Current Affairs of 22 September 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (22 सप्टेंबर 2016)
अनुराग ठाकूर आयसीसीचे प्रतिनिधित्व करणार :
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील.
- मुंबईत (दि.21) झालेल्या बीसीसीआयच्या 87 व्या सर्वसाधारण वार्षिक सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
- विशेष म्हणजे, मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांची आयसीसीमध्ये पर्यायी निर्देशक म्हणूनही निवड करण्यात आली आहे.
- आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार, यावरून गेल्या काही दिवसांमध्ये अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत होते.
- तसेच यामध्ये सर्वांत आघाडीवर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे नाव होते.
- आयसीसीमध्ये बीसीसीयाच्या प्रतिनिधित्वाची जबाबदारी त्यांच्यावर दिली जाऊ शकते, अशा चर्चांना उधाण आले होते; मात्र मुंबईत झालेल्या सभेमध्ये ही जबाबदारी अनुराग ठाकूर यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय झाला.
- आयसीसीचे चेअरमन आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या उपस्थितीमध्ये ठाकूर बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):
मुंबईमध्ये होणार राष्ट्रकुल संसदीय मंडळाची परिषद :
- राष्ट्रकूल संसदीय मंडळाची सहावी परिषद 20 ते 23 जानेवारी या कालावधीत होणार असून या परिषदेस राज्यसभेचे सभापती, लोकसभा अध्यक्ष तसेच देशातील विविध राज्यांच्या विधिमंडळ पीठासीन अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली.
- परिषदेच्या तयारीसंदर्भात (दि.20) विधिमंडळात उच्चस्तरीय बैठक झाली. सर्व राज्यांचे विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी व प्रधान सचिव आदी सुमारे साडेतीनशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
- तसेच ही परिषद ऐतिहासिक होण्यासाठी विविध विभागांनी तयारी करावी, असे ठरविण्यात आले.
भारतीय भूचुंबकत्व संस्थानचा अमूर्तमहोत्सवी वर्ष :
- ईस्ट इंडिया कंपनीच्या तत्कालीन सरकारने मुंबईत कुलाबा येथे सन 1841 मध्ये स्थापन केलेल्या भूचुंबकीय वेधशाळेच्या निमित्ताने देशात सुरु झालेल्या भूचुंबकीय नोंदी अभ्यासास यंदा 175 वर्षे पूर्ण होत आहेत.
- केंद्र सरकारच्या अखत्यारीतील भारतीय भूचुंबकत्व संस्थेचे यंदाचे हे वर्ष भूचुंबकीय नोंदी अभ्यासाचे शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करीत असून, त्याच्या शुभारंभाचा कार्यक्रम येथील भूचुंबकीय वेधशाळेत करण्यात आला होता.
- तसेच या प्रसंगी जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
- भारतीय भूचुंबकत्व संस्थेच्या कुलाबा (मुंबई) वेधशाळेचे प्रमुख संशोधक प्रोफेसर डॉ. सत्यवीर सिंग हे आहेत.
- सन 1841 मध्ये मुंबईत कुलाबा येथे स्थापन झालेल्या भूचुंबकीय वेधशाळेच्या चुंबकीय नोंदींमध्ये, मुंबईत सुरु झालेल्या विजेवरील ट्राममुळे व्यत्यय येवू लागल्याने सन 1904 मध्ये कुलाबा येथील ही वेधशाळा, भारतीय भूचुंबकीय संस्थानचे पहिले संचालक आणि भूचुंबकत्व अभ्यासक नानाभाई फ्रामजी मूस यांनी अलिबाग व कुलाबा येथील दोन वर्षांच्या समांतर नोंदींच्या विशेष अभ्यासांती अलिबाग येथे स्थापन केली.
हवाई लक्ष्यवेधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :
- इस्राएलच्या तांत्रिक सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या हवेतील लक्ष्याचा जमिनीवरून वेध घेणाऱ्या लांब पल्ल्याच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्राच्या (दि.20) दोन चाचण्या घेण्यात आल्या.
- यशस्वी प्रायोगिक चाचण्यांनंतर ही प्रक्षेपणास्त्रे तिन्ही सैन्यदलांमध्ये दाखल होतील. त्यामुळे भारताच्या युद्धसज्जता आणखी मजबूत होईल.
- बालासोर समुद्रकिनाऱ्यापासून जवळ असलेल्या चांदीपूर-ऑन-सी येथील एकात्मिक प्रक्षेपण तळावरून सकाळी आणि दुपारी अशा दोन वेळा या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली.
- एक काल्पनिक वैमानिकरहीत विमान हल्ल्याच्या टप्प्यात आल्याचे संकेत संलग्न राडार यंत्रणेने देताच क्षेपणास्त्र तळावरून झेपावले आणि त्याने लक्ष्याचा वेध घेतला.
- सामरिकदृष्ट्या हे सर्व किती अचूकतेने पार पडले, याचे तांत्रिक निष्कर्ष लगेच समजू शकले नाहीत.भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि इस्राएल एअरोस्पेस इंडस्ट्रिज (आयएआय) यांनी संयुक्तपणे ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित केली असून तिची पूर्णपणे जोडणी करून प्रथमच चाचणी घेण्यात आली.
- तसेच यात प्रत्यक्ष क्षेपणास्त्राखेरीज लक्ष्याचा अचूक वेध घेऊन त्यानुसार क्षेपणास्त्राची मार्गनिश्चिती करणारी बहुद्देशीय ‘सर्व्हेलन्स अॅण्ड थ्रेट अॅलर्ट राडार सिस्टिम’ (एमएफ-स्टार) राडार यंत्रणाही आहे.
- गुणवैशिष्ठ्ये आणि उपयोग –
- माऱ्याचा पल्ला: 60 ते 80 किमी.
- कोणत्याही संभाव्य हवाई धोका हाणून पाडण्याची क्षमता.
- क्षेपणास्त्रावरील स्फोटके-60 किलो.
- एकूण वजन: 2.7 टन वेग: 2 मॅच (प्रति सेकंद 1 किमी)
- संरक्षणदलांची संवेदनशील आस्थापने व गर्दीच्या शहरांच्या हवाई संरक्षणासाठी प्रभावी.
दिनविशेष :
- 1539 : गुरू नानक स्मृतीदिन.
- 1887 : रयत शिक्षणसंस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्मदिन.
- 1923 : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती रामकृष्ण बजाज यांचा जन्मदिन.
- 2003 : नासाच्या ‘गॅलिलिओ’ या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत ‘प्राणार्पण’ केले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा