Current Affairs of 24 May 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (24 मे 2016)

चालू घडामोडी (24 मे 2016)

‘व्हेंचर सेंटर’ला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित :

 • राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील ‘व्हेंचर सेंटर’ला नुकतेच सर्वोत्कृष्ट ‘टेक्‍नॉलॉजी बिझनेस इनक्‍युबेशन’साठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 • तसेच या सेंटरमध्ये काम करणाऱ्यांमध्ये 80 टक्के महिला आहेत, तर व्हेंचर सेंटरच्या मदतीने स्थापन झालेल्या ‘स्टार्ट-अप्स’च्या संस्थापक नवउद्योजकांपैकी 30 टक्के महिला आहेत.
 • सायन्स ‘स्टार्ट अप्स’ आणि व्हेंचर सेंटरमध्ये काय चालते याविषयी सेंटरच्या महाव्यवस्थापक डॉ. मनीषा प्रेमनाथ यांनी माहिती दिली.
 • स्टार्ट अप म्हणजे आयटी किंवा ई-कॉमर्सशी संबंधित काहीतरी अशी ओळख निर्माण झाली आहे.
 • झटपट प्रॉडक्‍ट लाँच आणि दोन ते तीन वर्षांत कोट्यवधींची उलाढाल ही आयटी स्टार्ट अप्सची बाजू, तर बाजाराच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहून अपार कष्ट घेत नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणे, ही सायन्स स्टार्ट अप्सची बाजू.
 • व्हेंचर सेंटर स्थापना व उद्देश
 • पुण्याच्या पाषाण भागात असलेल्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) इनोव्हेशन पार्कच्या जागेमध्ये ‘व्हेंचर सेंटर’ हे टेक्‍नॉलॉजी बिझनेस इनक्‍युबेटर आहे.
 • ‘नॉट फॉर प्रॉफिट’ तत्त्वावर 2008 मध्ये हे सेंटर सुरू झाले. एनसीएल ही त्याची पालक संस्था आहे.
 • संशोधन कल्पनांचे रूपांतर तंत्रज्ञानाधारित स्टार्ट अप्समध्ये करून विज्ञानाच्या क्षेत्रातील नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याचा सेंटरचा उद्देश आहे.
 • तसेच त्यातही काळाच्या पुढचे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व्हेंचर सेंटर प्रयत्नशील आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 मे 2016)

गोराई हे ठिकाण पर्यटन हब म्हणून जाहीर :

 • गोराई खाडीच्या पलीकडे असलेल्या 19.32 किलोमीटर क्षेत्रफळावर वसलेल्या गोराई आणि येथील कुलवेममनोरी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यटन हब म्हणून जाहीर करून येथील विकास आराखड्याला मंजुरी दिली.
 • बोरीवली पश्चिमेच्या पलीकडे असलेल्या गोराई, कुलवेम आणि मनोरी ही सुमारे 20 हजार लोकसंख्या असलेली तीन गावे आणि ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर पालिकेच्या हद्दीतील उत्तनसह इतर चार गावे ही स्वातंत्र्यानंतरही विकासापासून वंचित आहेत.
 • उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्या प्रयत्नाने 2000 साली या तीन गावांना सुमुद्राखालून जलवाहिनी टाकून पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले.

भारत, थायलंड, म्यानमार महामार्गाने जोडणार :

 • भारत, थायलंड आणि म्यानमार हे एकत्रितपणे 1400 किलोमीटरचा महामार्ग तयार करीत असून, त्यामुळे भारत आणि आग्नेय आशिया या रस्त्याने जोडले जाणार आहे.
 • तीनही देशांच्या व्यापार, सांस्कृती यांच्या आदानप्रदानाला चालना मिळणार आहे.
 • थायलंडमधील भारताचे राजदूत भागवतसिंग बिश्‍नोई यांनी सांगितले की, म्यानमारमधील सात पूल हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बांधले गेले असून, या पुलांच्या पुनर्निमितीसाठी भारताने आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे या महामार्गावरून वाहतूक सुरक्षितपणे होऊ शकेल.
 • आगामी दीड वर्षात या पुलाचे काम पूर्ण होईल त्यानंतर तीनही देशांसाठी हा महामार्ग खुला करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
 • तसेच या महामार्गाची सुरवात भारताच्या पूर्वेकडील मोरेह येथून सुरवात होऊन तो म्यानमारच्या तामू शहरापर्यंत असेल.
 • तीन देशांतील हा महामार्ग म्हणजे भारताच्या ‘ॲक्‍ट ईस्ट’ या धोरणाचा भाग आहे.

