Current Affairs of 25 February 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (25 फेब्रुवारी 2018)
अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या बायोडेटाचा लिलाव होणार :
- अॅपल या सुप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी चार दशकांपूर्वी म्हणजेच 1973 मध्ये एका कंपनीला पाठवलेला बायोडेटा पुढील महिन्यात लिलावात निघणार आहे.
- हा बायोडेटा मिळवण्यासाठी किमान 50 हजार डॉलरपासून पुढे बोली लावण्यात येईल असा अंदाज लिलावकर्त्यांनी लावला आहे.
- स्टीव्ह जॉब्स यांच्या बायोडेटाचा लिलाव 8 ते 15 मार्च दरम्यान होईल.
Must Read (नक्की वाचा):
पुढील वर्षीपासून शालेय अभ्यासक्रम निम्मा होणार :
- विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) 2019 च्या शैक्षणिक वर्षांपासून अभ्यासक्रम निम्मा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.
- तसेच बहुचर्चित नव्या शैक्षणिक धोरणाबाबत पुढील महिन्याच्या अखेरीस अहवाल सादर केला जाईल, आवश्यक त्या मान्यता मिळाल्यानंतर ते जाहीर केले जाईल, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे आकस्मिक निधन :
- सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत आपली स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री ‘श्रीदेवी’ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या.
- आपल्या अभिनय शैलीच्या जोरावर श्रीदेवीने 1979 साली ‘सोलावा सावन’ या चित्रपटातुन आपल्या हिंदी अभिनय कारकिर्दिची सुरवात केली होती.
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी विजय :
- भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान झालेल्या तिसऱ्या टी-20 समान्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला आहे.
- या विजयासहित भारताने दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा टी-20 मालिका जिंकण्याचाही विक्रम केला आहे.
- सुरेश रैना आणि सलामीवीर शिखर धवन या डावखुऱ्या फलंदाजांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 173 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
- परंतु भारताची अचुक गोलंदाजी आणि जबरदस्त क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आफ्रिकेला केवळ 165 धावांचीच मजल मारता आली आहे.
दिनविशेष :
- 1510 : पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला.
- 1818 : ले. कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उध्वस्त केला.
- 1935 : फॉक्स मॉथ विमानाद्वारे मुंबई – नागपूर – जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला.
- 1996 : स्वर्गदारा तील तार्याला वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले.
- 1599 : संत एकनाथ महाराज यांचे निधन.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा