Current Affairs of 27 July 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (27 जुलै 2016)

चालू घडामोडी (27 जुलै 2016)

‘सौरशक्‍ती सोलर इम्पल्स-2’ ची पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण :

  • ‘दी फ्यूचर इज क्‍लीन. दी फ्यूचर इज यू, दी फ्यूचर इज नाऊ, लेट्‌स टेक इट फरदर’ बर्ट्रांड पिक्कार्डने हे वाक्‍य उच्चारताच अबुधाबीतील विमानतळावर टाळ्यांचा कडकडाट झाला.
  • प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून विजयोत्सव अक्षरश: ओसंडून वाहत होता. याला कारणही तसंच होतं.
  • केवळ सौरऊर्जेवर चालणाऱ्या ‘सोलर इम्पल्स-2’ या विमानाने (दि.26) पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करत अबुधाबीच्या विमानतळावर यशस्वी लॅंडिंग केले.
  • शेवटच्या टप्प्यातील ‘सोलर इम्पल्स-2’चा इजिप्तची राजधानी कैरो ते संयुक्त अरब अमिरातीपर्यंतचा प्रवास विशेष उत्कंठावर्धक ठरला.
  • मागील वर्षी 9 मार्च रोजी या विमानाने उड्डाण करताच संपूर्ण जगाचे लक्ष आकाशाकडे लागले होते.
  • अपारंपरिक ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी हा आगळावेगळा प्रयोग करण्यात आला होता.
  • पिक्कार्ड आणि बोर्शबर्ग हे दशकभरापेक्षाही अधिक काळपासून ‘सोलर इम्पल्स’च्या प्रकल्पावर काम करत होते. या अनोख्या प्रवासामुळे हवाई वाहतूक क्षेत्रात 19 विश्‍वविक्रमांची नोंद झाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 जुलै 2016)

भारतासाठी ऐतिहासिक कामगिरीची नामी संधी :

  • रिओ ऑलिम्पिकमध्ये 11 ऑगस्ट हा ऐतिहासिक दिवस ठरेल.
  • तब्बल 112 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन करणाऱ्या ‘गोल्फ’ खेळाची रंगत या दिवसापासून रंगेल.
  • भारताचाही या खेळामध्ये सहभाग असून अनिर्बान लाहिरी, शिवशंकर प्रसाद चौरासिया आणि आदिती अशोक असे तीन खेळाडू ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करतील.
  • विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडलेल्या या तिन्ही खेळाडूंना पदकाची संधी असल्याने तिघांनीही सकारात्मक खेळ केला, तर निश्चितच भारताची ऐतिहासिक कामगिरी यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये होईल.
  • तसेच या तिघांनी ऑलिम्पिक प्रवेश करूनच इतिहास नोंदवला आहे. त्यामुळेच गोल्फकडे भारतीयांचे विशेष लक्ष असेल.
  • आशिया खंडातील अव्वल खेळाडू असलेला अनिर्बान लाहिरी याच्यावर भारताची मुख्य मदार असेल.
  • 2015 साली त्याने कमाल करताना युरोपियन टूरमध्ये दोन विजय मिळवत पीजीए चॅम्पियनशिपमध्ये 5 व्या क्रमांकावर कब्जा केला होता.
  • विशेष म्हणजे कोणत्याही भारतीय गोल्फरने आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
  • तसेच त्याबरोबर गतवर्षी त्याने प्रेसिडंट कपमध्ये आंतरराष्ट्रीय संघात प्रवेश करणारा पहिला भारतीय म्हणूनही विक्रम नोंदवला.

नीता अंबानींना केंद्रसरकारकडून ‘वाय’ दर्जाची सुरक्षा :

  • रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना सरकारकडून आता ‘वाय’ दर्जाची ‘व्हीव्हीआयपी’ सुरक्षा देण्यात आली आहे.
  • मुकेश अंबानी यांना देखील बर्‍याच वर्षांपासून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
  • केंद्रीय सुरक्षा पथकाकडून तयार करण्यात आलेल्या एका अहवालात नीता अंबानी यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्याची शिफारस करण्यात आली होती.
  • केंद्र सरकारकडून ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी 10 सीआरपीएफ कमांडो तैनात करण्यात आले आहेत.
  • झेड दर्जाच्या सुरक्षेअंतर्गत 40 सीआरपीएफ कमांडो तैनात करण्यात येतात.
  • सीआरपीएफकडून झेड आणि वाय दर्जाची सुरक्षा पुरविण्यात येते.
  • तसेच सध्या भारतात 58 व्हीव्हीआयपी व्यक्तींना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात येत आहे.

