Current Affairs of 27 May 2015 For MPSC Exams
फिरकी गोलंदाज हसन रझा याच्यावर दोन वर्षांची बंदी:
- उत्तेजक सेवन प्रकरणात दोषी आढळल्याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाने फिरकी गोलंदाज हसन रझा याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे.
- स्थानिक स्पर्धेदरम्यान जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या क्रिकेटपटूंच्या नमुन्यात तो दोषी आढळला.
- त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, तर न्यूझीलंडविरुद्ध टी 20 क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल.
Must Read (नक्की वाचा):
दिल्लीमधील सार्वजनिक वाहनांमध्ये जीपीएस अनिवार्य:
- राजधानी दिल्लीमधील सार्वजनिक वाहनांमध्ये जीपीएस अनिवार्य करण्याचा निर्णय आम आदमी पक्षाच्या सरकारने घेतला आहे.
- तसेच अलीकडेच दिल्लीच्या वाहतूक विभागाने सर्व वाहनांच्या योग्यतेच्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणे आवश्यक असल्याचे जाहीर केले होते.
- त्यानंतर आता सर्व सार्वजनिक वाहनांमध्ये जीपीएस अनिवार्य करण्यात आले आहे.
- या निर्णयाची 1 जूनपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
- “एक जूननंतर कोणत्याही व्यावसायिक किंवा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा असल्याशिवाय योग्यतेचे प्रमाणपत्र देण्यात येणार नाही.
- तसेच दिल्ली इंटिग्रेटेड मल्टि-मोडल ट्रान्सिट सिस्टिम्स लि. (डीआयएमटीएस) यांच्याकडून जीपीएस खरेदी करण्यात येणार आहे.
भारत आणि व्हिएतनामच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षऱ्या :
- भारत आणि व्हिएतनामने पुढील पाच वर्षांसाठी संरक्षण क्षेत्रातील सहकार्याबद्दलच्या संयुक्त निवेदनावर आज स्वाक्षऱ्या केल्या.
- भारतीय संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि व्हिएतनामचे संरक्षणमंत्री यांच्यातील बैठकीनंतर दोन्ही देशांदरम्यान पुढील पाच वर्षांसाठीच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
- तसेच, दोन्ही देशांच्या तटरक्षक दलांमध्ये सहकार्य करण्याबाबतच्या सामंजस्य करारासही या वेळी मान्यता देण्यात आली.
- व्हिएतनामचे संरक्षणमंत्री सध्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.
कॉर्पोरेशन बॅंकेची गृहकर्जाच्या दरात कपात करण्याची घोषणा :
- कॉर्पोरेशन बॅंकेने गृहकर्जाच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे.
- कॉर्पोरेशन बॅंकेने किमान कर्जदर (बेस लेंडिंग रेट) 0.25 टक्क्यांनी कमी करून 10 टक्के इतका केला आहे.
- त्यामुळे आता ईएमआय कमी होणार असून कॉर्पोरेशन बॅंकेच्या गृहकर्जधारकांना दिलासा मिळणार आहे.
- हे दर 1 जूनपासून लागू करण्यात येणार आहेत.
- यापुर्वी पंजाब नॅशनल बॅंक, आयडीबीआय, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक आणि अॅक्सिस बॅंक, एचडीएफसीयांनी व्याजदरांत 0.15 ते 0.25 टक्के कपात केली.
दिनविशेष :
- 1935 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे निधन.
- 1938 – कादंबरीकार कवी, समीक्षक साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचा जन्म.
- 1957 – कॉपीराईट संबंधीचा कायदा पास.
- 1964 – स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन.
- 2002 – कोनेरू हंपी ही ग्रँडमास्टर हा किताब मिळविणारी सर्वात तरुण महिला ठरली.