Current Affairs of 26 February 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (26 फेब्रुवारी 2018)
हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा :
- मॅरिट बीजॉर्गेनने प्याँगचँग येथील हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत अखेरच्या दिवशी सुवर्णपदकाची कमाई करताना नॉर्वेला अव्वल स्थान पटकावून दिले.
- रशियानेही नाटय़मयरीत्या पुरुष हॉकी संघाचे सुवर्ण जिंकले, परंतु उत्तेजक सेवनाच्या आरोपांमुळे समारोप समारंभात त्यांचा ध्वज फडकवण्यावर प्रतिबंध घालण्यात आला.
- स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी तिने जिंकलेल्या सुवर्णपदकामुळे नॉर्वेने 14 सुवर्ण, 14 रौप्य आणि 11 कांस्य अशा एकूण 39 पदकांसह अव्वल स्थान पटकावले.
- तसेच जर्मनीच्या खात्यातही 14 सुवर्णपदके होती, परंतु एकूण पदकसंख्या 31 राहिल्याने त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर कॅनडा (11 सुवर्ण, 8 रौप्य व 10 कांस्य) 29 पदकांसह तिसऱ्या स्थानी राहिले.
Must Read (नक्की वाचा):
अनास्थेने पंचगंगा मृतवत होण्याचा धोका :
- राज्यातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगा नदी आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम हे कारवाई करण्याचा इशारा देतात तर कधी विभागीय आयुक्त दंडुका उगारण्याची भाषा करतात.
- मात्र त्याकडे डोळेझाक करत कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नगरपालिका, औद्योगिक आस्थापना, साखर कारखाने, यांच्याकडून प्रदूषण सुरूच असल्याचा आरोप पर्यावरणवादी कार्यकत्रे सातत्याने करत आहेत. नदीप्रदूषणामुळे काविळीमुळे तीसहून अधिक लोक दगावले तरी जिल्हा, प्रशासन प्रदूषण नियंत्रण मंडळ निद्रिस्त आहे.
- पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी म्हणून पंचगंगा नदीची ओळख आहे. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती व सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा झाली आहे.
- पंचगंगा नदी जवळजवळ 50 किमी पूर्वेकडे इचलकरंजी जवळून वाहत जाऊन, कृष्णा नदीला नृसिंहवाडी कुरुंदवाड येथे मिळते.
दुसऱ्यांदा आयसीसी कसोटीचे अजिंक्यपद भारताकडे :
- आयसीसी कसोटी क्रमवारीतील सांघिक यादीमध्ये अव्वल स्थान गाठल्याबद्दल प्रतिष्ठेची कसोटी अजिंक्यपदाची गदा कर्णधार विराट कोहलीला प्रदान करण्यात आली. यासह भारतीय संघाला दहा लाख अमेरिकन डॉलरचे इनाम देण्यात आले.
- भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा हा बहुमान मिळवला आहे. याचाच अर्थ ऑक्टोबर 2016 पासून भारतीय संघ कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थानावर विराजमान आहे.
- महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नोव्हेंबर 2009 ते ऑगस्ट 2011 या कालावधीत कसोटी अग्रस्थानावर होता. तो भारतीय संघाचा सर्वात जास्त कालावधी होता.
- कोहली आणि धोनीशिवाय स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंग, मायकेल क्लार्क, स्टीव्ह स्मिथ (सर्व ऑस्ट्रेलिया), अँडय़ू स्ट्रॉस (इंग्लंड), ग्रॅमी स्मिथ, हशिम अमला (दोघेही दक्षिण आफ्रिका) आणि मिसबाह-उल-हक (पाकिस्तान) या कर्णधारांनी कसोटी अजिंक्यपदाची गदा जिंकली आहे.
‘गिरीश महाजन’ यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार :
- सार्वजनिक वाचनालयातर्फे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना 25 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांच्या हस्ते कार्यक्षम आमदार पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
- सावानाच्या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या सेवेसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्यास हा पुरस्कार मला प्रेरित करेल. जनसेवक म्हणून मी विधिमंडळात सर्वच घटकांचे प्रश्न सातत्याने मांडत आलो आहे. यापुढेही प्रश्न सोडविण्यासाठी सतत पुढाकार घेत राहील, अशी भावना महाजन यांनी व्यक्त केली.
दिनविशेष :
- वि.स. खांडेकर यांना ययाती कादंबरीसाठी 26 फेब्रुवारी 1976 रोजी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- इन्सॅट-1-ई हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह 26 फेब्रुवारी 1984 रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात आला.
- परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने 26 फेब्रुवारी 1998 रोजी एका दिवसात 14.709 दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा