Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs (चालू घडामोडी) of 29 December 2014 For MPSC Exams

 Current Affairs (चालू घडामोडी) of 29 December 2014

अ.क्र
ठळक घडामोडी
1. विजय चौधरी बनला ‘महाराष्ट्रचा केसरी’
2. ‘कॅट’चा निकाल जाहीर
3. रघुवीर दास यांनी आज शपथ घेतली
4. IIT संचालकाचा राजीनामा
5. राज्याच्या कृषी विभागाला केंद्राचा पुरस्कार
6. राज्याच्या कृषी विभागाला केंद्राचा पुरस्कार
7. ई-मेल सेवाही ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत
8. ‘ईबोला’ वर आता रक्ताधारित
9. दुसर्‍या पत्नीचाही निवृत्तीवेतनावर हक्क
10. रणवीर, ऋचा ठरले ‘बॅचलर ऑफ ईअर

 

विजय चौधरी बनला ‘महाराष्ट्रचा केसरी’ :

 • कुस्तीतील मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र केसरी हा किताब जळगावच्या विजय चौधरीने पटकावला आहे.
 • रविवारी पुण्यात अंतिम सामन्यात विजयने बाजी मारत महाराष्ट्र केसरीवर नाव कोरले आहे.
 • केसरी किताब पटकावणारा विजय हा 41वा कुस्तीपटू आहे.

‘कॅट’चा निकाल जाहीर :

 • 19’इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट’ आणि अन्य व्यवस्थापन शिक्षण संस्थांमधील प्रवेशांसाठी 16 व 22 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परिक्षेचा (कॅट) निकाल शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला.

रघुवीर दास यांनी आज शपथ घेतली  :

 • झारखंडचे नवे मुख्यमंत्री रघुवीर दास यांचा शपथविधी सोहळा होत आहे.
 • दुपारी 12 वाजता येथील बिरसा मुंडा फूटबॉल स्टेडियमवर हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

IIT संचालकाचा राजीनामा :

 • आयआयटी दिल्लीचे संचालक डॉ. रघुनाथ शेवगांवकर यांनी शनिवारी रात्री संचालक पदाचा राजीनामा दिला.
 • केंद्रीय मनुष्यबळ खात्याच्या दबावाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला असल्याचे समजते.
 • मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला आयआयटीच्या मैदानात क्रिकेट अ‍ॅकेडमी सुरू करण्याची परवानगी देणे आणि सुब्रमन्यम स्वामी यांचे 1972 ते 1991 या कलावधीतील थकीत वेतन 18% व्याजणे देणे या दोन प्रमुख गोष्टींचा दबावामुळे राजीनामा देण्याचे कारणे म्हटले जात आहे.

राज्याच्या कृषी विभागाला केंद्राचा पुरस्कार :

 • डाळींच्या उत्पादन वाढीसाठी राबवलेल्या मोहिमेसाठी राज्य सरकारला केंद्रीय कृषी मंत्रालयचा 1 कोटी रूपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • त्यामुळे डाळींच्या उत्पादनात वाढ झाली आहे.
 • या प्रयत्नाचा गौरव केंद्रीय कृषी विभागाकडून करण्यात आला आहे.
 • डाळींच्या उत्पादकतेत 20 ते 30% वाढ झाली आहे.

ई-मेल सेवाही ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत :

 • केंद्रीय दूरसंचार विभागाकडून प्रस्ताव.
 • गूगल, याहू यांसारख्या कंपन्यांनी सुरू केलेली ई-मेल सेवाही आता ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे.
 • भविष्यात आपल्याला ई-मेल सेवेसंदर्भातील तक्रारींबाबत ग्राहक न्यायालयात दादा मागता येणे शक्य होणार आहे.

‘ईबोला’ वर आता रक्ताधारित :

 • संशोधकांनी या आजारावर आता रक्ताचा उपयोग करून उपचार करण्याची एक नवी पद्धती विकसित केली आहे.
 • या आजारातून बचावलेल्या रुग्णांचा प्लाझमा रुग्णांना देण्याचा हा उपाय आहे.
 • या प्लाझमामध्ये ईबोला विषानुविरुद्ध लढणारी प्रतिजैविके असतात.

दुसर्‍या पत्नीचाही निवृत्तीवेतनावर हक्क :

 • अनुच्छेद 15 नुसार केंद्रीय प्रशासकीय लवादाने 28 जानेवारी 2014 रोजी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत कार्यरत दिवंगत कर्माचार्‍यांच्या

 • पहिल्या व दुसर्‍या पत्नीला कौटुंबिक निवृत्तीवेतन समान भागात विभागून देण्याचा आदेश दिला आहे.

 • हायकोर्टने अन्य भागात नियम लागू करण्याची सूचना दिली आहे.

रणवीर, ऋचा ठरले ‘बॅचलर ऑफ ईअर’ :

 • रणवीरसिंह आणि ऋचा चढा यांना 2014 चा ‘बॅचलर ऑफ ईअर‘ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • मुंबईच्या हार्डरॉक कॅफेमध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रदान करण्यात आला.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World