Current Affairs of 28 January 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (28 जानेवारी 2018)

चालू घडामोडी (28 जानेवारी 2018)

‘आधार’ ठरला ‘हिंदी वर्ड ऑफ द इयर’ :

 • जगभरात प्रसिद्ध असलेला इंग्रजी शब्दकोश अर्थात ऑक्सफोर्ड डिक्शनरी दरवर्षी ‘इंग्रजी वर्ड ऑफ दि इयर’ घोषित करते.
 • त्याचप्रमाणे ऑक्सफोर्डने यंदा पहिल्यांदाच ‘हिंदी वर्ड ऑफ दि इयर घोषित’ केला असून 2017 सालासाठी हा मान ‘आधार’ या शब्दाला मिळाला आहे.
 • राजस्थानात सुरु असलेल्या जयपूर साहित्य संमेलनात (जेएलएफ)ऑक्सफोर्ड डिक्शनरीकडून ही घोषणा करण्यात आली.
 • या कार्यक्रमात हिंदीतील प्रसिद्ध कवी अशोक वाजपेयी, ज्येष्ठ साहित्यिक चित्रा मुद्गल आणि वरिष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचा सहभाग होता.
 • निवड समितीसमोर नोटबंदी, स्वच्छ, आधार, योग, विकास, बाहुबली असे अनेक पर्यायी शब्द होते. अखेर यांमधून ‘आधार’ या शब्दाची निवड करण्यात आली.

ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धात वोझ्नियाकी विजेती :

 • जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानाबरोबरच ग्रँड स्लॅम विजेतेपदावर मोहोर नोंदवण्याचे स्वप्न सिमोना हॅलेपला साकार करता आले नाही.
 • उत्कंठापूर्ण लढतीत कॅरोलीन वोझ्नियाकी या डॅनिश खेळाडूने तिला 7-6 (7-2), 3-6, 6-4 असे हरवले आणि पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपदाचे ध्येय साकार केले.

जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट सज्ज :

 • नासा जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेटला अंतराळ प्रक्षेपित करणारी प्रणाली (एसएलएस) विकसित करत आहे.
 • नुकतेच जगातील सर्वात मोठ्या व शक्तिशाली रॉकेटचे इंजिन आरएस-25 चे यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे.
 • सर्व कसोट्यांतून बाहेर पडून हे अत्याधुनिक प्रणालीयुक्त रॉकेट साकारले आहे. सर्वकाही ठीक राहिल्यास पुढील वर्षी मानवाला अंतराळ घेऊन जाणाऱ्या ओरियन यानासोबत या रॉकेटलादेखील पाठवण्यात येणार आहे.
 • ही मोहीम मानवरहित असेल. या एक वर्षाच्या कार्यकाळात संशोधक रॉकेटचे वजन व खर्च कमी करण्यासाठी 3-डी मुद्रित सुटे भाग लावून मोहीम पूर्ण करणार आहेत.
 • रॉकेटच्या साहाय्याने संशोधकांना पुन्हा चंद्रावर पाठवले जाईल. एस्टॉरॉइड मोहिमेतही रॉकेटचा वापर केला जाणार आहे.
 • हे रॉकेट 77 टन वजनासह उड्डाण करण्यास सक्षम आहे. ही क्षमता नंतर वाढवून 115 टन केली जाईल.

आरएस 25 इंजिनाची काही वैशिष्ट्ये

 1. रॉकेटचे वजन 8000 एलबीएस आहे.
 2. लांबी 14 मीटर व रुंदी ८मीटर आहे.
 3. तापमान 423 ते 6 हजार फॅरनहाइटपर्यंत.
 4. इंजिनात इंधन तसेच ऑक्सिजन दोन्हींचे मिश्रण उपयोगात आणले जाऊ शकते.
 5. डिझाइन कॅलिफोर्नियात तयार झाले आहे.
 6. मिसिसिपी शहरात त्याचे परीक्षण झाले आहे.
 7. लुसियानामध्ये ही प्रणाली विकसित केली.
 8. एसएलएस सुरू करण्यात आले होते. तेव्हा 4 आरएस-25 इंजिन सातत्याने 8.5 मिनिटांपर्यंत चालू ठेवण्यात आले होते.
 9. आरएस-२५ इंजिनातून निघणारा वायू, ध्वनीच्या 13 पट अधिक वेगाने उत्सर्जित होतो.
 10. लॉस एंजलिस ते न्यूयॉर्क शहराचे अंतर केवळ 15 मिनिटांत पूर्ण करता येऊ शकते.

922 वर्षांच्या इतिहासात प्रथमच प्रवेशपात्र विद्यार्थिनींची संख्या अधिक :

 • जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वश्रेष्ठ विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या ऑक्सफर्डमध्ये पहिल्यांदाच प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे.
 • ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या 922 वर्षांच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
 • यंदा पदवी अभ्यासक्रमाला 1025 विद्यार्थी व 1060 विद्यार्थिनींनी प्रवेश घेतल्याचे ब्रिटन युनिव्हर्सिटी अँड कॉलेज अॅडमिशन मंडळाकडून सांगण्यात आले.
 • ऑक्सफर्ड विद्यापीठ 1096 पासून अस्तित्वात आहे. येथून एकूण 29 नोबेल पारितोषिक विजेते आणि 27 ब्रिटिश पंतप्रधान उत्तीर्ण झाले आहेत.

दिनविशेष :

 • 1643 : मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध.
 • 1961 : एच. एम. टी. वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला.
 • 1865 : स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म. (मृत्यू: 17 नोव्हेंबर 1928)
 • 1616 : संत दासोपंत समाधिस्थ झाले. (जन्म: 24 सप्टेंबर 1551)

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World