Current Affairs of 26 September 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (26 सप्टेंबर 2015)

चालू घडामोडी (26 सप्टेंबर 2015)

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या एटीममध्ये 50 रुपयांच्या नोटा उपलब्ध :

  • रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने देशभरातील सर्व बॅंकांना एटीममध्ये 50 रुपयांच्या नोटा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.
  • त्यानुसार बॅंकांची कारवाई सुरु असल्याचे वृत्त एका हिंदी वृत्तपत्राने दिले आहे.
  • सध्या एटीएममधून केवळ 100, 500 आणि 1000 च्या नोटा काढता येतात.
  • मात्र ग्राहकांच्या सोयीसाठी 50 रुपयांच्या नोटाही एटीएममध्ये उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश रिझर्व्ह बॅंकेने देशातील सर्व बॅंकांना दिले आहेत.
  • भारतीय स्टेट बॅंकेने तर रायपूर येथील एटीएममध्ये तर 50 रुपयांच्या नोटा उपलब्ध करून दिल्या आहेत.
  • येत्या काही दिवसात सर्वच बॅंका आपल्या ग्राहकांना 50 च्या नोटा उपलब्ध करून देणार आहेत.
  • यापूर्वी 2013 मध्ये रिझर्व्ह बॅंकेने देशातील सर्व बॅंकांना 10, 20 आणि 50 च्या नोटा उपलब्ध करून देण्याची सूचना केली होती.

गोंधळाच्या वातावरणात गुगलला व्हाइस सर्चसाठी कमांड देता येणार :

  • माहिती शोध घेण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी, गोंधळाच्या वातावरणात, ऍड्रॉईड स्मार्टफोनवरून गुगलला व्हाइस सर्चसाठी कमांड देता येणार असून पूर्वीपेक्षा अधिक अचूक निर्णय Googleमिळणार असल्याची माहिती गुगलने दिली आहे.
  • त्यासाठी गुगलने “व्हाइस सर्च टूल”वर विशेष काम केले आहे.
  • गुगलवर शोध घेण्यासाठी अपेक्षित माहितीबाबत “टेक्‍स्ट सर्च”, “इमेज सर्च” तसेच “व्हाइस सर्च” यापैकी कोणतेही एक इनपुट द्यावे लागते.
  • त्यानंतर गुगल सर्च रिझल्टद्वारे माहिती किंवा माहितीचे स्रोत पुरवितो.
  • मात्र यापूर्वी “व्हाइस सर्च” ही सुविधा फारशी प्रभावी नव्हती. त्यामुळे गुगलने सविस्तर अभ्यास करून आपल्या प्रणालीमध्ये सुधारणा केल्या आहेत.
  • नव्या प्रणालीनुसार गुगल अतिशय जलद गतीने शब्दांना ओळखणार असून संबंधित शब्दांना तत्काळ वेगळे करून अपेक्षित रिझल्ट देणार आहे.
  • विशेष म्हणजे गोंधळाच्या वातावरणातही ही प्रणाली प्रभावीरीत्या काम करणार असल्याचा दावा गुगलने केला आहे.

बराक ओबामा यांनी भारतीय वंशाच्या व्यक्तींची सल्लागार परिषदेवर केली नियुक्ती :

  • अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी भारतीय वंशाच्या तीन अमेरिकन व्यक्तींची सल्लागार परिषदेवर नियुक्ती केली.

    Obama

  • यात प्रीता बंसल, निपुण मेहता आणि जसजित सिंह यांचा समावेश आहे.
  • आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आणि धर्मनिरपेक्ष व्यक्तींची या परिषदेवर निवड केली जाते.
  • प्रीता बंसल एमआईटीत व्याख्याता आहेत.
  • तसेच निपुण मेहता सर्व्हिस स्पेस या संघटनेचे संस्थापक, तर जसजित सिंह शीख अमेरिकन लीगल डिफेंस अ‍ॅण्ड एज्युकेशन फंडचे कार्यकारी संचालक आहेत.

सिंगापूरमध्ये भारतीय वंशाच्या डॉक्टरला केले सन्मानित :

  • सिंगापूरमध्ये 38 वर्षे वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या भारतीय वंशाच्या 75 वर्षीय डॉक्टरला सन्मानित करण्यात आले आहे.
  • डॉ. उमा राजन या हा पुरस्कार स्वीकारणाऱ्या पहिल्या महिला आहेत.
  • राजन यांना कायदा व शिक्षण राज्यमंत्री इंद्राणी राजाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • समाजाच्या विविध क्षेत्रात सेवा पुरविणाऱ्या महिलांसाठी हा पुरस्कार प्रेरणादायी ठरू शकेल, असे राजन पुरस्कार स्वीकारल्यावर म्हणाल्या.
  • या पुरस्कारासह मिळालेली 10 हजार डॉलर पारितोषिक रक्कम राजन यांनी स्वयंसेवी संस्था, बालकल्याण संस्था आणि आशियाई महिला कल्याण संस्थेला दान केली.

