Current Affairs of 23 September 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (23 सप्टेंबर 2015)

चालू घडामोडी (23 सप्टेंबर 2015)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आयर्लंड आणि अमेरिका दौऱ्यावर रवाना :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी सात दिवसांसाठी आयर्लंड आणि अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले आहेत. modi
  • पंतप्रधानांचा हा दौरा 23 ते 28 सप्टेंबरदरम्यान असणार आहे.
  • मोदी हे गेल्या 60 वर्षात प्रथमच आयर्लंडचा दौरा करणारे पहिले पंतप्रधान आहेत.
  • पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान अनेक महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे.
  • यानंतर मोदी 25 सप्टेंबरला अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
  • या दौऱ्यात ते संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत सहभागी होणार आहेत.
  • यानंतर ते सिलिकॉन व्हॅलीला भेट देणार आहेत.
  • या दौऱ्यात मोदी फेसबुकच्या मुख्यालयातील टाऊनहॉलमधील चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.
  • पंतप्रधान अमेरिका दौऱ्यापूर्वी बोइंग कंपनीकडून 22 अपाची आणि 15 चिनूक हेलिकॉप्टर घेण्याच्या निर्णयावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीने (सीसीएस) शिक्कामोर्तब केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला :

  • इंदू मिलच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला आहे. Babasaheb Ambedkar
  • या स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याच्या निर्णयावर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्‍कामोर्तब झाले.
  • महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी याबाबतची माहिती दिली.
  • 4 ऑक्‍टोबर रोजी रंगशारदा इथल्या मैदानावर पंतप्रधानांची जाहीर सभा घेऊन, या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
  • या स्मारकाच्या उभारणीचा आराखडा प्रसिद्ध वास्तुविशारद शशी प्रभू यांनी तयार केला आहे.

भारताने इस्राईलकडून वैमानिकरहित ड्रोन विमाने घेण्याच्या प्रक्रियेस गती :

  • भारताने इस्राईलकडून वैमानिकरहित ड्रोन विमाने घेण्याच्या प्रक्रियेस गती दिली आहे.
  • इस्राईलकडून हेरॉन्स ही ड्रोन विमाने खरेदी करण्याची योजना प्रथम तीन वर्षांपूर्वी मांडण्यात आली होती.
  • जम्मु काश्‍मीरमधील डोंगराळ भागामध्ये तसेच चीनबरोबरील सीमारेषेवरही याआधीच इस्राईलकडून खरेदी करण्यात आलेली “अनमॅन्ड एअर व्हेहिकल्स”द्वारे टेहळणी सुरु करण्यात आली आहे.
  • आता खरेदी करण्यात येणाऱ्या ड्रोन्सद्वारे जमिनीवरील लक्ष्यावर हल्ला करणे शक्‍य होणार आहे.

चीनमधील तियाजीन विद्यापीठाचा विद्यार्थ्यांसाठी डेटिंग कोर्स सुरू :

  • चीनमधील स्त्री-पुरुषांच्या गुणोत्तरामध्ये मोठी विषमता आढळून आल्याने उत्तर चीनमधील तियाजीन विद्यापीठाने मुला-मुलीमधील नाते बळकट करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी डेटिंग कोर्स सुरू केला आहे.
  • चीनमध्ये लैंगिक गुणोत्तरातील विषमता हा मोठा सामाजिक विषय बनत चालला आहे.
  • विवाहयोग्य मुला-मुलींच्या पालकांसमोर ही मोठी अडचण ठरत चालली आहे.
  • या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठातील क्‍युकिओहुई या विद्यार्थ्यांच्या समुदायाने विद्यापीठाच्या सहकार्याने डेटिंग कोर्स सुरु केला आहे.
  • या कोर्समध्ये मित्र-मैत्रिण बनविण्याच्या विशेष पद्धती शिकविण्यात येणार असून हा एकूण 32 तासांचा कोर्स आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.