची मागणी केली आहे.
 • नुकताच कर्नाटकमध्ये अशाच प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी शाळा असोत, अल्पसंख्याकांच्या असोत वा राज्य व केंद्राच्या बोर्डाच्या असोत कन्नड सर्व शाळांमध्ये शिकवली जाणार आहे.
 • प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री तनवीर सैत यांनी हा निर्णय जाहीर केला आणि पहिलीपासून मुलांना कन्नडचे धडे शिरवण्यात येतील असे सांगितले.
 • अर्थात, पहिली तीन वर्षे कन्नडची परीक्षा घेण्यात येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. चौथ्या इयत्तेपासून परीक्षा द्यावी लागणार आहे. समजा, बाहेरच्या राज्यातून कर्नाटकमध्ये एखादा विद्यार्थी चौथीत असताना आला तर त्यालाही तीन वर्षे म्हणजे सहावीपर्यंत परीक्षा द्यावी लागणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील 104 डॉक्‍टरांच्या नियुक्‍त्या रद्द :

 • महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्याच्या विविध ठिकाणी वैद्यकीय अधिकारी गट-अ या पदावर डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यात आली होती. यातील 104 डॉक्‍टर हे पदावर रुजू न झाल्याने त्यांची नियुक्‍ती रद्द करण्यात आली.
 • ग्रामीण भागात डॉक्‍टरांची कमतरता असल्याने आरोग्य विभागातर्फे स्वतंत्र नियंत्रण मंडळ स्थापन करून समुपदेशनाद्वारे डॉक्‍टरांच्या नेमणुका करण्यात आल्या. या नेमणुका करताना डॉक्‍टरांच्या आवडीनुसार सेवा देण्याचे स्थळ निश्‍चित करण्यात आले होते. तरीही 104 डॉक्‍टर रुजू झाले नाहीत. यामुळे आरोग्य विभागातर्फे 104 डॉक्‍टरांची नियुक्ती रद्द केली आहे.
 • ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी डॉक्‍टर तयार होत नाहीत. यामुळे रुग्णसेवा कोलमडली आहे. हे थांबविण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी उपाय करण्यात येत असतात. चार व पाच डिसेंबर 2017 मध्ये करण्यात आलेल्या नेमणुका या डॉक्‍टरांच्या मर्जीनुसार त्यांच्या आवडत्या ठिकाणी करण्यात आल्या होत्या. तरीही डॉक्‍टरांचे रुजू होण्याचे प्रमाण कमी आहे. ग्रामीण भागात प्रामुख्याने सुविधांचा असणारा अभाव हे यामागील प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट होत आहे.

भारत हा जगाच्या अर्थव्यवस्थेतील वेगवान देश :

 • जगाच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की भारत हा जगाच्या अर्थव्यवस्थेतील वेगवान देश आहे. जीडीपीद्वारे जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याकडे भारताची वाटचाल सुरु आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
 • दिल्लीतील भारत-कोरिया व्यापार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या पाठोपाठ केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनीही भारतीय अर्थव्यवस्था प्रगतीपथावर असून आपण लवकरच जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान मिळवू असेही म्हटले आहे.
 • भारत आणि कोरिया यांच्यात अनेक समानता आहेत. गौतम बुद्धांचे अनुयायी कोरियात आहेत तसेच ते भारतातही आहेत. बॉलिवूड असो किंवा साहित्यिक असोत दोन्ही देशांमध्ये या समानता दिसून येतात.
 • जगात असे अनेक देश आहेत ज्या देशांच्या अर्थव्यवस्थेत डेमोक्रेसी, डिमोग्राफी आणि डिमांड हे पाहायला मिळतात. भारतीय अर्थव्यवस्थेतही या तिन्ही गोष्टी आहेत याचा अभिमान वाटतो अशीही प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी दिली.

दिनविशेष :

 • सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1873 मध्ये झाला.
 • भारताचे 10वे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1927 रोजी झाला.
 • सन 1928 मध्ये 28 फेब्रुवारी रोजी डॉ. सी.व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.
 • 28 फेब्रुवारी 1963 हा दिवस भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांचा स्मृतीदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 मार्च 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.