Current Affairs of 26 May 2015 For MPSC Exams

बारावीचा ऑनलाईन निकाल उद्या जाहीर होणार :

 • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा ऑनलाईन निकाल बुधवारी (ता. 27) दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
 • कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका 4 जूनला सकाळी 11 वाजता देण्यात येतील.
 • तसेच याच दिवशी दुपारी 3 वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल.
 • गुण पडताळणीसाठी विहीत शुल्कासह 15 जूनपर्यंत अर्ज करायचे आहेत.
 • विद्यार्थ्यांना या संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल
 • 1. www.mahresult.nic.in
 • 2. www.maharashtraeducation.com
 • 3. www.hscreult.mkcl.org
 • 4. www.rediff.com/exams
 • तसेच “सीबीएसई”चा बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून नवी दिल्लीतील न्यू ग्रीन फिल्ड शाळेची एम. गायत्री हिने 99 टक्के गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
 • देशपातळीवर या परीक्षेचा निकाल 82 टक्के लागला असून, मुलीचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 87 टक्के, तर मुलांचे प्रमाण 77 टक्के आहे.
 • तिरुअनंतपुरम विभागाचा निकाल सर्वाधिक 95 टक्के लागला आहे. संपूर्ण देशातून 10 लाख 40 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 25 May 2015

“डीडी किसान” ही शेतकरी-केंद्रित वाहिनी सुरू करण्यात येणार :

 • सरकारी दूरचित्रवाणी दूरदर्शनच्या वतीने “डीडी किसान” ही शेतकरी-केंद्रित वाहिनी सुरू करण्यात येणार आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी या वाहिनीचे उद्‌घाटन होणार आहे.
 • केबल आणि डायरेक्‍ट टू होम (डीटीएच) सेवा पुरवठादारांसाठी त्यांच्या ग्राहकांसाठी “डीडी किसान” वाहिनीचे प्रक्षेपण करणे बंधनकारक असेल.
 • “प्रत्येक राज्यात शेतकरी आहेत. त्यामुळे केबल कायद्यानुसार डीडी किसान ही “मस्ट कॅरी” वाहिनी बनविण्यात आली आहे. त्यामुळे त्याचे प्रक्षेपण करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे,” असे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.

मोदी सरकारचे चालणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन :

 • केंद्रातील सत्तेला एक वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त नरेंद्र मोदी सरकारने महिनाभर चालणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
 • याअंतर्गत केंद्र सरकारने साध्य केलेली उद्दिष्टे आणि योजना यांचा प्रचार करण्यासाठी देशभरातील साठ शहरांमधून आणि 345 फिरत्या वाहनांमधून प्रदर्शन मांडण्यात येणार आहे.
 • केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी आज अशा एका प्रदर्शनाचे उद्‌घाटन केले.
 • राजधानी दिल्लीमध्ये आज सुरू झालेले हे प्रदर्शन एक जूनपर्यंत चालणार असून, उद्यापासून (ता. 26) ते राज्यांच्या राजधान्यांमध्येही अशी प्रदर्शने सुरू होणार आहेत.
 • तसेच आणखीही काही शहरांमध्ये हे प्रदर्शन स्थानिक भाषांमध्ये महिनाभर सुरू राहणार असल्याचेही जेटलींनी सांगितले.
 • प्रदर्शनाव्यतिरिक्त सुमारे 345 फिरत्या वाहनांमधून टप्प्याटप्प्यांत जिल्हा पातळीवर केंद्राच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे.
 • केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती सांगणारी पंतप्रधान मोदींच्या भाषणांची ध्वनिफीतही वाजविली जाणार आहे.

केंद्र सरकारची थेट परकी गुंतवणुकींच्या (एफडीआय) प्रस्तावांना मान्यता :

 • केंद्र सरकारने 280.70 कोटी रुपयांच्या 21 थेट परकी गुंतवणुकींच्या (एफडीआय) प्रस्तावांना मान्यता दिली आहे.
 • परकी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या शिफारशीनुसार ही मान्यता देण्यात आली आहे.
 • तसेच गुजरात येथे “ला रीनान हेल्थकेअर”ला ब्रोवनफिल्ड फार्मास्युटिकल कंपनीमध्ये 100 कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे.
 • सरकारने अजूनही 12 प्रस्ताव प्रलंबित ठेवले आहे. तर, सात प्रस्ताव फेटाळून लावले आहेत.
 • तसेच हुआवेई दूरसंचार (भारत) कंपनी प्रायव्हेट लिमिटेडतर्फे देण्यात आलेला एक प्रस्ताव मागे घेण्यात आला असल्याचेही एका अधिकृत पत्रात सांगण्यात आले आहे.

डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याच्या आदेशाला दिलेली स्थगितीला वाढविण्यास परवानगी :

 • डिझेलवर चालणाऱ्या दहा वर्षांपेक्षा अधिक काळ झालेल्या वाहनांवर दिल्ली-एनसीआरमध्ये बंदी घालण्याच्या आदेशाला दिलेली स्थगिती 13 जुलैपर्यंत वाढविण्यास राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने आज परवानगी दिली.
 • दहा वर्षांपेक्षा अधिक काळ झालेल्या डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना दिल्ली-एनसीआरमध्ये बंदी घालण्याचा आदेश हरित प्राधिकरणाने दिला होता.
 • या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या अडचणींबाबत केंद्र आणि राज्य सरकारने आपले म्हणणे तीन आठवड्यांमध्ये मांडावे, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले होते.
 • तसेच, केंद्र आणि राज्याच्या प्रतिसादानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी घेण्यात येईल, असेही प्राधिकरणाने नमूद केले आहे.

आयसीआयसीआय बँकेने सादर केली “व्हॉइस पासवर्ड” सुविधा :

 • आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांसाठी “व्हॉइस पासवर्ड” सुविधा सादर केली आहे.
 • या माध्यमातून ग्राहकांना केवळ आवाजाचा उपयोग करून बँकेचे सर्व व्यवहार करता येणार आहेत तसेच त्यासाठी कोणत्याही पासवर्डची आवश्यकता नाही.
 • “व्हॉइस रिकग्निशन सर्विस” मार्फत ग्राहकांच्या आवाजाची ओळख पटवून त्यांना फोनवरून बँकेचे व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे बँकेने सादर केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
 • आतापर्यंत व्यवहारांची गुप्तता राखण्यासाठी ग्राहकांना कार्ड नंबर सांगणे, सिक्युरिटी क्वेशन्सचे उत्तर देणे तसेच पिन नंबर सांगणे यासारख्या वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग करावा लागत असे. आता ग्राहकांचा आवाजच त्यांचा पासवर्ड म्हणून काम करेल असे बँकेने म्हटले आहे.
 • एकूण 3.3 कोटी सेव्हिंग्स खातेधारक आणि क्रेडिट कार्ड ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
 • प्रत्येकाच्या आवाजाची ‘व्हॉइस प्रिंट’ तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे जेव्हा ग्राहक नोंदणीकृत मोबाईल नंबरवर फोन करून आपल्या आवाजाचा उपयोग करतील तेव्हा त्याला व्हॉइस प्रिंटशी जुळवून व्यवहार केला जाईल.

Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 27 May 2015

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.