Current Affairs of 25 September 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (25 सप्टेंबर 2015)

चालू घडामोडी (25 सप्टेंबर 2015)

व्यवहार्यता तपासण्यासाठी चीन, फ्रान्स आणि स्पेनमधील कंपन्यांची निवड :

  • दिल्ली, मुंबई आणि कोलकता, त्याचप्रमाणे मुंबई आणि चेन्नई या महानगरांना जोडणाऱ्या हीरक चतुष्कोन (डायमंड क्वाड्रिलॅटरल) या महत्त्वाकांक्षी रेल्वे कॉरिडॉर railwayप्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी रेल्वेने चीन, फ्रान्स आणि स्पेनमधील कंपन्यांची निवड केली आहे.
  • चारही प्रस्तावित लोहमार्गांचे अध्ययन करून या कंपन्यांनी अहवाल देणे अपेक्षित आहे.
  • तब्बल दोन लाख कोटी खर्च अपेक्षित असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे चारही महानगरे वेगवान रेल्वेगाड्यांनी (हायस्पीड ट्रेन) जोडली जातील.
  • 300 किलोमीटर प्रतितास या वेगामुळे प्रवासाचा वेळही लक्षणीय प्रमाणात कमी होणार आहे.
  • याअंतर्गत “थर्ड रेल्वे सर्व्हे अँड डिझाइन इन्स्टिट्यूट” ही चिनी कंपनी दिल्ली- मुंबई मार्गाचे अध्ययन करेल, तर फ्रान्समधील “सिस्ट्रा” ही कंपनी मुंबई- चेन्नई मार्गाची पाहणी करेल.
  • याखेरीज दिल्ली आणि कोलकता यांना जोडणाऱ्या मार्गाचे अध्ययन स्पेनच्या “इनेको” या कंपनीकडून केले जाईल.
  • या अध्ययनासाठी तीस कोटी रुपये खर्च होतील, असा अंदाज रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर होण्याची शक्‍यता :

  • लातूर जिल्ह्यात या वर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून खरीप गेले आहे.
  • यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने खरीप हंगामाची पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.
  • यात जिल्ह्यातील सर्वच 943 गावांत 67 पैसे पेक्षा कमी पैसेवारी आली आहे.
  • त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होण्याची शक्‍यता आहे.
  • जिल्ह्यात सरासरी 358 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

स्वयंचलित टेहळणी व सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावास मंजुरी :

  • भारतीय हवाई दलामध्ये संपूर्णत: स्वयंचलित टेहळणी व सुरक्षा यंत्रणा (एअर सर्व्हेलन्स) कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
  • यासाठी सुमारे आठ हजार कोटी रुपये इतका खर्च येणार आहे.
  • हवाई दलाने याआधीच पाकिस्तानच्या सीमारेषेजवळ असलेल्या बर्नाला (पंजाब), वडसार (गुजरात), अया नगर (दिल्ली), जोधपूर (राजस्थान) आणि अंबाला (हरियाना) येथील हवाई तळांवर अशा स्वरुपाची यंत्रणा प्रस्थापित केली आहे.
  • भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स या संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सार्वजनिक कंपनीच्या मदतीने ही यंत्रणा (आयएसीसीएस) कार्यान्वित करण्यात आली आहे.
  • आता या प्रणालीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्व, मध्य व दक्षिण भारतामध्ये तीन मुख्य व 10 इतर ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.
  • याचबरोबर, अंदमान व निकोबार या व्यूहात्मकदृष्टया अत्यंत महत्त्वपूर्ण बेटसमूहावरील तळामध्येही ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
  • या यंत्रणेंतर्गत विकसित येणाऱ्या काही सुविधा भूगर्भाखालील इमारतींमध्येही बसविण्यात येणार आहेत.

मंगळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश करण्याला वर्ष पूर्ण :

  • जागतिक पातळीवर ओळख निर्माण केलेल्या भारताच्या मंगळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश करण्याला गुरुवारी वर्ष पूर्ण झाले आहे.

    mangal

  • इस्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने या यानाचा पहिला बर्थडे उत्साहात साजरा केला.
  • या यानाचे इंधन अपेक्षेपेक्षा जास्त काळ टिकणार असल्यामुळे त्याचे आयुष्यही अनेक वर्षांनी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
  • इस्रोने यानिमित्ताने मंगळावरील रंगीत कॅमेऱ्यातून मिळालेल्या प्रतिमा आणि अन्य पे-लोडच्या साह्याने मिळविण्यात आलेल्या छायाचित्रांचे संकलन असलेल्या ‘सायन्टिफिक अ‍ॅटलास’चे प्रकाशनही केले. मार्स ऑर्बिटर मिशनच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त इस्रोने ‘फिशिंग हॅमलेटटू मार्स’ हे पुस्तक 5 नोव्हेंबर रोजी प्रकाशित करण्याचे ठरविले
  • या यानाने 51 पैकी 21 मोहिमा यशस्वी केल्या आहेत.
  • युरोपीयन अंतराळ संस्था, अमेरिकेची नासा आणि रशियाच्या रॉसकॉसमॉस या तीनच अंतराळ संस्थांना यापूर्वी मंगळावर यान पाठविण्यात यश मिळवता आले
  • मंगळयानावर आलेला खर्च 450 कोटी रुपये म्हणजे 7.4 कोटी अमेरिकन डॉलर असून प्रत्यक्षात अपेक्षा 10 कोटी अमेरिकन डॉलर एवढ्या खर्चाची होती.