सरकारकडून सातव्या वेतन आयोगाची अधिसूचना जारी :

  • सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी सरकारने स्वीकारल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
  • केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना यानुसार आता मूळ वेतनाच्या 2.57 पट वाढ होणार आहे.
  • केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे मासिक किमान वेतन 1 जानेवारी 2016 पासून 18,000 रुपये, तर उच्च श्रेणीतील वेतन 2.5 लाख रुपये असणार आहे.
  • तसेच यापूर्वी हे वेतन किमान 7000 रुपये तर अधिकाधिक 90,000 रुपये होते. यासोबतच वेतनवृद्धीसाठी (इन्क्रिमेंट) आता दोन तारखा असणार आहेत.
  • 1 जानेवारी आणि 1 जुलै अशा या तारखा आहेत. यापूर्वी यासाठी केवळ 1 जुलै हीच तारीख होती.
  • कर्मचाऱ्यांची नियुक्ती, पदोन्नती या आधारावर या दोनपैकी एका तारखेला वेतनात वार्षिक वाढ होईल.

भारतीय पथकात प्रवीण राणाची निवड :

  • उत्तेजक द्रव सेवन चाचणीत दोषी आढळल्याने कुस्तीपटू नरसिंग यादवऐवजी प्रवीण राणाची भारतीय पथकात निवड करण्यात आली आहे.
  • नरसिंग यादवची (दि.27) शिस्तपालन समितीसमोर होणाऱ्या सुनावणीत आपल्या निर्दोषत्वाचे पुरावे सादर करायचे आहेत. त्यानंतरच त्याच्या रिओ सहभागाबाबत निर्णय होईल.
  • पण, भारतीय कुस्ती महासंघाने नरसिंगच्याजागी 74 किलो वजनी गटात फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात प्रवीण राणाची निवड करण्यात आली आहे.
  • प्रवीण राणाने 2014 मध्ये अमेरिकेत झालेल्या डेव्ह शल्त्झ मेमोरियल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते.
  • उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्यामुळे नरसिंगच्या रिओ ऑलिंपिक सहभागाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला होता.
  • नाडाची (राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्था) समिती याबाबत चौकशी करीत आहे. त्यांच्या बैठकीत आपल्याला फसवून उत्तेजके देण्यात आली हे नरसिंगला सिद्ध करावे लागेल.

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे हिलरी क्लिंटन यांना उमेदवारी :

  • अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी हिलरी क्लिंटन यांना डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
  • अमेरिकेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच महिलेला उमेदवारी घोषित केली आहे.
  • तसेच त्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच हिलरी क्लिंटन या अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आहेत.
  • फिलाडेल्फिया येथे झालेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत पक्षाच्या सर्व प्रतिनिधींनी अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून हिलरी क्लिंटन यांच्या नियुक्तीला मान्यता दिली.
  • पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या दिवशी सिनेटर बर्नी सेंडर्सच्या समर्थकांनी हिलरी क्लिंटन यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता.
  • मात्र, पक्षाने हा विरोध दूर करत हिलरी क्लिंटन यांना उमेदवारी दिली.
  • हिलरी क्लिंटन या माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी आहेत.
  • अमेरिकेत येत्या नोव्हेंबर महिन्यात अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.

दिनविशेष :

  • 1694 : बँक ऑफ इंग्लंडची रचना.
  • 1921 : फ्रेडरिक बँटिंगने इन्सुलिनचा शोध लावला.
  • 1955 : ऍलन बॉर्डर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.   
     
  • 1990 : बेलारूसने सोवियेत संघापासून स्वातंत्र्य जाहीर केले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 जुलै 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.