Current Affairs of 27 January 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (27 जानेवारी 2018)

चालू घडामोडी (27 जानेवारी 2018)

अपघातग्रस्तांसाठी सरकार सुरु करतंय टोल-फ्री नंबर :

  • राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघाताची माहिती देण्यासाठी किंवा हायवेवरील एखादी असुविधेबद्दल तक्रार करण्यासाठी केंद्र सरकार नॅशनल टोल-फ्री क्रमांक सुरु करत आहे.
  • फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हा टोल-फ्री क्रमांक लाँच करणार आहे.
  • यानंतर तुम्ही ‘1033’ या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करुन अपघाताची माहिती किंवा तक्रार नोंदवू शकता.

आरएफआयडीने उपग्रहाद्वारे होणार ई-वे बिलाची निगराणी :

  • केंद्र सरकारने 1 फेब्रुवारीपासून आंतरराष्ट्रीय माल वाहतुकीसाठी जीएसटीचे ई-वे बिल बंधनकारक केले आहे.
  • भविष्यात या ई-वे बिलाची निगराणी उपग्रहाद्वारे होऊन माल वाहतूकदारांना दिलासा मिळणार आहे.
  • रेडिओ फ्रीक्वेन्सी आयडेन्टीफिकेशन डिव्हाईस (आरएफआयडी) ही एक डिजिटल चिप राहणार असून, ती ई-वे बिलासोबत ऑनलाईन मिळणार आहे व हे ई-वे बिल माल वाहतूक करणार्या ट्रकसोबत राहणार आहे.
  • या ट्रकवर जीएसटी प्रशासन उपग्रहाद्वारे नियंत्रण ठेवणार आहे. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम(जीपीएस)द्वारे हे होणार आहे. ई-वे बिलावर लागलेली डिजिटल चीप जीएसटी अधिकारी जीपीएसद्वारे वाचू शकतील व ट्रक नेमका कुठे उभा आहे, याची माहिती कार्यालयात बसून जीएसटी अधिकार्यांना मिळणार आहे.

‘नीट’मध्ये प्रश्नपत्रिकेचा एकच संच :

  • एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमात प्रवेशासाठी घेण्यात येणा-या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत (नीट) बसणा-या विद्यार्थ्यांसाठी यावर्षीपासून प्रश्नपत्रिकेचा एकच संच राहणार असल्याची माहिती केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डने (सीबीएसई) उच्च न्यायालयात दिली.
  • संकल्प चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्तीद्वय अरुण मिश्रा आणि एफ. ए. नजीर यांच्या खंडपीठात सुनावणी झाली.
  • सीबीएसईने न्यायालयात सांगितले की, पूर्वी विद्यार्थ्यांना हिंदी आणि इंग्रजीसह 10 भाषांमध्ये ‘नीट’ परीक्षा देण्याची मुभा होती.
  • सीबीएसईने न्यायालयाच्या सूचनांवर होकार दर्शवीत सध्याच्या शैक्षणिक सत्रापासून प्रश्नपत्रिकेचा एकच संच राहील आणि त्याचा अनुवाद वेगवेगळ्या भाषांमध्ये करण्यात येईल, असे सांगितले.

चित्रपटगृहांत बाहेरील खाद्याला मनाई :

  • मल्टिप्लेक्सच्या संघटनांकडून सूचना घेऊन प्रेक्षकांना चित्रपटगृहांत बाहेरील खाद्यपदार्थ नेऊ देण्याबाबत ठोस भूमिका घ्या, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली.
  • वास्तविक, महाराष्ट्र सिनेमा (रेग्युलेशन) रुल्स नुसार, चित्रपटगृहांत व ऑडिटोरियमध्ये खाद्यपदार्थ विकण्यास मनाई आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

ऑनलाईन बघता येईल तक्रारीची स्थिती :

  • ई-ऑफिस योजनेंतर्गत सामान्य नागरिकांच्या तक्रारींची स्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र शासन एक ऑनलाईन यंत्रणा तयार करणार आहे.
  • सीआय—टू नामक ही यंत्रणा असून, त्याद्वारे आपल्या तक्रारीची शासन दरबारी असलेली स्थिती सामान्य नागरिक ऑनलाईन बघू शकेल.

दिनविशेष :

  • 1967 : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था बालभारती या नावाने ओळखली जाते.
  • 1938 : जगातील सगळ्यात मोठा पाण्याखालचा बोगदा (53.900 किमी) जपानच्या होन्शू व होक्काइदो बेटांमध्ये खुला करण्यात आला.
  • 2009 : भारताचे 8 वे राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांचे निधन. (जन्म: 4 डिसेंबर 1910)

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.