जयललितांची दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी निवड :

 • अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांनी सोमवारी एका वर्षाच्या आत दुसऱ्यांदा एकाच तारखेला तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ ग्रहण केली.
 • बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याच्या आरोपात कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केल्यानंतर जयललिता यांनी एक वर्षाआधी 23 मे 2015 रोजी पाचव्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
 • 16 मे रोजी पारपडलेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर 68 वर्षीय जयललिता यांनी एक वर्षानंतर (दि.23) पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ ग्रहण केली.
 • अण्णाद्रमुकने विधानसभेच्या 134 जागा जिंकल्या आहेत.
 • जयललिता यांच्यासोबत त्यांच्या 28 मंत्र्यांनीही पद व गोपनीयतेची शपथ ग्रहण केली. राज्यपाल के. रोसय्या यांनी त्यांना शपथ दिली.
 • जयललितांनी आपल्या पूर्वीच्या मंत्रिमंडळातील 15 मंत्र्यांना या नव्या मंत्रिमंडळात स्थान दिले आहे तर 13 मंत्री नवे आहेत.

किनारपट्ट्यांच्या संरक्षणासाठी सर्वंकष धोरण :

 • मुंबईसह भारतच नव्हे; तर साऱ्या जगातच समुद्राची पाणीपातळी वाढत चालली आहे.
 • ‘सीआरझेड’ कायद्याद्वारे किनारपट्ट्यांवरील शहरांचे रक्षण करण्याबाबत मोदी सरकारने सर्वंकष धोरण आखले आहे.
 • सध्याच्या धोरणाचा वरचेवर फेरआढावा घेऊन आणखी व्यवहार्य व पारदर्शक बदल करण्याचे आम्ही ठरविले आहे, असे वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
 • पर्यावरण मंत्रालयाचे ‘ई नियतकालिक’ सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
 • देशातील 600 जंगले इको सेन्सेटिव्ह झोन म्हणून जाहीर केली आहेत.
 • गेल्या दोन वर्षांत जंगलक्षेत्र वाढून 21 टक्‍क्‍यांवर गेले आहे. ते 33 टक्‍क्‍यांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे.
 • हवेचे प्रदूषण मोजणारी क्वालिटी इंडेक्‍स यंत्रणा 35 शहरांत बसविली आहे.
 • देशात प्रथमच केलेल्या बांधकाम राडारोडा नियामवलीसह सहा प्रकारच्या कचऱ्यांच्या विल्हेवाटीचे व फेरवापराबाबतचे नियम या वर्षअखेरपर्यंत अमलात येतील.

महेंद्रसिंग धोनीकडे युवा संघाचे नेतृत्व :

 • आगामी झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या युवा खेळाडूंच्या संघाची धुरा महेंद्रसिंह धोनीकडे सोपविण्यात आली आहे.
 • तर वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भरवशाच्या अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
 • सोमवारी (दि.23) मुंबईत दोन्ही दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.
 • विदर्भचा युवा फलंदाज फैझ फझलची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघात निवड झाली आहे, तर मुंबईकर शार्दुलला विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
 • जून महिन्यात टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यात तीन एकदिवसीय तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

सुशीला चानूकडे भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व :

 • ऑस्ट्रेलियातील डार्विन येथे 30 मेपासून सुरू होणाऱ्या चार देशांच्या हॉकी स्पर्धेसाठी डिफेंडर सुशीला चानू हिच्याकडे भारतीय महिला संघाची धुरा सोपविण्यात आली आहे.
 • रिओ ऑलिम्पिकची पूर्वतयारी म्हणून पाहण्यात येत असलेल्या या चौरंगी स्पर्धेत यजमान व जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलिया, चौथ्या क्रमांकाच्या न्यूझीलंड आणि दहाव्या क्रमांकावरील जपानचा सहभाग आहे.
 • तसेच या स्पर्धेसाठी संघाची नियमित कर्णधार रितूराणीला विश्रांती देण्यात आल्याने कर्णधारपदासाठी सुशीलाला संधी मिळाली.
 • त्याचवेळी दीपिकाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
 • भारतीय संघात पूनम रानी आणि वंदना कटारिया या अनुभवी खेळाडूंचा समावेश असून डिफेंडर निक्की प्रधान आणि 18 वर्षीय मिडफिल्डर प्रीती दुबे यांसारख्या युवा खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 मे 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.