Current Affairs of 24 October 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (24 ऑक्टोबर 2015)

 चालू घडामोडी (24 ऑक्टोबर 2015)

‘अॅपल वॉच’ भारतामध्ये येत्या 6 नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार :

 • बहुप्रतिक्षित ‘अॅपल वॉच’ भारतामध्ये येत्या 6 नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहे, असे कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.
 • अर्थात या ‘वॉच’ची किंमत अद्याप जाहीर झाली नसली, तरीही एका अंदाजानुसार ही किंमत 36,999 रुपये असू शकते.
 • भारतीय ग्राहकांसाठी ‘अॅपल वॉच’च्या ‘प्री-लॉंच’ आरक्षणासाठी एप्रिलमध्ये सुरवात झाली होती.
 • त्यावेळी ‘ग्रॅबमोअर डॉट इन’ या संकेतस्थळावरील ‘अॅपल वॉच’ची किंमत 36,999 रुपये होती.
 • यापूर्वीही ‘ग्रॅबमोअर डॉट इन’ने ‘अॅपल’ची उत्पादने भारतामध्ये दाखल होण्याआधी त्यांची अचूक किंमत सांगितली होती.

बॉन शहराच्या महापौरपदासाठी भारतीय वंशाचे अशोक श्रीधरन यांचा शपथविधी :

 • जर्मनीची जुनी राजधानी असलेल्या बॉन शहराच्या महापौरपदासाठी भारतीय वंशाचे अशोक श्रीधरन यांचा शपथविधी झाला.
 • गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता.
 • जर्मनीमधील एका मोठ्या शहराच्या प्रथम नागरिकपदी प्रथमच भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाली आहे.
 • जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांच्या ख्रिश्‍चन डेमोक्रॅटिक युनियन या पक्षातर्फे श्रीधरन यांनी निवडणूक लढविली होती.

साईना नेहवालचे फ्रेंच ओपनमधील आव्हान संपुष्टात :

 • जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेली भारताची फुलराणी साईना नेहवालचे फ्रेंच ओपनमधील आव्हान संपुष्टात आले.

  Sayana Nehaval

 • उपांत्यपूर्व फेरीत तिला थायलंडच्या रतनाचोक इंतानोन हिच्याकडून सरळसेटमध्ये पराभव स्वीकारावा लागला.
 • तिच्या पराभवामुळे भारताचेदेखील या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
 • एस. एस. प्रणय, अजय जयराम, ज्वाला गुट्टा व आश्विनी पोनप्पा यांना या सुपर सिरीज स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला होता.

राज्य शासकीय सेवेतील रिक्त पदे भरण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय :

 • राज्य शासकीय सेवेतील रिक्त पदे मोठ्या प्रमाणात भरून नोकरभरतीचा अनुशेष दूर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
 • त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.
 • गट अ ते ड पर्यंतची विविध विभागांतील रिक्त पदे भरण्यासाठीचे प्रस्ताव पूर्ण समर्थनासह सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.
 • तसेच या समितीत सामान्य प्रशासन सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव/प्रधान सचिव वा सचिव सदस्य असतील.

संगीत नाटक अकादमीतर्फे पुरस्कार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान :

 • संगीत नाटक अकादमीतर्फे वर्ष 2014 चे पुरस्कार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये एका शानदार सोहळ्यात प्रदान Pranav Mukharjiकरण्यात आले.
 • नाथराव नेरळकर आणि अश्विनी भिडे -देशपांडे यांचा पुरस्कारप्राप्त मान्यवरांत समावेश आहे.
 • संगीत, नृत्य, नाटक क्षेत्रात उत्कृष्ट, तसेच अविरत कामगिरीबद्दल संगीत नाटक अकादमीतर्फेराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात.
 • पुरस्कारप्राप्त कलाकारांची निवड महा परिषदेच्या वतीने केली जाते.
 • त्यात संगीत, नृत्य, नाटक या क्षेत्रातील एकूण 40 कलाकारांची निवड 2014 च्या अकादमी पुरस्कारांसाठी करण्यात आली.
 • यामध्ये महाराष्ट्रातून शास्त्रीय गायक अश्विनी भिडे-देशपांडे आणि नाथराव नेरळकर यांचा समावेश, तर गोव्यातून तुलसीदास बोरकर आणि नाट्य अभिनेते रामदास कदम यांचा समावेश आहे.

युएईत मास्टर्स चॅम्पियन्स लीगमध्ये संजय दत्त स्वत:च्या मालकीचा संघ उतरवणार :

 • युएईत पुढच्या वर्षी होणा-या मास्टर्स चॅम्पियन्स लीगमध्ये (एमसीएल) संजय दत्त स्वत:च्या मालकीचा संघ उतरवणार असल्याचे वृत्त आहे.
 • बेकायदेशीर रित्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी तुरूंगावास भोगणा-या संजयची शिक्षा पुढील वर्षी संपणार असून त्यानंतर तो तुरूंगाबाहेर येणार आहे.
 • त्याच वर्षी युएईत निवृत्त क्रिकेटपटू सहभागी होणारी एमसीएल स्पर्धा रंगणार आहे.
 • संजयच्या अनुपस्थिीत त्याची पत्नी मान्यता त्याचे सर्व व्यवहार सांभाळत असून तिनेच एमसीएलशी करार केला आहे .
 • संजय तुरूंगाबाहेर पडेपर्यंत एक टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी त्याचे व्यवहार सांभाळणार असल्याचेही समजते.
 • एमसीएलमध्ये ब्रायन लारा, वीरेंद्र सेहवाघ सारखे खेळाडू सहभागी होणार आहेत.