सौरव गांगुली याची कॅब अध्यक्ष म्हणून नियुक्ती :

  • भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला गुरुवारी बंगाल क्रिकेट संघटनेचा (कॅब) अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

    sourav ganguly

  • गांगुलीला अध्यक्ष नियुक्त केल्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य सचिवालयात कॅबच्या सिनियर पदाधिकारी आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत केली.
  • एक अन्य महत्त्वपूर्ण घटनाक्रमात दालमिया यांचे चिरंजीव अभिषेक यांना दोन संयुक्त सचिवांपैकी एका पदावर नियुक्त करण्यात आले.
  • अभिषेक दालमिया गांगुलीची जागा घेतील.
  • सुबीर गांगुली दुसरे संयुक्त सचिव म्हणून पूर्वीप्रमाणेच जबाबदारी पार पाडतील.
  • विश्वरूप डे देखील कोषाध्यक्ष म्हणून कायम असतील.

भारतीय वैज्ञानिकाचे संशोधन :

  • सूर्यापेक्षा पाच हजार पटींनी अधिक वस्तुमान असलेल्या कृष्णविवराचा शोध मध्यम आकाराच्या कृष्णविवराच्या अस्तित्वाचा पुरावा भारतीय वंशाच्या एका वैज्ञानिकाच्या नेतृत्वाखालील पथकाने शोधला आहे.
  • कृष्णविवराचा असा मध्यम आकाराचा वर्ग असतो यावर या संशोधनाने शिक्कामोर्तब झाले आहे.
  • जवळपास सर्व कृष्णविवरे शून्य ते दोन या आकारात येतात.
  • आंतरतारकीय वस्तुमान सूर्यापेक्षा अब्जावधी पट अधिक असलेल्या कृष्णविवरांचाही त्यात समावेश होतो.
  • खगोल वैज्ञानिकांच्या मते मध्यम आकाराच्या कृष्णविवरात दोन टोकाचे आकार असू शकतात, पण त्याचे पुरावे मिळत नव्हते, पण ते आता मिळत आहेत.
  • किमान सहा कृष्णविवरे या गटात सापडली आहेत.
  • मेरीलँड विद्यापीठ व नासाच्या गोडार्ड स्पेस सेंटरच्या खगोलशास्त्रज्ञांनी नवीन मध्यम आकाराच्या व सूर्यापेक्षा पाच हजार पट जास्त वस्तुमानाच्या कृष्णविवराचे पुरावे दिले आहेत. मध्यम आकाराच्या कृष्णविवरांमध्ये त्यामुळे एकाची भर पडली आहे.
  • याच वैज्ञानिकांनी अशाच वर्गातील कृष्णविवर ऑगस्ट 2014 मध्ये शोधून काढले होते.
  • पूर्वीच्या अभ्यासानुसार सूर्याच्या वस्तुमानापेक्षा 400 पट अधिक वस्तुमान असलेले कृष्णविवर आहे व नासाच्या रोसी एक्स रे टायमिंग एक्स्प्लोरर उपग्रहाने व युरोपीय अवकाश संस्थेच्या एक्सएमएम न्यूटन उपग्रहाने त्याचे पुरावे दिले आहेत.
  • आता ज्या कृष्णविवराचे पुरावे मिळाले आहेत, त्याचे नाव एनजीसी 1213 एक्स 1 असे आहे.
  • ते कृष्णविवर म्हणजे क्ष किरणांचा स्रोत आहे.
  • काही खगोल वैज्ञानिकांच्या मते ही मध्यम आकाराची कृष्णविवरे मोठय़ा प्रमाणात वस्तुमान ओढत असून, त्यात घर्षण होऊन क्ष किरणांची निर्मिती होत आहे.
  • त्या पाश्र्वभूमीवर एनजीसी 1213 एक्स1 कृष्णविवरातून क्ष किरणांची आतषबाजी होत आहे.
  • एक कृष्णविवर मिनिटाला 27.6 वेळा प्रखर क्ष किरण बाहेर टाकते, तर दुसरे 17.4 वेळा क्ष किरण बाहेर टाकते.
  • या संशोधनात भारतीय वंशाचे विद्यार्थी धीरज पाशम यांनी नेतृत्व केले असून ते स्पेस सायन्स इन्स्टिटय़ूटचे विद्यर्थी आहेत.
  • नासाच्या गोडार्ड केंद्रातील संशोधकांनाही एमबी 82 एक्स 1 या कृष्णविवराची क्ष किरण प्रखरता व एनजीसी 1213 एक्स 1 या कृष्णविवराची क्ष किरण प्रखरता यांचे गुणोत्तर 3-2 असे दिसून आले आहे.
  • अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.