Current Affairs (चालू घडामोडी) of 28 December 2014 For MPSC Exams

 Current Affairs (चालू घडामोडी) of 28 December 2014

अ.क्र
ठळक घडामोडी
1. त्सुनामीचा दहावा स्मृती दिन
2. आयएएस प्रवेश वयोमर्यादेबाबत राज्यांना विचारणा
3. हवामानवर आधारित विमा योजना
4. मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेला ‘एक्सलन्स अवॉर्ड’
5. भारतीय संशोधकाने बनविले कृत्रिम शुक्राणू
6. सागरी जलचराच्या सात फुट लांबीच्या जीवाश्माचा शोध
7. राजीव गांधी एक्सलन्स पुरस्कार राजश्री विश्वासराव यांना प्रदान
8. महाराष्ट्रचा समुद्रकिनारा देशात सर्वात प्रदूषित
9. सरकारी सेवा लवकरच एका क्लिकवर
10. जीएसटी येणार
11. दिनविशेष

 

त्सुनामीचा दहावा स्मृती दिन :

 • भूकंपात दगावलेल्यांना विविध ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली.
 • या भूकंपात सात हजारांहून अधिक नागरिक ठार झाले होते.

आयएएस प्रवेश वयोमर्यादेबाबत राज्यांना विचारणा :

 • राज्य सेवा अधिकार्‍यांना आयएएस व आयपीएससह अन्य सेवांमध्ये सामील करून घेण्याकरिता 54 वर्षाच्या विद्यमान वयोमर्यादेत वाढ करण्याबाबत केंद्राने राज्य सरकारांना त्यांचा अभिप्राय विचारला आहे.
 • भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा व भारतीय वन सेवेमध्ये राज्य सरकारातील अधिकार्‍यांना सामील करण्याबाबत विचार करण्यासाठी वयाची कमाल मर्यादा 54 वर्षाची आहे.
 • केंद्रात सेवानिवृत्तीचे वय 60 करण्यात आले आहे.

हवामानवर आधारित विमा योजना :

 • सरकार यापुढे शाश्वत शेती विकासावर भर देणार असून, वर्षभरात पाच हजार गावे दुष्काळमुक्त करण्यासंबंधी प्रयत्न केला जाणार आहे.
 • हवामानवर आधारित विमा योजना आणताना प्रारंभी 2056 हवामानाची केंद्रे उभारण्यात येतील.
 • प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यातील 29 हजार ग्रामपंचायतींमध्ये हवामानाची केंद्रे उभारण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेला ‘एक्सलन्स अवॉर्ड’ :

 • मुंबई पोलिसांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना ‘नॅसकॉम‘ आणि ‘डीएससीआय‘ या संस्थेतर्फे राष्ट्रीय स्तरावरील ‘एक्सलन्स अवॉर्ड‘ देवून गौरवण्यात आले आहे.
 • पोलिस उपयुक्त डॉ. धनंजय कुलकर्णी आणि सायबर सेलचे सहाय्यक पोलिस आयुक्त नंदकिशोर मोरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

भारतीय संशोधकाने बनविले कृत्रिम शुक्राणू :

 • स्टेमसेल्स म्हणजेच मुळपेशींचा उपयोग आता वैद्यकीय संशोधनात मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.
 • या पेशींपासून शरीरातील कोणत्याही अवयवाच्या पेशींची निर्मिती करता येते.
 • भारतीय वंशाच्या संशोधकांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या एका पथकाने स्टेमसेल्स च वापर करून एक शुक्राणू तयार केला आहे.
 • प्रा. आझिम सुरानी याने हा कृत्रिम शुक्राणू बनवीला आहे.

सागरी जलचराच्या सात फुट लांबीच्या जीवाश्माचा शोध :

 • ब्रिटनच्या संशोधकाने साऊथ वेल्सच्या किनार्‍यावरील सागरी जलचराच्या सात फुट लांबीच्या जिवाश्माचा शोध घेतला आहे.
 • एका मांसाहारी जलचराचा सात फुटचा सांगाडा यामध्येस्पष्टपणे दिसून येतो.
 • जॉनशन बो असे या 34 वर्षाच्या संशोधकाचे नाव आहे.

राजीव गांधी एक्सलन्स पुरस्कार राजश्री विश्वासराव यांना प्रदान :

 • यंदाचा राजीव गांधी एक्सलन्स पुरस्कार तरुण उद्योजक राजश्री उर्फ विश्वासराव यांना प्रदान करण्यात आला.
 • नवी दिल्लीत झालेल्या विशेष समारंभात तामिळनाडूचे माजी राज्यपाल भीष्मा नारायण सिंह यांच्या हस्ते देण्यात आला.
 • राजीव गांधी एक्सलन्स पुरस्कार दर वर्षी इंडियन सॉलीङॅरिटी कौन्सिलतर्फे देण्यात येतो.

महाराष्ट्रचा समुद्रकिनारा देशात सर्वात प्रदूषित :

 • महाराष्ट्रचा समुद्रकिनारा देशात सर्वात प्रदूषित आहे, असा ठपका केंद्र सरकारची समुद्र विज्ञान संस्था आणि राज्याच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एकत्रित अहवाल ठेवला आहे.
 • भारताच्या पश्चिमेकडील सागरी किनारपट्टीवरील पाण्याच्या तब्बल 1100 नमून्यांचे परीक्षण केले.
 • भौतिक, रासायनिक, जैविक अशा पातळ्यांवर 25 घटकांची तपासणी करण्यात आली आहे.
 • महाराष्ट्रचा 720 किलोमीटर चा समुद्र किनारा सर्वात जास्त प्रदूषित झाल्याचे उघड झाले.

सरकारी सेवा लवकरच एका क्लिकवर :

 • अमेरिकेतील मॉडेलच्या धर्तीवर बहुतांशी सरकारी सेवा मोबाईलच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत.
 • आयटी क्षेत्रातील जाणकारांच्या मदतीने सरकारी सवलती आणि सेवांसाठी अर्ज, शुल्क भरण्याची व्यवस्था असलेले, तसेच तक्रारी व व्यथा स्विकारणारे एँप तयार करण्यात आले आहे.
 • सरकारदरबारी केलेल्या तक्रारीचे किवा एखाद्या सेवेच्या मागणीचे काय झाले, याची नोंद किवा त्या कागदाचा प्रवास कसं सुरू आहे, याची माहिती संबधितांना एमएमएसव्दरे कळवण्याची योजना आहे.

 

जीएसटी येणार :

 • जीएसटी‘ ही जगात मान्य झालेली कर प्रणाली आहे.
 • आपल्या देशात किती लवकर ‘जीएसटी‘ची अंमलबजावणी होईल यावर भविष्य प्रगतिची वाटचाल अवलंबून आहे.
 • ही कर प्रणाली लागू झाल्यास देशाचे एकंदर राष्ट्रीय उत्पादन सुमारे 1.5% वाढेल, असा अंदाज आहे.

 • जीएसटी‘ला 1 एप्रिल 2016 ला हिरवा झेंडा दाखवला जाईल.
 • जीएसटी‘ मुळे वस्तु व सेवांच्या किमतीमध्ये समाविष्ट करांवर परत कर न लागल्याने वस्तूच्या किमती कमी होतील.

 

दिनविशेष :

 • 1948 – मुंबई राज्यात ‘कसेल त्याची जमीन‘ हा कुल कायदा लागू झाला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.