अमेरिका-पाकिस्तान नागरी अणुकरार झालेला नसल्याचे जाहीर :

 • अमेरिकेने पाकिस्तानशी नागरी अणुकराराबाबत कुठल्याही वाटाघाटी केलेल्या नाहीत, असा स्पष्ट निर्वाळा अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला.
 • पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ व अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यात झालेल्या चच्रेनंतर ही भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
 • भारताबरोबर अमेरिकने 2005 साली नागरी अणुसहकार्य करार केला होता.
 • भारताबरोबर अमेरिकेने केलेल्या कराराचा उल्लेख ‘123 करार’ असाही केला जातो.
 • अमेरिकेच्या अणुऊर्जा कायद्यातील कलम 123 अनुसार अन्य देशांशी अणुसहकार्य करण्याची तरतूद आहे.
 • पण अशा स्वरूपाचा कोणताही करार पाकिस्तानबरोबर करण्याचा मानस नसल्याचे आणि प्रसारमाध्यमांतील वृत्तांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे अमेरिकी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
 • तसेच पाकिस्तानला अणुइंधनाचा पुरवठा करता यावा म्हणून अणुइंधन पुरवठादार देशांच्या गटाकडून (न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप) सवलती मिळवण्यासाठीही काहीही प्रयत्न होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 • पण पाकिस्तानने मात्र आपल्याला अमेरिकेशी अणुसहकार्य करण्यात रस असल्याचे स्पष्ट केले आहे.

नासाच्या कामगिरीतील महत्त्वाचा टप्पा :

 • नासाने आतापर्यंतच्या सर्वात शक्तिमान अग्निबाणाची (समानव मंगळ यान प्रक्षेपक) संरचना तयार केली असून त्याचा उपयोग माणसाला मंगळावर पाठवण्यासाठीNASA करता येणार आहे.
 • त्याची संरचना निश्चिती व काही सुटय़ा भागांच्या चाचण्या करण्यात यश आले आहे.
 • मंगळाच्या प्रवासातील आव्हानांचा मुकाबला या अग्निबाणाला करावा लागणार असून त्याचे नाव स्पेस लाँच सिस्टीम (एसएलएस) आहे.
 • गेल्या चाळीस वर्षांत नासाने प्रथमच मानवाला मंगळावर घेऊन जाणाऱ्या अग्निबाणाची रचना केली आहे.
 • नासाच्या ग्रह संशोधन यंत्रणा विकास विभागाचे उप सहायक प्रशासक बील हिल यांनी सांगितले की, एसएलएसची संरचना तयार करण्यात आली असून या अग्निाबणाची इंजिने व बूस्टर्स यांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.
 • त्या सर्व भागांची निर्मिती सुरू करण्यात आली आहे.
 • मंगळ मोहिमेत अनेक आव्हाने आहेत पण या अग्निबाणाची संरचना व त्याच्या काही भागांच्या चाचणीमुळे एसएलएस अग्निबाणाच्या पहिल्या उड्डाणाच्या दिशेने पाऊल पडले आहे.
 • त्याचा वापर अवकाशात दूरवर माणसाचे अस्तिव निर्माण करण्याचा आहे.
 • सीडीआर म्हणजे क्रिटीकल डिझाइन रिव्ह्य़ू तपासण्यात आला असून त्याला एसएलएस ब्लॉक 1 असे म्हणतात.
 • या पहिल्या भागाची क्षमता 70 मेट्रिक टन वजन वाहून नेण्याची आहे व त्याला दोन बुस्टर्स व आर एस 25 प्रकारची चार इंजिने आहेत.
 • विभाग 1 बी मध्ये सुधारणा करण्यात येत असून त्याची क्षमता 105 मेट्रिक टन वजन वाहून नेण्याची आहे.
 • विभाग 2 मध्ये घन व द्रव इंधनावरचे बूस्टर्स वापरले तर त्याची क्षमता 130 मेट्रिक टन वजन वाहून नेण्याइतकी होईल.
 • प्रत्येक टप्प्यात चार आरएस 25 इंजिने वापरली जाणार आहेत.
 • या अग्निबाणाच्या रचनेची संरचना 11 आठवडय़ात अभियंते, अवकाश अभियंते यांच्या 13 चमूंनी तपासली आहे.
 • एकूण 1000 पाने व 150 जीबी इतकी माहिती यात नासाच्या मार्शल स्पेस फ्लाईट सेंटर येथे तपासण्यात आली.
 • आता पुढच्या टप्प्यात अग्निबाणाच्या रचनेस मान्यता देण्यात येईल.
 • उत्पादन, जोडणी व चाचणी 2017 मध्ये झाल्यानंतर ही मान्यता दिली जाईल.

दिनविशेष :

 • 1945 : संयुक्त राष्ट्रसंघाचा स्थापना दिवस
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.