Current Affairs of 26 December 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (26 डिसेंबर 2017)

चालू घडामोडी (26 डिसेंबर 2017)

दिल्ली मेट्रोच्या नव्या टप्प्याचे उद्घाटन :

 • पेट्रोलियम पदार्थाच्या आयातीवर देशाचा मोठा खर्च होत असून लोकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून इंधन वाचवावे, त्यामुळे देशाला आर्थिक फायदाही होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मेट्रोने प्रवास करणे लोकांनी प्रतिष्ठेचे समजले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 • दिल्ली मेट्रोचा मॅग्नेटा लाइन हा बारा किलोमीटरचा टप्पा त्यांच्या उपस्थितीत सुरू झाला. त्यानंतर त्यांनी सांगितले, की सरकार पायाभूत सुविधांवर मोठा खर्च करीत आहे हे खरे असले तरी त्याचा फायदा पुढील अनेक पिढय़ांना होणार आहे.
 • 2022 मध्ये भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करीत असून तोपर्यंत पेट्रोलियम उत्पादनांची आयात कमी झाली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. विविध पर्यायी वाहतूक व्यवस्थेने इंधन वापर कमी होईल व त्यामुळे सामान्य माणसाचा पैसा वाचेल तसेच पर्यावरणाचेही रक्षण होईल.

महिनाभरात बँकेत खाते उघडणे सक्तीचे :

 • परदेशातून निधी मिळत असलेल्या स्वयंसेवी संस्था, व्यावसायिक आस्थापने व व्यक्ती यांनी पारदर्शक कारभारासाठी कुठल्याही मान्यताप्राप्त बँकेत खाते उघडणे आवश्यक असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे. या मान्यताप्राप्त बँकांत एकूण 32 बँकांचा समावेश असून, त्यात एक परदेशी बँकही आहे. बँकेत खाते उघडण्यासाठी 21 जानेवारी 2018 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
 • परदेशातून मिळालेला निधी देशहितास बाधा आणणाऱ्या कामासाठी वापरला जाणार नाही याची हमी या संस्थांना द्यावी लागणार आहे.
 • स्वयंसेवी संस्था, व्यक्ती, कंपन्या यांना सार्वजनिक अर्थव्यवस्थापन व्यवस्थेत सहभागी असणाऱ्या बँकांमध्ये खाते उघडावे लागणार आहे. त्यामुळे या संस्था, व्यक्ती व कंपन्या नियम पाळतात की नाही हे सरकारला समजणार आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मोदीजी सहभागी होणार :

 • आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवण्यात यशस्वी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन वर्षामध्ये आणखी एका गोष्टीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहेत.
 • जगभरातले टॉप सीईओ आणि सत्ताधीश एकत्र येणाऱ्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मोदी सहभागी होणार आहेत.
 • गेल्या 20 वर्षांमधील या परिषदेत भारतीय पंतप्रधानांनी सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. इतकेच नाही तर मोदी या परिषदेत मुख्य पाहुणे म्हणून सन्मानिले जाणार असून हा मान मिळणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत.
 • दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भारताचा वरचश्मा राहील अशी चिन्हे आहेत, कारण यात सहभागी होणाऱ्या भारतीय उद्योजकांची व सरकारी अधिकाऱ्यांची संख्या शंभरावर असणार आहे.
 • भारताची आर्थिक स्थिती व भारतामधील गुंतवणुकीच्या संधी या विषयांभोवती अनेक चर्चासत्रे आयोजित करण्यात आली असून भारतामध्ये परकीय गुंतवणूक आणण्यासाठी मोदी या परिषदेचा चांगला उपयोग करतील असे तज्ज्ञांचे मत आहे.

यंत्रमानव सोफियाचा मुंबई दौरा :

 • जगभरात कुतूहलाचा विषय ठरलेली ‘सोफिया’ आता मुंबईला भेट देणार आहे. सोफिया म्हणजे नागरिकत्व मिळालेला पहिला यंत्रमानव (रोबो) आहे. या सोफियाशी 30 डिसेंबर रोजी मुंबई आयआयटीमध्ये विद्यार्थी संवाद साधणार आहेत.
 • मानवी भावना व्यक्त करणारी सोफिया हा विज्ञानाचा अनोखा आविष्कार मानला जातो. सौदी अरेबियाने या रोबोला चक्क नागरिकत्व बहाल केले आहे.
 • आयआयटीच्या ‘टेकफेस्ट’मध्ये सोफियाला निमंत्रित करण्यात आले आहे. सोफियाला बनवणाऱ्या कंपनीने याला होकार दिला आहे. आयआयटी अनेक महिन्यांपासून यासाठी पाठपुरावा करत होती. याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्‍यता आहे.
 • ‘टेकफेस्ट’मध्ये दरवर्षी नवनव्या रोबोंचे सादरीकरण होते. तज्ज्ञांची चर्चसत्रे होतात. यंदा प्रथमच चर्चासत्रात चक्क रोबो सहभागी होणार आहे. यापूर्वी बनवलेले मानवी रोबो मानवी भावना व्यक्त करू शकत नव्हते. सोफिया हसू शकते, रडूही शकते. सोफियाच्या ‘जन्मा’पासूनचा सर्व प्रवास आयआयटीच्या विद्यार्थ्यांपुढे मांडला जाणार आहे.

चीन, पाकिस्तानला भारताने खडसावले :

 • संकुचित राजकारणापोटी दहशतवादाच्या जागतिक धोक्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पाकिस्तान व चीनला भारताने खडसावले.
 • संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील ‘कॉम्प्लेक्स कंटेमपररी चॅलेंजेस टू इंटरनॅशनल पीस अँड सेक्युरिटी’ या विषयावरील चर्चेत भाग घेताना भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनी पाकिस्तान व चीनला ठणकावले.
 • दहशतवादासाठी निधी उभारणे, शस्त्रास्त्र जमा करणे असे प्रकार घडत आहेत. ही समस्या जवळपास सर्व देशांना जाणवत असून येथील प्रत्येक सदस्य देशाने त्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे.
 • दहशतवादाचे आव्हान मोडून काढण्यासाठी सर्व देशांनी परस्पर सहकार्य करणे अपेक्षित आहे. मात्र काही देश संकुचित राजकारणापोटी याकडे डोळेझाक करीत आहेत, दहशतवादाचा सामायिक धोका काय आहे, हे या देशांच्या लक्षात येत नाही, अशा शब्दांत अकबरूद्दीन यांनी पाकिस्तान व चीनचा कठोर शब्दांत समाचार घेतला.

दिनविशेष :

 • स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री डॉ. सुशीला नायर यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 मध्ये झाला. (मृत्यू: 3 जानेवारी 2000)
 • डॉ. प्रकाश आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1948 मध्ये झाला.
 • सन 1976 मध्ये 26 डिसेंबर रोजी कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना झाली.
 • विंदा करंदीकर यांना 26 डिसेंबर 1997 रोजी महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार प्रदान झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

आजच्या चालू घडामोडींचा व्हिडिओ

{source}
<iframe width=”350″ height=”250″ src=”https://www.youtube.com/embed/9FxkuKVtY20?autoplay=1″ frameborder=”0″ gesture=”media” allow=”encrypted-media” allowfullscreen></iframe>
{/source}
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.