राष्ट्रीय सुरक्षा मंडळाने मंजूर केलेल्या प्रकल्पांची विशेष तपासणी करण्याचा निर्णय :

  • पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय सुरक्षा मंडळाने मंजूर केलेल्या प्रकल्पांची विशेष तपासणी करण्याचा निर्णय महालेखापरीक्षकांनी (कॅग) घेतला आहे.
  • संवेदनाक्षम संस्थांना अधिकाधिक जबाबदार करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून ‘कॅग’ने हे प्रथमच पाऊल उचलण्याचे ठरविले आहे.
  • राष्ट्रीय सुरक्षा मंडळाने मंजूर केलेल्या प्रकल्पाची विशेष तपासणी करण्याचा प्रस्ताव ‘यूपीए-2’ सरकारच्या राजवटीच्या अखेरच्या कारकीर्दीत मंजूर झाला आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या नव्या राजवटीत त्यास अंतिम मंजुरी मिळाली.
  • अशा प्रकारच्या प्रकल्पांची विशेष तपासणी करण्याचे काम सुरू झाले असून पहिला गोपनीय अहवाल लवकरच अंतिम टप्प्यात येईल, असे ‘कॅग’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • ‘नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन’ची विशेष तपासणी 2010 मध्ये हाती घेण्यात आली.

नरेंद्र मोदी यांनी भारताच्या तिरंग्यावर केलेल्या स्वाक्षरीमुळे तीव्र प्रतिक्रिया :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या तिरंग्यावर केलेल्या स्वाक्षरीमुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून मोदी यांनी तिरंग्याच्या नियमावलीचा भंग केला असल्याची टीका करण्यात Narendra Modiआली.
  • शेफ विकास खन्ना यांच्यामार्फत भारताचा राष्ट्रध्वज अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना देण्यात येणार आहे.
  • ध्वजाच्या संहितेचा भंग झाला आहे किंवा नाही, यासंबंधी वादंग निर्माण झाल्यामुळे हा तिरंगा तेथून अन्यत्र नेण्यात आला.
  • भारतीय ध्वजसंहिता 2002 नुसार, भारताच्या राष्ट्रध्वजावर कोणत्याही प्रकारचा मजकूर लिहिण्यात आल्यास त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अनादर होतो.

भारत-अमेरिका वाघांच्या संबंधी करार :

  • भारतातील विशिष्ट प्रजातीच्या बंगाली वाघांची संख्या घटत चालली असून त्यांचे संरक्षण व शोध यासाठी भारताला अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवण्याची तयारी अमेरिकेने दर्शवली आहे.

    C

  • वन्यजीव संवर्धनासाठी वन्यजीव तस्करी टाळणे आवश्यक आहे, त्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे.
  • याबाबतच्या समझोता करार मसुद्याला अंतिम रूप देण्यात आले आहे.
  • भारत व अमेरिका यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात या समझोता कराराचा उल्लेख करण्यात आला होता.
  • भारत-अमेरिका यांच्यातील धोरणात्मक व व्यापारी भागीदारी संवाद कार्यक्रमात हे निवेदन जारी करण्यात आले आहे.
  • भारताच्या व्याघ्र प्रकल्पात वाघांचे व त्यांच्या अधिवासाचे संरक्षण केले जाणार आहे.
  • वाघांची शिकार व तस्करी रोखण्यासाठी दोन्ही देशात करार झाला.
  • परराष्ट्र खात्याच्या निवेदनानुसार वाघांचा अधिवास, वैज्ञानिक माहितीचे नियोजन, वन्यजीव संवर्धन व धोक्यात असलेल्या प्रजातीतील वाघांची संख्या वाढवणे यावर भर दिला जाणार आहे.
  • यात कायदा अंमलबजावणीतही अधिक मदत होणार असून वन्यजीवांची बेकायदा तस्करी रोखली जाणार आहे.
  • वन्यजीव संवर्धन व तस्करी रोखण्यासाठीच्या या समझोता कराराचे दोन्ही देशांनी स्वागत केले असून यात पर्यावरण व परिसंस्थेतील विविधता राखण्यास मदत होणार आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.