Current Affairs of 23 September 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (23 सप्टेंबर 2016)

चालू घडामोडी (23 सप्टेंबर 2016)

अमेरिकेत भारताचे नवे राजदूत नवतेज सरना :

 • ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त नवतेज सरना यांची अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे.
 • भारताचे अमेरिकेतील राजदूत अरुण सिंग हे निवृत्त होत असून, सरना हे लवकरच त्यांची जागा घेतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
 • श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त यश सिन्हा यांच्या जागी तरणजितसिंग सिद्धू यांची नियुक्ती झाली आहे.
 • भारतीय परराष्ट्र सेवेचे (आयएफएस) 1980 च्या बॅचचे असलेल्या सरना यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणून बराच काळ काम केले आहे.
 • अत्यंत मुत्सद्दी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
 • अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी येत्या आठ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना प्रशासकीय कारभार सांभाळायचा आहे.
 • राजदूत म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर भारत-अमेरिका संबंध कायम राखण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असेल.
 • सरना यांनी 2008 ते 2012 या काळात इस्राईलमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
 • परराष्ट्र मंत्रालयात विविध देशांसाठी अतिरिक्त सचिव म्हणून काम पाहत होते.
 • मॉस्के, वॉर्सा, तेहरान, जीनिव्हा, थिंपू आणि वॉशिंग्टन येथील आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

तमीळ चित्रपट ‘विसरनाई’ ऑस्करच्या शर्यतीत :

 • राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त तमीळ चित्रपट विसरनाई या वर्षीच्या ऑस्करमधील उत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या गटात भारताचे अधिकृत प्रतिनिधित्व करणार आहे.
 • ‘पुढील वर्षीच्या ऑस्करमध्ये परदेशी चित्रपटांच्या गटातील 29 चित्रपटांच्या स्पर्धेत भारताचा विसरनाई असेल,’ अशी माहिती फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस सुप्रन सेन यांनी दिली.
 • गुन्हेगारीपट असलेल्या विसरनाई चित्रपटाचा निर्माता अभिनेता धनुष हा असून, त्याचे लेखन व दिग्दर्शन वेत्रीमारन यांनी केले आहे.
 • एम. चंद्रकुमार यांच्या ‘लॉक अप’ कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे.
 • दिनेश रवी, आनंदी आणि आडुकुलम मुरुगदास यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
 • पोलिसी क्रौर्य, भ्रष्टाचार आणि निरागसतेचा होणारा लोप याचे दर्शन चित्रपट घडवितो.
 • तसेच या चित्रपटाला उत्कृष्ट तमीळ चित्रपट, उत्कृष्ट सहायक अभिनेता समुथीरकनी आणि उत्कृष्ट संपादन किशोर टी असे तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
 • व्हेनिस चित्रपट महोत्सवात चित्रपटाला ‘ऍम्नेस्टी इंटरनॅशनल इटालिया ऍवार्ड’ मिळाला होता.

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी :

 • रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळविला.
 • तब्बल 22.7 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह अंबानी हे नवव्यांदा भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
 • फोर्ब्ज मासिकाने भारतातील आघाडीच्या शंभर श्रीमंत व्यक्तींच्या प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, मुकेश अंबानी सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असून, त्यांच्या नंतर सन फार्माचे दिलीप शांघवी हे दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत भारतीय ठरले आहेत.
 • हिंदुजा कुटुंबाने 15.2 अब्ज डॉलर संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळविले.
 • विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी हे एक क्रमांकाने खाली जात चौथ्या क्रमांकावर आले आहेत.
 • विशेष म्हणजे, पतंजली आयुर्वेदचे आचार्य बाळकृष्ण यांनादेखील यादीत 48 व्या क्रमांकावर स्थान प्राप्त झाले आहे.

जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांत ‘आयआयएससी’ चा समावेश :

 • जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीमध्ये भारतीय विज्ञान संस्थेने (आयआयएससी) आतापर्यंतचा सर्वोत्तम क्रमांक पटकाविला आहे.
 • टाइम्स हायर एज्युकेशन (‘द’) या संस्थेने ही यादी सर्वेक्षणानंतर प्रसिद्ध केली आहे.
 • भारतीय विज्ञान संस्थेने जागतिक क्रमवारीत 201 ते 250 या गटात स्थान मिळविले आहे.
 • सत्तर देशांमधील 980 विद्यापीठांमध्ये भारतातील केवळ 31 विद्यापीठांना स्थान मिळविता आले आहे.
 • ऑक्‍सफर्ड विद्यापीठ या क्रमवारीत पहिल्या स्थानावर असून, मागील बारा वर्षांत प्रथमच ब्रिटनमधील विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
 • भारतातील 31 संस्थांपैकी सात संस्था या आयआयटी असून, आयआयटी मुंबई यात आघाडीवर (351 ते 400) आहे.
 • तसेच याशिवाय दिल्ली, कानपूर, मद्रास, खरगपूर, रुरकी आणि गुवाहाटी हे आयआयटीदेखील यादीत आहेत.
 • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (रुरकेला), श्री वेंकटेश्‍वर विद्यापीठ, टाटा मूलभूत संशोधन संस्था आणि तेजपूर विद्यापीठ या चार संस्था यादीत स्थान मिळविण्यात प्रथमच यशस्वी झाल्या आहेत.
 • ‘द’च्या यादीत पहिल्या दहा क्रमांकांवर अमेरिका आणि ब्रिटनमधील विद्यापीठांचेच वर्चस्व आहे.
 • ऑक्‍सफर्डशिवाय केंब्रिज आणि इम्पेरिअल कॉलेज ऑफ लंडन या संस्था पहिल्या दहामध्ये आहेत.

‘किंगफिशर’च्या अधिकाऱ्याला कारावासाची शिक्षा :

 • किंगफिशर एअरलाइन्सचे मुख्य वित्तीय अधिकारी ए. रघुनाथन यांना धनादेश न वटल्याप्रकरणी, दोन खटल्यांत येथील न्यायालयाने अठरा महिन्यांची शिक्षा सुनावली.
 • तसेच या खटल्यांमध्ये उद्योगपती विजय मल्ल्या यांनाही दोषी ठरविण्यात आले आहे.
 • विशेष न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी एम.कृष्ण राव यांनी रघुनाथन यांना दोन्ही खटल्यांत प्रत्येकी 20 हजार रुपये दंडाची शिक्षाही सुनावली आहे.
 • रघुनाथन हे याआधी अनेकवेळा न्यायालयात उपस्थित न राहिल्याने शिक्षेची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.
 • किंगरफिशर एअरलाइन्स, मल्ल्या आणि रघुनाथन यांना न्यायालयाने या दोन खटल्यांमध्ये 20 एप्रिल रोजी दोषी ठरविले होते.
 • किंगफिशर एअरलाइन्सने जीएमआर हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला दिलेले प्रत्येकी 50 लाख रुपयांचे दोन धनादेश न वटल्याप्रकरणी हे खटले दाखल करण्यात आले होते.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.