Current Affairs of 27 December 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (27 डिसेंबर 2017)

चालू घडामोडी (27 डिसेंबर 2017)

2018 साली भारतीय अर्थव्यवस्था उंचावेल :

  • आगामी वर्षात भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक विकासदराच्याबाबतीत (जीडीपी) ब्रिटन आणि फ्रान्स या दोन बड्या देशांना मागे टाकेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
  • ‘द सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च’ने (सीईबीआर) यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार आगामी वर्षात वीज आणि तंत्रज्ञान कमी किंमतीत उपलब्ध होऊन एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेत तेजी पाहायला मिळेल. याशिवाय, आशियाई देशांच्या अर्थव्यवस्था जागतिक बाजारपेठेत वर्चस्व गाजवतील. यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था वरच्या स्थानावर असेल. या एकूणच परिस्थितीमुळे आगामी 15 वर्षात जगातील आघाडीच्या दहा अर्थव्यवस्थांच्या यादीत आशियाई देशांचे वर्चस्व असेल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
  • भारतीय अर्थव्यवस्थेला सध्या तात्पुरत्या स्वरुपाचे धक्के बसत आहेत. सध्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्बंधांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास काहीसा मंदावला आहे. मात्र, तरीही 2018 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटन आणि फ्रान्सला सहजपणे माघारी टाकेल आणि जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असे सीईबीआरचे उपाध्यक्ष डग्लस मॅकविल्यम्स यांनी सांगितले.

गुजरातमध्ये सहाव्यांदा भाजप सत्तेवर :

  • गुजरातच्या नवनिर्वाचित सरकारचे मुख्यमंत्री म्हणून विजय रूपाणी यांनी शपथ घेतली. गांधीनगर सचिवालयाच्या मैदानावर आयोजित या भव्य शपथग्रहण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री सहभागी झाले होते.
  • भाजपने 6 पाटीदार, 6 ओबीसी, 2 राजपूत, 3 आदिवासी, 1 दलित आणि एका ब्राह्मण आमदाराचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे.
  • विजय रूपाणी यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथग्रहण समारोहात सहभागी झालेल्या मोदींनी तत्पूर्वी अहमदाबादमध्ये रोड शोही केला.
  • राज्यपाल ओ.पी. कोहली यांनी रूपाणी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि राज्य मंत्रिमंडळातील 19 सदस्यांनीही शपथ घेतली.

एमिरेट्स एअरलाइन्सच्या विमानांवर बंदी :

  • युनेशियाच्या वाहतूक मंत्रालयाने एमिरेट्स एअरलाइन्स कंपनीच्या सर्व विमानांना देशात उतरण्यास आणि उड्डाण करण्यास बंदी घातली आहे.
  • एमिरेट्सने दोन ट्युनेशियन महिलांना विमानात चढण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून हा तडकाफडकी निर्णय घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
  • वाहतूक मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार एमिरेट्स एअरलाइन्सच्या विमानांना ट्युनेशियामध्ये बंदी घालण्यात आली आहे.
  • तसेच जोपर्यंत कंपनी जागतिक नियम आणि करारांप्रमाणे काम करण्यासाठी तयार होत नाही तोपर्यंत ही बंदी कायम राहिले अशा स्वरूपाचे पत्रकच मंत्रालयाने काढले आहे.

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा :

  • 31 डिसेंबरपासून हैदराबादमध्ये रंगणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघाची निवड करण्यात आलेली आहे.
  • 21 संभाव्य खेळाडूंच्या यादीतून 15 जणांच्या अंतिम संघाची निवड करण्यात आलेली आहे.
  • राज्य कबड्डी असोसिएशनमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार संघात कोणतेही बदल होण्याची शक्यता कमी आहे.
  • प्रो-कबड्डीत उत्तर प्रदेशच्या संघाकडून खेळणाऱ्या रिशांक देवाडीगाकडे यंदा महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व देण्यात आलेले आहे.
  • एकूण 31 संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून 6 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे, स्टार स्पोर्ट्स या वाहिनीवर या स्पर्धेचे उपांत्यपूर्व फेरीपासूनचे सामने दाखवण्यात येणार आहेत.

राज्यात केवळ एक मानांकित अन्न प्रयोगशाळा :

  • देशभरात राज्यनिहाय असणाऱ्या अन्न प्रयोगशाळांची संख्या 72 आहे. यापैकी केवळ आठ प्रयोगशाळांना नॅशनल एक्रेडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशनचे (एनएबीएल) मानांकन आहे. महाराष्ट्रातील केवळ एका प्रयोगशाळेला एनएबीएल मानांकन मिळाले आहे.
  • महाराष्ट्रातील 15 पैकी अवघ्या एका प्रयोगशाळेला हा दर्जा असल्यामुळे कम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाने (कॅग) आपल्या अहवालात राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
  • आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने सगळ्या राज्यांतील ऑक्‍टोबर 2016च्या योजनेनुसार प्रयोगशाळांना एनबीएल मानांकन मिळावे, असे आदेश दिले होते. त्यासाठी दोन वर्षांची मुदतही देण्यात आली आहे.
  • मानांकनाबाबत 2015 मध्येसुद्धा राज्य सरकारने आश्‍वासन दिले होते; मात्र त्याबाबत अंमलबजावणी होत नसल्याचे ‘कॅग’च्या निदर्शनास आले आहे.

जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारले जाणार :

  • विटा शहरात बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असणारे जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली.
  • सुहास बाबर म्हणाले की, आमदार अनिलभाऊ बाबर यांची सामान्य जनतेशी असणारी सामाजिक बांधिलकी व त्यांच्याविषयी असणारी तळमळ याचा धागा पकडून आम्ही विटा येथील वृद्ध लोकांसाठी अतिशय सुसज्ज अशा प्रकारचे विरंगुळा केंद्र तयार करीत आहोत. विटा शहर ज्या पद्धतीने वाढत आहे. त्याप्रमाणे येथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे व नगरपालिका येथील जनतेच्या भावनेशी खेळत आहे. आम्ही इथून पुढील काळात सुद्धा नागरिकांच्या आरोग्याच्या, पाण्याच्या व दिवाबत्तीच्या समस्येवर सकारात्मक विचार करून त्या पूर्ण करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करणार आहोत.

दिनविशेष :

  • उर्दू कवी मिर्झा गालिब यांचा 27 डिसेंबर 1797 मध्ये आग्रा येथे जन्म झाला.
  • सन 1911 मध्ये 27 डिसेंबर रोजी कॉंग्रेस अधिवेशनात ‘जन गण मन’ राष्ट्रगीत पहिल्यांदा गायले गेले.
  • 27 डिसेंबर 1945 मध्ये 28 देशांनी एकत्रित जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) स्थापन केले.
  • इंडोनेशिया देशाला नेदरलँड्स पासून सन 1949 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

आजच्या चालू घडामोडींचा व्हिडिओ

{source}
<iframe width=”350″ height=”250″ src=”https://www.youtube.com/embed/_UPJhZeAlhU?autoplay=1″ frameborder=”0″ gesture=”media” allow=”encrypted-media” allowfullscreen></iframe>
{/source}
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.